IMPS-mobile च्या माध्यमातून पैसे पाठविणे: जाणकारांकडून माहिती मिळावी:
मला माझ्या बँकेकडून खालीलप्रमाणे एक SMS आला:
Your A/C no. XXXXXX credited with INR 1.00 on 31-01-2019 by A/C linked to mobile no. XXXXXXnnnn (IMPS Ref. No. YYYYYYYYYY)
हा एक रुपया का, कसा, कोणी जमा केला हे मला माहीत नाही. (डिव्हिडंड इ. येतो तेव्हा SMS चा मजकूर वेगळा असतो. एक तर एक रुपया डिव्हिडंड कोठूनही अपेक्षित नाही, आणि तो आला तरी त्याचे स्वतंत्र इन्टिमेशन असतेच.)
दुसरी गोष्ट: हा जो मोबाइल क्रमांक दिला होता त्यातील शेवटचे चार अंक माझ्या मोबाइलचेच आहेत. ह्याला योगायोग म्हटले असते पण बरोबर एक आठवडा आधी माझ्या दुसऱ्या बँकेतील खात्यात, ज्यांना अगदीच किरकोळ म्हणता येणार नाही, अशा तीन रकमा जमा झाल्या होत्या!
हे सर्व प्रकरण दखल घेण्याजोगे होते आणि त्याप्रमाणे मी दोन्ही बँकांच्या अधिकाऱ्यांना तसेच पोलिसांनाही लेखी अर्ज दिले, आणि अन्य खबरदारीही (मोबाईल क्रमांक बदलणे, नवीन पासवर्ड, खाते काही दिवस गोठविणे, इ.) घेतली.
मी IMPS - मोबाइलच्या माध्यमातून कधी पैसे ट्रान्सफर केलेले नाहीत. बँकेला विचारणा केली असता कुणीही निश्चित अशी माहिती देऊ शकले नाहीत. फक्त मोबाइल क्रमांक माहीत असेल तर पैसे ट्रान्सफर करता येतात, मोबाईल क्रमांक आणि बँकेचा खाते क्रमांक माहीत हवा, मोबाइलला कोणत्यातरी UPI ला संलग्न हवा, मोबाइल क्रमांक आणि MMID नंबर माहीत हवा, अशी विविध उत्तरे मिळाली. मी कधी MMID नंबर जनरेट केलेला नाही किंवा माझ्याकडे कोणते UPI ही नाही.
तरी ह्या क्षेत्रातील जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.
धन्यवाद!
याद्या
4149
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
कुठूनही पैसे आले तरी त्याचा
कोणीतरी तुम्हाला बेनिफिशरी
नाही.. मी आत्ता आत्ता अश्या २
In reply to कोणीतरी तुम्हाला बेनिफिशरी by कानडाऊ योगेशु
The answer is, No.
In reply to कोणीतरी तुम्हाला बेनिफिशरी by कानडाऊ योगेशु
Isn't it so basic question
In reply to The answer is, No. by रविकिरण फडके
इतक्यात किंवा पूर्वी कोणा
तुम्ही गुगल तेझ किंवा तत्स्म
केवळ याच कारणाकरता मी पेटीएम,
आपल्याला कुठून पैसे आले हे