Skip to main content

पत्ते

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/02/2019 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
मुलगी भेटीला आली होति त्या वेळी तिला एक चांगला पत्याचा कॅट आण असे सांगितले व तिने आणला..कॅट बरेच दिवस पडुन होता.. काल पत्ते खेळायची हुक्की आली व तो कॅट वपरायला घेतला अन एक मजेदार गोष्ट आढळली..गुलाम राणी राजा आदी कॅट मधे होतेच पण त्या बरोबर ११-१२-१३ अशी पाने पण आहेत.. हा प्रकार निदान मला तरी नविन आहे.. आपणास याबद्दल काहि अधिक माहिति आहे का? .
लेख वर्गीकरण

वाचने 5201
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

गुलामी,राजेशाही,राणीपद.. काळ गेला तो ..असे त्यांना सांगायचे असेल रे अवी. ..

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आधुनिक विचारसरणीवाले ११-१२-१३ तर जुनी मंडळी गुलाम्/राजा/राणी.

माई( भिक्षुकाच्या आवाजात)
अन एक मजेदार गोष्ट आढळली..गुलाम राणी राजा आदी कॅट मधे होतेच पण त्या बरोबर ११-१२-१३ अशी पाने पण आहेत..
असे लिहिलेले आहे

कुठल्यातरी जादूच्या साहित्यापैकी एक आणला गेला असेल .. हि सर्व काम त्या सर्कशीतल्या किंवा वाढदिवसाला जादूचे प्रयोग दाखवणाऱ्या जादूगारांची आहेत .. परत करा आणि साधे पत्ते घेऊन या. आणि मलाही तीन पत्ती खेळायला बोलवा. अजूनपर्यंत तरी हरलो नाही आहे यामध्ये .. स्वतःला deltin कसिनोमध्ये पण अजमावून आलो . जिंकलो नाही पण जेव्हढे ५००० टाकले होते प्रवेशासाठी तेव्हढे परत मिळवले .. बोलवाल ना मला , वाट बघतोय .