पाणी
सावर्डे - नाशिक, पालघर अन् ठाणे जिल्ह्याच्या टोकावरलं आदिवासी गावं. . . पुर्णत: जंगलात. तीन डोंगरांच्या मध्ये दरीत वसलेलं. वस्ती १२५ कुटुंबांची. अजुनही बारमाही रस्ता नाही. म्हणजे आता पावसाळ्यात चार महीने गाडी घेवुन या गावात जाता येणार नाही.
आम्ही पोहोचल्यावर गावकर्यांनी पहिली सुचना हीच दिली की दुपारी पाऊस सुरु झाला तर गाडी वर चढवता येणार नाही. शेजारचं गाव डोंगर चढुन पाच किलोमीटर अंतरावर. . .
गावापासुन जवळच अजुन खाली (पायी चालत + डोंगर उतरुन १किलोमीटर) पाणी आहे. . हे पाणी म्हणजे खरं तर वैतरणा नदी. पण आता वरच्या बाजुला मध्य वैतरणा धरण आणि खाली मोडक सागर असा विकास झाल्याने , मोडक सागरमध्ये जेव्हा पाणि सोडायचं असेल तेव्हा या नदीला (पाटाला) पाणी येत. नदीच्या काठाला ग्रामपंचायतची विहीर आहे. पाटाला पाणी सोडल की झिरपुन विहीरीत येतं मग तेव्हाच ते मोटरनं ऊचलुन गावाजवळच्या टाकीत आणता येतं. पण जेव्हा हे मिडल वैतरणा टु मोडक सागर असं ट्रान्झॅक्शन सुरु असतं तेव्हा बर्याचदा वीजप्रवाह खंडीत असतो. नदीतलं पाणी डायरेक्ट उचलायची परवानगी नाही , कारण ते मुंबईसाठी राखिव आहे ना. . . .
मग पर्याय काय , नदीवरुन हंड्याने पाणी भरणे. सरासरी एका कुटुंबाला दिवसाकाठी पिण्यासाठी आणि वापरासाठी मिळुन १० हंडे पाणि लागतं. लांबुन , दरीतुन एकावेळी दोन हंडे डोक्यावर घेवुन , चढुन पाणी भरायचं. . दिवासाचे चार तास घरटी दोन सदस्य केवळ पाणी भरायला जुंपलेले. थोडी ऐपत असलेल्या मंडळीनी बैलगाडीवर दोनशे लीटरचे ड्रम बसवुन घेतलेत. तीन किलोमीटर लांबचा फेरा करुन कच्या रस्त्याने बैलगाडी नदीपर्यंत उतरवता येते. . .
डोळ्यासमोर अथांग जलसाठा असुनही हे रोजचे कष्ट. . .
महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य वैग्रे कोसो वर कुठेतरी आहे अजुन. . .
याद्या
4027
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
डोळ्यासमोर अथांग जलसाठा
उत्तम सकारात्मक प्रतिसाद !
In reply to डोळ्यासमोर अथांग जलसाठा by डँबिस००७
१. २. ३. ४. . .
तुमच्या प्रयत्नांना यश
In reply to १. २. ३. ४. . . by vcdatrange
vcdatrange :
शुभेच्छा
स्वयंनिर्भर
तुम्हाला कमला शुभेच्छा,
The Water Wives
In reply to तुम्हाला कमला शुभेच्छा, by वीणा३