मासिक पाळी, शरीर विज्ञान आणि अंधश्रद्धा
मिपाच्या चालू घडामोडी धाग्यावरील साबरीमाला चर्चा दुसर्या सदस्य महोदयांना मासिक पाळी अपवित्र वाटते या मुद्यावर आली तेव्हा मध्येच सोडून दिली. (माझी वैचारीक बाजू लावून धरण्याची व्यवस्थित क्षमता असूनही) कारण मासिक पाळी , शरीर विज्ञान आणि अंधश्रद्धा हा स्वतंत्रपणे चर्चा करण्याची गरज असलेला विषय असावा. मासिक पाळी विषयक शरीर विज्ञान , श्रद्धा - अंधश्रद्धा या बद्दल चर्चा करण्याची खरेच गरज नाही का ? गेल्या वर्षाभरातील काही सर्वसाधारण अनुभव एका देवीच्या मंदिरापाशी एक जोडपे पोहोचते पाळीच्या कारणाने नवरा एकटाच मंदिरात जातो पत्नी स्वतःहून मागे बाहेर उभी टाकते. मंदिरात गेले काय नाही गेले काय, काय फरक पडतो ? एका महाविद्यालयातील एक विद्यार्थिनी कॉलेजचे वर्ग मधात सोडून घरी परतली , कारण पॅड ओव्हर फ्लो महाविद्यालय असो वा इतर संस्थातील सुविधांबद्दलची अनुत्तरीत प्रश्ने आणि न झालेल्या चर्चा ? केवळ सर्वसाधारण शिक्षण वाढल्यामुळे प्रश्न मिटतात ? मग संपूर्ण साक्षरता असलेल्या केरळात असो वा युरोमेरीकेतील प्रश्न असोत मिटलेत ? आणि भारतातील वयात येणार्या मुलींच्या मोठ्या प्रमाणात शालेय शिक्षण अर्धवट सोडण्या मागे अद्यापही मासिक पाळी व्यवस्थापन हि एक ठळक समस्या आहे त्याचे काय ?
मिपा आणि मायबोलीचा शोध घेतला, मायबोलीवर अंधश्रद्धा विषयक अल्प चर्चा मागे केव्हा तरी होऊन गेल्याचे दिसले, मिपावरही अल्प अनुषंगिक चर्चा झाल्या असाव्यात पण सविस्तर चर्चा झाल्याचे दिसले नाही.
हा चर्चा प्रस्ताव टाकण्या आधी दोनदा तरी हात आखडता घेऊन थांबून राहीलो. साबरीमाला अनुषंगाने मासिक पाळी अपवित्र मानणारी (?) मंडळी चालू घडामोडी धाग्यावर आपले मुद्दे रेटत असताना मिपाकर विशुमित यांनी त्यांच्या प्रतिसादातून "क्षमा करा वैयक्तिक वाटून घेऊ नका, तुमच्या घरातील माताभगिनींचा आदर ठेवून विचारतो,खरंच 100% विटाळ पाळला जातो का??" असा प्रश्न उपस्थित केलेला दिसला तेव्हा या अनुषंगाने एकुणच चर्चा पुढे नेता येईल असे वाटले.
या चर्चा धाग्यात साबरीमाला प्रवेशाबाबत खुपशी चर्चा अपेक्षित नाही. मुख्य धागाचर्चा विषय मासिक पाळी शरीर विज्ञान आणि अंधश्रद्धा असा आहे.
चर्चेसाठी काही प्रश्न मांडतो .
१.१ ) मासिक पाळी म्हणजे काय ? शरीर विज्ञानाच्या दृष्टीकोणातून स्पष्ट करा , शरीरविज्ञानाच्या दृष्टीने सुयोग्य दर्जायुक्त मराठी हिंदी इंग्रजी युट्यूब दुवेही उपलब्ध केल्यास उत्तमच
१. २.१.१ ) मासिकपाळी विषयक आपणास समाजावरील प्रभाव असलेल्या कोणत्या पौराणिक कथा माहित आहेत ? विशेषतः इंद्र आणि ऋषिपंचमी विषयक कथा कोणत्या आहेत ? यातील काही कथांनी स्त्रीमनांवर मासिकपाळी विषयक अपराधीत्वाची भावना निर्माण होण्यास अप्रत्यक्ष कारणीभूत राहील्या असण्याची आपणास शक्यता वाटते का ? कथेच्या प्रभावाची आणि या कथेच्या आर्थीक निम्नस्तरीय आणि ग्रामीण प्रभावाची सद्यस्थितीची आपणास कल्पना असल्यास माहिती हवी आहे .
१.२.१.२) पुर्वी ज्याकाळात पाळीच्या तारखांवर औषधी नियंत्रण शक्य नव्हते तेव्हा विवाह मुहूर्त पाळण्याची अंधश्रद्धा पण जोरदार होती आणि पाळी चे दिवस अपवित्र समजले जात त्या काळात विवाह मुहूर्त पाळण्यास प्राधान्य द्यावे लागत असेल तर या दोन गोष्टींचा मेळ जुन्या काळातले लोक कसे घालत असत ?
१.२.२) मासिक पाळी विषयक आपल्या व्यक्तिगत / आपल्या कुटूंबीयांच्या / आपल्या नातेवाईकांच्या / परिचीतांच्या / कार्यालयीन कर्मचार्यांच्या ते आपल्याकडे काम करणार्यांच्या श्रद्धा अंधश्रद्धांचे सद्य स्वरुप कसे आहे ( महाराष्ट्राबाहेरील स्थितीची कल्पना देण्यास हरकत नाही पण या प्रश्नाद्वारे मुख्यत्वे महाराष्ट्रातील सद्य श्रद्धा स्थिती बाबत जाणून घ्यायचे आहे )
१.२.३) श्रद्धा अंधश्रद्धां च्या कारणाने आपण व्यक्तिशः / आपल्या कुटूंबीयांच्या / आपल्या नातेवाईकांच्या / परिचीतांच्या / कार्यालयीन कर्मचार्यांच्या /घरकाम करणार्यांच्या औषधे आणि वैद्यकीय उपायांनी मासिकपाळी च्या तारखा बदलली जात असल्याबद्दल सद्य स्वरुप कसे आहे . मासिकपाळी च्या तारखा बदल ण्याचे अथवा गोळ्या औषधांचे इतर काही दुष्परिणाम असतात की दुष्परिणाम सहन करायचे असतात की
१.२.३) केवळ हिंदूंच्याच अंधश्रद्धांची चर्चा करतो आहोत असा आक्षेप नको, मुस्लिमांमधील मासिकपाळी विषयक अंधश्रद्धांची सुद्धा माहिती द्या, तसेच एका धर्मातील अंधश्रद्धांचा आधार घेऊन दुसर्या धर्मातील अंधश्रद्धांचे समर्थन टाळले जाईल हि अपेक्षा
१.३) घरकामासाठी स्त्री मदतनीस ठेवणार्या आपण स्त्री आहात ? आर्थिक सुस्थित वर्गीयांकडे सर्वसाधारणपणे घरकाम करण्यासाठी स्त्रीया येतात त्यांनाही मासिकपाळीच्या समस्या असू शकणार त्यांच्या आणि तुमच्या सध्याच्या त्यांचे काम, सुट्ट्या आणि श्रद्धा अनुषंगाने त्यांच्या पिएम एस आणि पाळी समस्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने आपण संवाद साधून त्यांना सहकार्य एक एम्प्लॉयर म्हणून आपण पुरवता का ? आपल्या सहकार्याचे स्वरुप काय असते ?
२) पि एम एस म्हणजे काय ? या बद्दल पि एम एस बद्दल मिपावर एक चांगला धागा लेख आहे . त्या धागा लेखाचा दुवा उपलब्ध करुन देण्यापुर्वी किंवा वाचण्यापुर्वी पि एम एस म्हणजे काय ? ह्याची किती जणांना किंवा आपल्याला स्वतःस कल्पना असल्यास आपल्या परिचयातील किती जणांना कल्पना आहे ?
२.२ ) पि एम एस बद्दलच्या आधीच्या धाग्यात व्यक्तिगत जिवनातील समस्या व्यवस्थापनाबद्द्ल चर्चा दिसते पण नौकरी दरम्यानच्या पि एम एस व्यवस्थापनाबद्दल चर्चा दिसत नाही . ऑफीस असो का फिल्डवर्क पि एम एस बाबत काम करताना कोणत्या समस्या स्त्रीयांना येतात ? संस्थेत काम करणार्या स्त्रियांच्या पि एम एस समस्यांमुळे संस्थेचे काम , संस्थेची उत्पादकता , संस्थेची ग्राहकाभिमुखता , कर्मचार्यातील खेळीमेळीचे वातावरण प्रभावित होण्याच्या शक्यता असू शकतात का ? संस्थेचे काम , संस्थेची उत्पादकता , संस्थेची ग्राहकाभिमुखता , कर्मचार्यातील खेळीमेळीचे वातावरण प्रभावित होऊ नये यासाठी पि एम एस समस्यांचे व्यवस्थापन कशा पद्धतीने व्हावे असे आपणास वाटते ?
३) मासिक पाळी आणि पि एम एस बाबत पुरुषांना जागरुक करण्याची गरज आहे का ? पुरुषांना कोणत्या वयात आणि कोणत्या मुद्यांवर जागरुक करावे असे वाटते ?
४) मासिक पाळी विषयक बर्याच युट्यूब मराठी आणि हिंदीत दिसतात त्यातील कोणत्या युट्यूबवरील माहिती शरीर विज्ञानाच्या दृष्टीने योग्य आणि उपयूक्त वाटते कोणत्या युट्यूबवरील माहिती त्रुटीयूक्त वाटते ?
५) क्रिडा, नृत्य , ते लष्करी निमलष्करी दलातील ते श्रमीक स्त्रीया पिएमएस आणि पाळीच्या दिवसातही कार्यरत दिसतात त्यांचे या विशेष दिवसांचे व्यवस्थापन त्या कसे करतात ?
६) चर्चेस योग्य अजून काही प्रश्न असल्यास जोडावेत. अनुषंगिकाव्यतरीक्त चर्चा टाळण्यास आणि चर्चा सहभागासाठी आभार
* युरोमेरीकेतील समस्यांचर्चेबाबत Period Power: A Manifesto for the Menstrual Movement हे Nadya Okamoto यांचे पुस्तक (मी बातमी वाचून चाळले आहे पूर्ण वाचलेले नाही) बर्यापैकी प्रकाश टाकत असावे .
*** मिपावर उपलब्ध अनुषंगिक लेख आणि प्रतिसाद***
* रजोनिवृत्ति विषयक डॉ. सुबोध खरे यांचे मिपावरील लेख 'मध्य वयातील वादळ' : १ , २
याद्या
13351
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
गंभीर विषय पण तितकाच महत्वाचा
सहमत
सहमत
मुळात मंदिरात जाणे हा भागच
...पण एखाद्या स्त्रीला मासिक
In reply to मुळात मंदिरात जाणे हा भागच by सुबोध खरे
धागा पुन्हा वर काढतोय
३) मासिक पाळी आणि पि एम एस
हिंदू समाज हा मागास आहे आसा गोड गैरसमज स्वतःच करून तो पसरवला
निसटत्या बाजू १
In reply to हिंदू समाज हा मागास आहे आसा गोड गैरसमज स्वतःच करून तो पसरवला by Rajesh188
छान प्रतिसाद. ===
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
बऱ्याच प्रकारच्या अंधश्रद्धा न मध्ये पीडित कोण हे ठरवता येत नाही
ग्रहणाची वेळ म्हणून एकवेळ
In reply to बऱ्याच प्रकारच्या अंधश्रद्धा न मध्ये पीडित कोण हे ठरवता येत नाही by Rajesh188
जरासे विषयांतर होते आहे पण
Argumentum ad populum चा दुवा
In reply to जरासे विषयांतर होते आहे पण by माहितगार