मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मॉन्टी हॉल प्रॉब्लेम.

गवि · · काथ्याकूट
आंतरजाल न वापरता प्रामाणिकपणे मनात येणारं जे काही असेल ते उत्तर लिहायचं आहे. चर्चा नंतर करु. अनेकांना हा प्रश्न माहीत असेल. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी.. काहीसा स्वैर रुपांतर करुन. एका लकी ड्रॉ टाईप रियालिटी शोमध्ये स्टेजवर तीन बंद दरवाजे आहेत. त्यातल्या कोणत्यातरी एका दरवाज्यामागे बंपर इनाम ऊर्फ बीएमडब्लू x१ कार लपलेली आहे. बाकी दोन दरवाज्यांमागे प्रत्येकी एक एक बोकड आहे. तुम्ही एक दरवाजा निवडायचा आहे. त्या दरवाजामागे काय निघेल त्यावर बीएमडब्लू किंवा मटणरस्सा नेमकं काय नशिबात आहे ते ठरेल. मटणरस्सा एरवी परवडत असल्याने आपल्याला कार जिंकायचीच इच्छा आहे. रियालिटी शोचा होस्ट तुम्हाला चॉईस विचारतो.. दरवाजा क्रमांक एक, दोन की तीन? तुम्ही सांगता दरवाजा नंबर "एक". पण होस्ट दरवाजा नंबर एक उघडण्याऐवजी दरवाजा नंबर तीन उघडतो आणि आत बोकड दिसतो. होस्ट आता उदारपणे ऑफर करतो.. "बघा, तीन नंबरला बोकड आहे, आता उरले दोन दरवाजे.. नंबर एक आणि नंबर दोन.. तुम्ही नंबर एकचा दरवाजा आधीच निवडला आहे. तुम्हाला आता चॉईस बदलायचा असला तर मी संधी देतो.. बोला.. " नोंद घ्या: ही ट्रिक ते नेहमी वापरतात. का कोण जाणे.. पण एक मात्र आहे की होस्ट जो दरवाजा तुम्हाला उघडून दाखवतो तो नेहमी बोकडवाल्यांपैकीच एक असतो. (म्हणजे निरुपयोगी) आणि त्यामुळे आता दोनच बंद दरवाजे उरतात.. एक कारवाला आणि एक बोकडवाला.. त्यातला कोणतातरी एक तुम्ही आधीच सिलेक्ट केलेला असतो. आता अशा स्थितीत नंबर तीनचा दरवाजा बोकडवाला आहे हे होस्टने उदारपणे उघड करून देऊन चॉईस बदलण्याची ऑफर केल्यावर तुम्ही मुळात निवडलेला चॉईस, म्हणजे इथे दरवाजा नंबर १ हा तसाच ठेवाल की बदलून दरवाजा नंबर २ निवडाल ? का?

वाचने 18934 वाचनखूण प्रतिक्रिया 35

Blackcat 12/01/2019 - 12:43
अमिताभचा 3 पत्ती मूवी बघा

अर्धवटराव 12/01/2019 - 13:35
पण कदाचीत पहिल्या चॉईसवर ठाम असेल. नशीबाचे फासे फेकण्याचं एक्साइटमेण्ट पहिल्या चॉईसच्यावेळी जेव्हढं स्ट्राँग असेल तेव्हढं कदाचीत दुसर्‍यावेळी नसणार. शिवाय तिसरा दरवाजा बोकडाचा निघाला म्हणजे आपला चॉईस ५०% बरोब्बर आहे हे एक समाधान+आशा मनात असेल.

In reply to by आनन्दा

गवि 12/01/2019 - 16:49
असं समजा की तो तुम्ही केलेला चॉईस सोडून बाकीच्यातला कोणताही एक दरवाजा उघडतो. - त्यात कार दिसली तर "सॉरी, तुम्ही हरलात" असं म्हणून गेम संपवतो. - त्यात जर बोकड दिसला तर तुम्हाला चॉईस देतो की मूळ निवड बदलायची आहे का? आता काय कराल ? काही फरक आहे का?

In reply to by दादा कोंडके

Blackcat 12/01/2019 - 16:49
धाग्याचे मालक बोलले आहेत , गुगल करू नका , म्हणून इथे लिंक देत नाही.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

दादा कोंडके 12/01/2019 - 22:31
इथं उत्तर वाचूनही मला प्रोबॅबिलिटी ५०-५० वाटली होती. गुगल्यावर कळलं. कारण मिमांसा अनेक पद्धतीनं दिली आहे. त्यातल्या काही इंट्युटिव्ह आहेत.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ 12/01/2019 - 21:37
स्टेटीटिक्स सांगते की उत्तर बदलले तर जिंकण्याचे चान्सेस वाढतात , काहीही, स्टेटीटिक्स काय वाचुन येते का ? का तुम्हाला ते गुढग्यासाठी धनगराच तेल वापरण्या ईतक सोप्प वाटल ?

In reply to by डँबिस००७

Blackcat 12/01/2019 - 22:06
Here’s the game: Do you stick with door A (original guess) or switch to the unopened door? Does it matter? Surprisingly, the odds aren’t 50-50. If you switch doors you’ll win 2/3 of the time! Today let’s get an intuition for why a simple game could be so baffling. The game is really about re-evaluating your decisions as new information emerges. काहीतरी गूढ आहे , म्हणूनच हे कोडे आहे ना ?

In reply to by आनन्दा

गवि 12/01/2019 - 22:46
होस्ट नेहमी बोकडवालं दारच उघडून दाखवतो हे गृहीतक धाग्यात उल्लेखलं आहे. यातच हे अध्याहृत आहे की त्याने उर्वरित दोन्ही दरवाजामागे काय आहे ते पाहिलेलं आहे.

In reply to by गवि

पहिल्या एक दोन सिजन्समध्ये जर एखादा स्पर्धक चुकीचे उत्तर देता असेल तर अमिताभ आवर्जून तीन चार पाच वेळा सांगायचे -'अजून विचार करा', 'नक्की?', 'आपल्याकडे पुष्कळ वेळ आहे तुम्ही विचार करा', 'तुम्ही पर्याय बदलू शकता'. जेव्हा आपल्याला बरोबर उत्तर माहिती असते आणि स्पर्धक चुकीचा पर्याय निवडतोय तेव्हा (उपयोग नसताना) आपण घरून त्याला सांगतो, अरे तो एवढा जीव तोडून सांगतोय, पर्याय बदल!!

In reply to by तुषार काळभोर

mrcoolguynice 14/01/2019 - 10:52
जेव्हा आपल्याला बरोबर उत्तर माहिती असते आणि स्पर्धक चुकीचा पर्याय निवडतोय तेव्हा (उपयोग नसताना) आपण घरून त्याला सांगतो, अरे तो एवढा जीव तोडून सांगतोय, पर्याय बदल!!
ही प्रतिक्रिया विशेष आवडली .... पटतंय

यशवंत पाटील 13/01/2019 - 12:50
बदलुन आता नंबर दोन. कार नक्की बगा. कोणच्यातरी सिनेमात व्हतं म्हणे हे. आमचे साहेब लेक्चर देत व्हते मला तवा स्टोरी सांगितले व्हते, म्हणूनशान ध्यानात हाय.

In reply to by यशवंत पाटील

Blackcat 13/01/2019 - 15:13
बच्चन आणि साक्षात महात्मा बेन किंगले आहेत. तोच का ? बचचनाचा डायलॉग आहे , जर एखादा ऑप्शन समोर असेल , तो फिक्स केला आहे आणि अचानक दुसरा ऑप्शन आला तर काय कराल ? बच्चंन चे म्हणणे की नवा ऑप्शन फायदेशीर असतो म्हणे . ( बहुतेक हे ऐशवर्याने सलमानला नाकारून अभिषेकला हो म्हटल्याबद्दल आहे का , माहीत नाही . ) त्यात बच्चंन गणिती प्रोफेसर असतो व महात्मा बेन जादूगार असतो , बच्चन त्याची गोष्ट सांगतो तर सिनेमाच संपतो , महात्मा बेन ची गोष्ट बहुतेक शिकवेलमध्ये येईल , पण तो भाग अजून आलाच नाही .

कपिलमुनी 13/01/2019 - 12:55
2019 साली निवडणूकीच्या दाराने मागचा बोकड बदला ! असा संदेश देऊ इच्छितात का ??

In reply to by कपिलमुनी

Blackcat 13/01/2019 - 15:05
मीही हेच लिहिणार होतो , पण लोक वराडतील म्हणून लीवले नव्हते

लई भारी 14/01/2019 - 12:36
होस्टला उत्तर माहित होत असं मी गृहीत धरलं होत आणि खाली स्क्रॉल करताना आपण ते लिहिलंच आहे असं दिसलं. आता होस्ट आपल्या बाजूने नसणार हे दुसरं गृहीतक. त्यामुळे तो आपलं बरोबर उत्तर बदलायला भाग पाडतोय असा विचार करून पर्याय १ च कायम ठेवेन. आता ते स्टॅटिस्टिक्स वगैरे काय विचार केला नाही म्हणा :)

स्वधर्म 14/01/2019 - 14:30
त्याने तुंम्हाला कसा फरक पडेल? वैद्यकात पण स्टॅटेस्टीक्स अाहेच. समजा मला एक उपचार पध्दती निवडायची अाहे, ज्यामध्ये ९०% लोक वाचतात, १०% मरतात असे स्टॅटेस्टीक्स सांगते. पण स्टॅटेस्टीक्स हे कधीच सांगू शकत नाही की मी ९०% त असणार अाहे की १०% त असणार अाहे. मी अजून गुगल करून पाहिलेले नाही. पण स्टॅटेस्टीक्स पेक्षा इथे होस्टबाबतचा अंदाज अाधिक वापरला जाणार अाहे. होस्ट अापल्याला जिंकू देण्याकडे झुकलेला असेल की शक्यतो कार जिंकली जाऊ नये हे पाहणारा असेल, याचा अंदाज निवड ठरवतो. या अशा प्रकारात स्टॅटेस्टीक्सवर भरवसा ठेवण्याने फार काही फरक पडेल असे वाटत नाही. यावरून स्टॅटेस्टीक्स बाबतचा एक विनोद अाठवला. संख्याशास्त्रज्ञ जर विमानातून जाणार असेल, तर तो नेहमी स्वत:बरोबर एक पिस्तूल ठेवेल. कारण कोणीही विमानात पिस्तूल अाणण्याची शक्यता लाखात एक अाहे, पण कोणी दोन व्यक्तींनी विमानात पिस्तूल अाणण्याची शक्यता मात्र ४ लाखात एक अाहे. सबब संख्याशास्त्रज्ञ अापल्यासोबत पिस्तूल नेऊन अापला धोका चार पट कमी करेल. पण हा विनोद अाहे! अाता गुगल करून पहायला मोकळा.

Blackcat 14/01/2019 - 15:11
आमचेही सर विनोद सांगायचे. एक संख्याशास्त्रज्ञ शिकारीला जातो , तो वाघावर दोन गोळ्या झाडतो. एक वाघाच्या पुढून 1 फूट अंतरावरून जाते , दुसरी गोळी वाघाच्या मागून 1 फुटावरून जाते, तो हिशोब करतो , वाघ मेला ! दोघांची सरासरी सेंटरला येते

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे 16/01/2019 - 12:21
आपले डोके भट्टीत ठेवले आणि पाय बर्फाच्या पेटित ठेवले तर सरासरी तपमान २३ अंश सेल्सियस असल्याने आपल्याला आल्हाददायक वाटते असे संख्याशास्त्र सांगते.

अकिलिज 14/01/2019 - 20:31
होस्ट असं फुकट गाडी द्यायला नाही बसलाय. त्याला तुम्हाला गाडी जिंकूच द्यायची नाहीये. म्हणुनच तर त्याने पुढचा पर्याय विचारला असावा. दरवाजा नंबर १ वर गाडी असती आणि त्याला द्यायची असती तर त्याने उगाच पर्याय बदलायची संधी दिली नसती. जरा उशीरानं गुगलुन बघतो.