वाट्सअॅपमुळे मराठी सं.स्थळे मंदावली आहेत काय ?
रामराम मंडळी, मंडळी. कोणतीही नवीन गोष्ट काही दिवसच चांगली वाटते. सर्वसामान्य माणसांचा स्वभावच चंचल असतो. एका गोष्टीत तो फार काळ रमत नाही. मग ते मोबाईल, गाडी टीव्ही, किंवा काही नवीन उपयोगाची उपकरणे असोत की, लेखन करण्यासाठीची माध्यमं जशी की, फेसबूक, वाट्सअॅप, ब्लॉग की ड्रुपलवर आधारित असलेली मराठी संस्थळे असोत. काळाप्रमाणे त्याचा उपयोग कमी जास्त होत असतो. मराठी संकेतस्थळांना आता पंधरा वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे, मराठी माणसं लालित्यपूर्ण लेखन करतात कमी आणि भांडतात जास्त असा माझा एक व्यक्तिगत अनुभव आहे. गेल्या काही वर्षात लेखनाच्या बाबतीत काही बदल झपाट्याने झाले आहेत. जसे अगदी सुरुवातीला ब्लॉग लिहिल्या जायचे, प्रत्येक लिहिता वाचता येणारा ब्लॉग लिहित होता, आता सर्वच ब्लॉग लिहित नसतील पण हे प्रमाण कधीकाळी खूप होतं. नंतर जिमेल चॅटींग जोरात सुरु झालं. बझर वगैरे. नंतर फेसबूकानं जोर धरला. आणि आत्ता वाटसअॅप.
वाटसअॅपने काही सुविधा खूप दिल्या आहेत. एखादे दोन उतारे असलेल्या पोष्ट्स, कुठल्या तरी पोष्टला तात्काळ उत्तर, आपली पोष्ट किती लोकांनी वाचली त्याच्या नोंदी, तात्काळ निरोप देवाण-घेवाण. प्रेमाच्या गोष्टी, लफडी आणि तत्सम गोष्टींनी वाट्सअॅप रात्रंदिवस बीझी झालं आहे. मोबाईल काही क्षण जरी इकडे तिकडे झाला की अरे, आत्ता तर मोबाईल इथे होता, कुठे गेला, अशी शोधाशोध सुरु होते. इतकं तंत्रज्ञानांनी माणसं व्यस्त होऊन गेली आहेत. आम्ही तर बॉ वाट्सअॅप पाहात सुद्धा नाही, अशी म्हणनारी माणसं असतीलच यात काही वाद नाही. पण, कधीकाळी ज्या मराठी संस्थळांनी अक्षरक्ष वेड लावलं होतं, ते वेड आता कमी झालंय का असे वाटायला लागले आहे. एखादी दुसरीच सुंदर कविता, त्यावर एकापेक्षा एक दिली जाणारी दाद, काही उत्तम कथा, काही उत्तम लालित्यपूर्ण लेखन, पर्यटन, गड किल्ले, यांची माहिती त्याची मात्र संख्या मंदावली आहे काय, असे वाटायला लागले आहे. काथ्याकूट मात्र जोरात असतो. पण तेवढ्यावर मराठी संस्थळे जगतील असे मला काही वाटत नाही.
माणसं येतात आणि जातात. नवी पिढी येते ती आपली काही वैशिष्टे घेऊन. तेव्हा नव्या काळात मराठी संस्थळे कशी असतील. त्यावर येणारे लेखन कसे असेल ? अशा संस्थळावर आपण केलेलं लेखन असतं, किती लोकांनी दाद दिली याची उत्सुकता असते. अनेकदा झालेलं विषयांतर आपलं लिहिण्याचा उत्साह घालवतो. काही आयडी सतत आनंदावर विरजन घालायलाच आलेली असतात, त्यापेक्षा वाट्सअॅप बरं असंही वाटू शकतं, त्यामुळेही लेखन कमी येत आहे, असे होऊ शकते. हे सर्व असूनही मराठी संस्थळे भविष्यात कशी असतील, नवनव्या तंत्र माध्यमात मिपासारख्या चहल-पहल असलेल्या संस्थळाला भविष्यात काय करावे लागेल, आणि अजून आपणास काय वाटते, आपली काय मतं आहेत ते समजून घेण्यासाठीचा हा काथ्याकूट तेव्हा आपल्या प्रतिसादाची वाट पाहतोय. स्वागत. :)
मिसळपाव
मला वाटते
मुद्दा महत्वाचाच आहे.
In reply to मला वाटते by प्रसाद_१९८२
सेंसॉरशीप समर्थनार्थ खापरफोड ?
In reply to मुद्दा महत्वाचाच आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजिबात नाही.
In reply to सेंसॉरशीप समर्थनार्थ खापरफोड ? by माहितगार
विदा ?, संदर्भ ?
सध्या अंदाजपंचे निरीक्षण आहे.
In reply to विदा ?, संदर्भ ? by माहितगार
संदर्भ ?
In reply to विदा ?, संदर्भ ? by माहितगार
साशंक
In reply to संदर्भ ? by प्रसाद_१९८२
+११,१११
In reply to संदर्भ ? by प्रसाद_१९८२
>>> मनापासुन पटले!!!
In reply to संदर्भ ? by प्रसाद_१९८२
एकाग्रता कालावधी (Attention span)
सहमत
In reply to एकाग्रता कालावधी (Attention span) by सतिश गावडे
>> एकाग्रता कालावधी
In reply to एकाग्रता कालावधी (Attention span) by सतिश गावडे
मिपाच्या सदस्यसंख्येचा
पुरवणी....
In reply to मिपाच्या सदस्यसंख्येचा by नितिन थत्ते
मी गूगल ट्रेंड्स आणि अलेक्सा
In reply to पुरवणी.... by नितिन थत्ते
ऐसि अक्षरे साठी गूगल ट्रेंड
In reply to मी गूगल ट्रेंड्स आणि अलेक्सा by माहितगार
तुम्हाला खरेच वाटते का या
In reply to ऐसि अक्षरे साठी गूगल ट्रेंड by माहितगार
भारतीय स्वतः आकडेवारी बद्दल
In reply to तुम्हाला खरेच वाटते का या by सतिश गावडे
प्रा.डॉ.
लेखाच्या आशयाशी सहमत
एखाद्या अनवट वाटेवर असलेल्या
एक निरीक्षण:
In reply to एखाद्या अनवट वाटेवर असलेल्या by सोमनाथ खांदवे
वाट्सअॅपमुळे मराठी सं.स्थळे
वाट्सअॅपमुळे मराठी सं.स्थळे मंदावली आहेत काय ?>>>> मते ह्या प्रश्नाचे उत्तर " होय" असे आहे. असे होण्याची अनेक कारणे आहे पं माझ्या मते सगळ्यात मोठ्ठे कारण म्हणजे तुम्हाला कोणाशी कोणत्या विषयावर चर्चा करायची आहे / करायला आवडेल हे निवडाण्याचे स्वातंत्र्य ! आमचा वैयक्तिक व्हॉट्सॅप्प चा अनुभव असा आहे कि सुरुवातीला अनेक लोकं होतं कंपु मध्ये . जसे जसे मतभेद व्हायला लागले अन टोकाला जायला लागले तसे तसे एकेक करुन लोकं ग्रुप सोडुन गेले. आणि मग उरलेल्या ग्रुपमध्ये इतका कंफर्ट लेव्हल येत गेला कि आता कोणा नवीन माणासाला ग्रुप मध्ये अॅड करण्या आधी विचार केला जातो . आजच्या घडीला ग्रुपमध्ये मोजके १० मिपाकर आहेत ! आणि सगळ्यांची सगळीच मते जुळतात असे नाही. काही कट्टर भाजपा समर्थक आहेत तर काही भाजपापेक्षा राष्ट्रवादी बरी अशा विचाराचे !! चर्चा होतातच पण जिथे अति ताणले जात आहे तिथं थांबवण्याचा सारासार विवेक सगळ्यांकडे आहे ! कितीही मतभेद झाले तरी कोणीही कोणावर " अज्ञानमुलक , असमंजस , पुर्वग्रहदुषित" असले शब्द फेकत नाही. कोणालाही धर्मसुधारणा करायची नाहीये की समाजसुधारणा करायची नाहीये . आहे हे आहे असं इन्जोय करु असा साधा अत्तीतुडे सगळ्यांचाच असल्याने कसं भारी वाटतं !! देशी गांईचा गोठा, ग्लोबल वार्मिंग आणि ट्रेड वॉर , किल्ल्यांची रचना , पुढील ट्रिप चे प्लॅन , इन्व्हेस्टमेन्ट ऑपॉर्च्युनिटीज , ञ , ङ ह्यांचे उच्चार आणि मराठी चे व्याकरण सनीताई लिऑने, संक्लिद्य अनावृता , नेट्फ्लिक्स वरील सीरीयल्स , पुण्यातील खाडाडीच्या जागा , अशा आणि अनेक इतर विषयांवरील गप्पा होत असताना एकदम मिसळपाव खाल्ल्यासारखे वाटते तेही व्यक्तिगत अभिनिवेशाचे अन चिखलफेकीचे खडे नसलेली !! एकुणाच इतका कंफर्ट झोन तयार झाल्याने मिपावर धागा काढत बसण्या पेक्षा ग्रुपवर चर्चा करायला मजा येते ! :)खर आहे.
In reply to वाट्सअॅपमुळे मराठी सं.स्थळे by प्रसाद गोडबोले
अट फक्त एकच विषय शेअर
In reply to खर आहे. by शाम भागवत
संस्थळावर कोणती चर्चा, कोणता
तुम्ही सर्च ट्रेंड पाहिले
सर्वच मुद्द्यांवर सहमती आहे.
जोरदार चर्चा फक्त दोन तीन
In reply to सर्वच मुद्द्यांवर सहमती आहे. by गवि
ललित तर पार कालबाह्य ठरलं आहे
In reply to सर्वच मुद्द्यांवर सहमती आहे. by गवि
वाटसप कितीही मोठ्ठा ग्रुप
,,,,बाकी दोन वर्षांपूर्वी
In reply to वाटसप कितीही मोठ्ठा ग्रुप by कंजूस
सर, तुम्ही व्हॉट्सअॅपपुरता
साशंकता
In reply to सर, तुम्ही व्हॉट्सअॅपपुरता by पुंबा
अक्षरशः थोर म्हणावे असे लिखाण
In reply to सर, तुम्ही व्हॉट्सअॅपपुरता by पुंबा
हो. खवत देतो..
In reply to अक्षरशः थोर म्हणावे असे लिखाण by एमी
मलाही पाठवाल
In reply to हो. खवत देतो.. by पुंबा
मी लिस्ट करतो आहे, आपणासही
In reply to मलाही पाठवाल by सप्तरंगी
फेसबुकवर जुने लेख आणि जुन्या
In reply to मी लिस्ट करतो आहे, आपणासही by पुंबा
अगदी सोपे आहे. सर्च
In reply to फेसबुकवर जुने लेख आणि जुन्या by माहितगार
परिश्रमाने बनवलेली यादी,
In reply to मी लिस्ट करतो आहे, आपणासही by पुंबा
अगदी मनातले बोललात.
In reply to परिश्रमाने बनवलेली यादी, by डॉ सुहास म्हात्रे
फक्त संस्थळे मंदावायचा विषय
राजकीय धाग्यांचा रतीब मिपा वर
मला राजकीय घागे फक्त वाचायला
In reply to राजकीय धाग्यांचा रतीब मिपा वर by मालोजीराव
सर , कायप्पा हे तात्कालिक आहे
भारतात कोकाकोला आल्यामुळे
अलेक्सा आणि गूगल ट्रेंड्सचं
काहीही घडत नाही
असो
In reply to काहीही घडत नाही by सप्तरंगी
अगदीच मान्य
In reply to असो by माहितगार
आतापर्यंत सगळ्यांच्या (
In reply to असो by माहितगार
मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार
In reply to आतापर्यंत सगळ्यांच्या ( by यशोधरा
तुम्ही स्वतःला सोयीस्कर अशी
In reply to मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार by माहितगार
लोकांना तुमच्या इतका मोकळा
In reply to तुम्ही स्वतःला सोयीस्कर अशी by यशोधरा
माझे अधिक धागे नको असतील तर
In reply to लोकांना तुमच्या इतका मोकळा by माहितगार
माझेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य
In reply to माझे अधिक धागे नको असतील तर by यशोधरा
किती अयले, किती गयले.
In reply to माझेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य by माहितगार
अजून दोन उणीवा राहील्या
In reply to आतापर्यंत सगळ्यांच्या ( by यशोधरा
@माहीतगारजी,
In reply to अजून दोन उणीवा राहील्या by माहितगार
हायला!
In reply to @माहीतगारजी, by अभ्या..
आठ्वण येणारच डांगेआण्णाची,
In reply to हायला! by चांदणे संदीप
अभ्या मित्रा
In reply to @माहीतगारजी, by अभ्या..
धन्यवाद धन्यवाद,
In reply to अभ्या मित्रा by खिलजि
अर्रे वा , खरंच कि काय ..
In reply to धन्यवाद धन्यवाद, by अभ्या..
मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार.
In reply to @माहीतगारजी, by अभ्या..
आपल्याला न पटणार्या
In reply to मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार. by माहितगार
=))
In reply to आपल्याला न पटणार्या by अभ्या..
हा धागा उजवीकडे कसा काय गेला?
पोच.
प्राडॉ ,
In reply to पोच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अनेक आभार हं :)
In reply to प्राडॉ , by सोमनाथ खांदवे
मी आज पर्यंत व्हाट्सएपच्या
In reply to प्राडॉ , by सोमनाथ खांदवे
स्तुती सुमने उधळल्या बद्दल
In reply to मी आज पर्यंत व्हाट्सएपच्या by सतिश गावडे
वाट्सअॅपमुळे मराठी सं.स्थळे
धागा विषयाला सहमती!
संपादक मंडळाने ललीतलेखन संबंधी जास्तीत जास्त उपक्रम राबवणे
कन्टेन्ट क्वालिटी वर ठेवायला हे उपयोगी पडेल, मराठी दिनाच्या बोलीभाषा लेखमालेमुळेच मला मिपाचे सदस्यत्व घावे वाटले हे ही इथे मी आवर्जून नमूद करतो, अर्थात, एक उपक्रम राबवायचा म्हणजे संपादक/मालक/साहित्य संपादक मंडळीला किती मानवी तास घालवावे लागतात ह्याची मला पूर्ण कल्पना आहेच. पण तुमच्या हातात संपादकत्व, मालकीचे हक्क आहेत, एक मेंबर म्हणून उठून मी उपक्रम राबवतो म्हणलं तर जमेल असे नाहीये. त्यामुळे सगळ्या संपादक अन मालकांनाही खास नम्र विनंती की उपक्रम वाढवा, भरपूर वाढवा अर्थात आपलं वैयक्तिक आयुष्य आणि कार्यव्याप सांभाळून(च) . इतकं केलं तरी मी आपला व्यक्तिशः आभारी राहीन.नासा आणि युनोचे संशोधन
थोडक्यात काय...
याआधीच
वाट्सअॅपमुळे मराठी सं.स्थळे मंदावली आहेत