सुरत येथील घटना मिपाकरांना माहिती असेलच. तक्षशिला या इमरतीस आग लागली होती जिथे शिकवणीसाठी काही विद्यार्थी जमा झालेले होती. आग वाढताना विद्यार्थ्यांनी खिडक्या उघडल्या आणि तिस-या , चौथ्या मजल्यावरून धडाधड उड्या मारल्या. जवळपास वीसजण यात मरण पावले आहेत.
असे अपघात आपल्याला नवीन नाहित. आजची सकाळची घटना आपण संध्याकाळपर्यंत सहज विसरूनही जावू. कोणी दोषी आहे , त्यांच्यावर काय कारवाई होईल अश्या प्रश्नांना आता कितपत अर्थ असेल हाही एक प्रश्नच आहे.
मुख्य मुद्दा हा आहे की अशा परिस्थिती हाताळण्यासाठी आपण मानसिक , शारिरीक द्ष्टयया सक्षम आहोत का हा आहे. ही सर्व मुले जवळपास ११ वीत होती म्हणजेच तेवढी लहान नव्हती तरीही एकाने उडी मारली की एक मॉब मेंट्यालिटी (समूह विचारसरणी) तयार होत जाते आणि सारासार विचार करायची क्षमता हरपते.
मूळात अशावेळी नेमके करायचे काय याचे प्रक्षिक्षणच आपल्याला मिळालेले नाही. आपणही ते मिळवलेले नाही. कुठल्याही गंभीर प्रसंगात जर तेव्हा काय करयाचे याचे ज्ञान शाळेपासून देत आलो असतो तर असे प्रकार नक्कीच कमी होतात.
आग लागल्यावर आगीपेक्षा धुराने श्वास कोंडून मरण अोढवते अशावेळी मिळेल ते कापड घेऊन अोले करणे आणि तोंडावर गूंडाळणे हे योग्य ठरते. जर पाणी नाही मिळाले तर सरळ एखादा कपडा काढून त्यावर लघवी करून ते वापरणे योग्य ठरते. अशावेळी समोर मुलगा आहे वा मुलगी आहे असले विचार डोक्यात येऊ द्यायचे नसतात. हे तेव्हाच शक्य होते जेव्हा प्रक्षिक्षण दिलव जाते आणि आपली मानसिकता त्यातून तयार होत जाते.
मध्यंतरी एका शाळेत आभासी मॉक ड्रील संबंधित अधिका-यांनी करण्यात आल्याचे वाचनात आले होते. एका मुलाला विश्वासात घेऊन तो विद्युत तारेला चिकटलेला असल्याचे भासवण्यात आले. अशावेळी अॅम्ब्युलन्स , इतर सेवा किती वेळात येतात हे नोंदवून ठेवण्यात आले.
केवळ आगच नव्हे तर अगदी कुत्रा चावला तर काय करायचे , विद्युत धक्का लागला तर काय करायचे , समोर अपघात झाला तर काय करायचे, हर्ट अटॅक आला तर काय इतपासून ते दहशतवादी हल्ला , बॉम्बस्फोट झाला तर काय करायचे हे सर्व नागरिकांना समजावून सांगणे आता तरी गांभिर्याने घ्यायला हवे.
मिपाकरांना विनंती की त्यांनी अशा प्रसंगानरूप आपापल्या अनुभव , ज्ञान यांना अनुसरून टिप्पण्या कराव्यात
मिसळपाव
एर कंडीशन इन्सुलेशन
वैयक्तिक/स्थानिक स्तरावरच्या
In reply to वैयक्तिक/स्थानिक स्तरावरच्या by डॉ सुहास म्हात्रे
कर्मधर्मसंयोगाने आजच खालचा
CPR TRAINING COURCE
अत्यंत वाईट घटना, आग
दू्र्दैवि घटना
In reply to दू्र्दैवि घटना by झेन
सहमत आहे, त्यावेळी काही सुचत
कोणत्या ईमर्जन्सी मधे काय
या क्लिपमधील महितीही सर्वांना
दुर्दैवी...