मित्रहो आणि इतर वाचक मंडळी
आज मी आपण सर्वास इथे या मंचावर एक प्रश्न विचारणार आहे .
अर्थात मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे आहेच पण ते जर जसच्या तसं अजून एखाद्याकडून मिळालं तर मी स्वतःला भाग्यवान समजेन .
खाली मी मला पडलेल्या प्रश्नाचा थोडा पूर्वार्ध सांगत आहे , फ्लॅशबॅक म्हणा हवं तर , एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे . तर पूर्वार्ध खाली आहे तो असा
पूर्वार्ध
मला लहानपणापासून जादूची /अद्भुत /सत्यकथा /ऐतिहासिक पुस्तके वाचायला आवडायची . ती छोटी असली तर अजूनच मजा यायची . मी बरीच पुस्तके अक्षरशः चाळून काढली . हळहळू माझा काळ देवादिधर्माकडे वाढू लागला . आणि हे आपोआप झाले बरं का . कुणाची जोरजबरदस्ती नाही इथे . मग सुरु झाले स्तोत्र वाचन नि पठाणाचे कार्यक्रम . हळूहळू स्वतःहून त्यामध्ये प्राविण्य मिळवले . अर्थात त्याला शाळेतील बाईंची जोड होतीच . त्या माझ्याकडुन शाळेत आल्याआल्या सर्वांसमोर स्तोत्रे वाचून घेत आणि उच्चारावर जोर देत . नंतर माझा कल " हे असे का ? " नि धार्मिक गोष्टी का आणि कशा पाळतात . त्यामागील उद्देश नक्की काय ? तो पटण्याजोगा असेल तरच ते मान्य अथवा सरळ गंगेला सोडून द्यायचो . मग सांगणारी माझी आई असली तरीही मी मला जे पटेल तेच करायचो .
मी आणि माझा पवित्रा याने हळूहळू संपूर्ण घरावर ताबा घ्यायला सुरुवात केली होती . बाबांना वाटलं पोरगं वाया जातंय म्हणून त्यांनी पण काहीतरी नवस बोलला असेल आणि एक शेंडी सरळ धारण करून टाकली . आजही ती शेंडी त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून मोठ्या दिमाखात मिरवत आहे .त्या शेंडीने माझ्या मनात बरीच उलथापालथ माजवली . कित्येक प्रश्न निर्माण झाले . भरपूर देवदेवळे झाली . पंडितांबरोबर चर्चा झाली . पण तो प्रश्न " शेंडी का धारण करावी किंवा ठेवावी ?" याचे समाधानकारक उत्तर कुणीच दिले नाही . बराच काळ लोटला पण तो प्रश्न मनात घर करून उभा होता जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष . अर्थात मी त्याचा प्रामाणिक पाठपुरावा कदाचित नंतर केला नसेल जसा त्यावेळी केला होता . नाहीतर मला त्याचे उत्तर थोड्या अवधीतच मिळाले असते . पण देवाचे ( माफ करा , त्या अनामिक शक्तीचे मनापासून आभार ) कि ज्याने ते उत्तर द्यायला वेळ निवडली होती ती अगदी सार्थच होती . ती वेळ त्याचे अस्तित्व दाखवून देत होती याबदल किंचितही शंका नाही माझ्या मनात .
२६ जुलै ला जो पाऊस मी मुंबईत झाला त्याने थैमान माजवले होते मुंबईत हे सर्वश्रुत आहे . असाच पाऊस मला वाटत एक दोन तीन वर्षांनी मुंबईत झाला होता . तेव्हाही थोडाफार हाहाकार मजला होता . तो पाऊस झाला तेव्हा मी लॅबमध्ये जायला निघत होतो आणि इतक्यात माझ्या मुलाच्या शाळेतून मेसेज आला " पाऊस जास्त असल्याने शाळेतील बस मुलांना घेऊन येऊ शकत नाही तर आपापल्या मुलांना पालकांनी स्वतः घेऊन जावे ". नशीब बलवत्तर म्हणून मी त्यादिवशी घरीच होतो आणि नुकताच बाहेर पडणार होतो . कारण एकदा का बाहेर पडलो असतो तर मग मी सरळ बॅगेतला मोबाईल लॅब मध्येच पोहोचल्यावरच बघतो . ठरलं , मी पहिलं सोहमला ( माझ्या मोठ्या मुलाला ) आणणार आणि मग वेळ असेल तरच कामाला जाणार.
तिथून उलट्या रस्त्याला जायचे म्हणजे गाडी ना घेऊन जाणे कधीही योग्य . मी सरळ तिथे टॅक्सिने पोहोचलो . जाताना इतरत्र पाणी जमले होते ते बघून पुढचा अंदाज बांधलेला खरा ठरला ,कि येताना टॅक्सी मिळणे अवघड काम आहे हा .
मग मी आणि सोहमतिथेच बाहेर रस्त्यावर काही सोया होतेय का ते वाट बघत होतो . रस्ता पूर्णपणे सुनसान झाला होता थोड्याच अवधीत . पाऊस मी म्हणत होता . शाळेतील द्वारपालाने मला आत येऊन बसण्यास सांगितले पण मी ती विनंती नम्रपणे नाकारली . मी म्हणालो " आत आलो तर टॅक्सी कशी मिळेल परत जायला ". त्यालाही ते बहुधा पटले असावे म्हणून तो आतूनच लक्ष ठेवून होता आमच्यावर . पारशी कॉलनीत मोठी झाडं भरपूर असल्याने त्याला आमची काळजी वाटणं रास्त होत . त्यात सकाळीच त्याच्या सांगण्यानुसार कळले होते कि एक मोठी फांदी खाली उभ्या असलेल्या गाडीवर येऊन आदळली होती .
बराच वेळ लोटल्यानंतर एक टॅक्सी जणू आमच्यासाठीच पाठवली आहे अशी देवदूताप्रमाणे समोर उभी राहिली . आहे कि नाही काहीतरी चांगलं घडण्याची वेळ . लक्षात असू द्या , इथे तुम्हाला जेव्हा न मागता काही मिळते तेव्हा त्याची कृपा झाली असं समजावं . मी कितीतरी वेळ जी पण गाडीघोडा जात होतो त्याला हात दाखवून दाखवून थांबवत होतो पण साल कुणी थांबायलाच तयार नाही आणि इथे बघा न हात दाखवता टॅक्सी हजर.
आत कोणीतरी तेजपुंज पुरुष " गोरापान पण थोडासा वयोवृद्ध " आमचे हसून आदरातिथ्य करत त्याने आम्हाला आत बसायची सूचना केली . मी जरा दबकतच सांगितले कि मला सायनला जायचेय म्हणून कारण मला भीती वाटत होती कि गांधीमार्केटला पाणी साचत असल्याने बहुतेक टॅक्सिवाले सरळ नकारच देतात म्हणून . पण हे साहेब त्वरित उत्तरले कि कि मला आदेश आलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला सोडायला आलेलो आहे . मी फारवेळ टॅक्सी चालवत नाही पण विधात्याने हे काम जेव्हाजेव्हा मला करायला सांगितले आहे तेव्हा तेव्हा मी ते केलेलं आहे अगदी मनापासून . अर्थात सर्व संवाद हिंदी भाषेतूनच चालू होता . मी पण त्या उत्तराने जरा चपापलोच . कारण त्याने नकळत मला छेडले होते . मला आधीपासूनच त्या गूढ वातावरणाचा अंदाज मनापासून घ्यायला आवडते . मीही मग त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली .
ट्राफिक असल्याने मलाही पूर्ण खात्री होती कि आपण काही चाळीस मिनिटांच्या आत घरी पोहोचत नाही म्हणून मीदेखील गप्पा मारायला सुरुवात केली . आधीच मला त्यांच्याबद्दल एक उत्कट भाव निर्माण झालाच होता कि त्यांनी मला आशा वेळेला मदत केली होती जजिथे पैशाचे मोलच नाही .त्यामध्ये एक गोष्ट सारखं लक्ष वेधून घेत होती ती म्हणजे त्यांची लांबलचक गाठ मारलेली शेंडी .
एकंदरीत त्यांचा अवतार पहिला कि असं वाटत होत कि ते स्वतः कुणीतरी योगीपुरुष आहेत . माझा तो पण अंदाज खरंच ठरला होता . कारण त्यांची दोन्ही मुले अमेरिकेत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत होती . इथे मुंबईला ते स्वतः आणि त्यांची सुना नातवंड गुण्यागोविंदानं राहत होती . त्यांचं दिनक्रम हाच कि लवकर उठणे आणि भजन कीर्तनात दंग राहणे . अध्यात्मिक विचारविमर्श करणे. त्यांच्या समाजात त्यांना भरपूर मान होता . अरे हो हे सर्व सांगण्याच्या नादात मी त्यांचे नाव जे मी आजपर्यंत विसरलो नाही आहे ते सांगायचे राहूनच गेलं . त्यांचं नाव होत " राजपाल शुक्ला " . मी हळूच बोलता बोलता त्यांच्या ज्ञानाचा अंदाज घेतला आणि सरळ माझ्या प्रश्नाच्या भात्यातून तो रामबाण बाहेर काढला " चाचा हं चोटी क्यू रखते है ? " ते संहारक अस्त्र त्यांच्यावर आदळले खरे पण त्यांच्या त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून दिलेल्या उत्तराने माझ्या आत्तापर्यंतच्या सहनशीलतेचे सार्थक झाले होते . मी भरून पावलो होतो . मला त्या उत्तराने द्विगुणित आनंद झाला होता .
तोच प्रश्न आज मला या ओघवत्या मंचावर विचारावासा वाटतोय आणि पहिले उत्तर जे मला अपेक्षित आहे त्याला माझ्यातर्फे बक्षीस द्यावेसे वाटतेय .
अजून एक आज संध्याकाळपासून मी गायब होत आहे . एका अनवट जागी सहकुटुंब चाललो आहे . तेव्हा मी सरळ सोमवारीच उगवेन. तोपर्यंत आशा आहे कि मला उत्तर मिळालेलं असेल आणि जर नाही मिळालं तर हरकत नाही . मी इथे परत आल्यावर ते आपल्या सर्वाना जरूर कळवेन .
सिद्धेश्वर विलास पाटणकर
वाचन संख्या
26022
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
छिद्र झाकायचं म्हणून
कदाचित
मी येतो साहेब सोमवारी परत .
किप्पा, कुफी, तक्कियः, हॅट, पगडी, शेंडी, हिजाब
शेंडी हे हेड कव्हरिंग नाही..
In reply to किप्पा, कुफी, तक्कियः, हॅट, पगडी, शेंडी, हिजाब by चामुंडराय
आमच्या जीवन शिक्षण मंदिरात
काय मग वाचक मंडळी , काही
शेंडी का असावी ? या शंकेचे
?
In reply to शेंडी का असावी ? या शंकेचे by खिलजि
शेंडी म्हणजे अँटेना
?
छान
In reply to ? by शब्दानुज
हिसडा
In reply to छान by manguu@mail.com
भारी सायंटिफिक वगैरे फंडा आणि 'शास्त्राधार'
टकल्यांचा अँटेना कोठे असतो म्हणे? :)
म.म.काणे ह्यांच्या History of
@ अरविंद कोल्हटकर
In reply to म.म.काणे ह्यांच्या History of by अरविंद कोल्हटकर
म. म.
In reply to @ अरविंद कोल्हटकर by माहितगार
म. म.
In reply to @ अरविंद कोल्हटकर by माहितगार
हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र
In reply to @ अरविंद कोल्हटकर by माहितगार
हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र
In reply to @ अरविंद कोल्हटकर by माहितगार
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी
In reply to हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र by राही
जियो शब्दानुज जियो. सही पकडे
शेंडी ठेवतो कोण
In reply to जियो शब्दानुज जियो. सही पकडे by वकील साहेब
@ गा. पै. आणि खिलजी जी
In reply to शेंडी ठेवतो कोण by गामा पैलवान
दुवा
In reply to @ गा. पै. आणि खिलजी जी by माहितगार
सही
In reply to जियो शब्दानुज जियो. सही पकडे by वकील साहेब
च्यायला
ह्या ह्या ह्या
शब्दानुज भाऊ , अहो शेंडी आणि
मागासाहेब , त्या शुक्ला
तसे त्या शुक्लाजींना आमचेही
In reply to मागासाहेब , त्या शुक्ला by खिलजि
गामा पैलवानजी,
हे ही बरोबर
In reply to गामा पैलवानजी, by वकील साहेब
सगळे वाचले तरीही मी जिवंत
मी काय म्हणतो..
शेंडी आणि ज्ञान
प्रतिसाद आवडला. मला कितीतरी
In reply to शेंडी आणि ज्ञान by शब्दानुज
तुमचाही प्रतिसाद आवडला खूप ताई
In reply to प्रतिसाद आवडला. मला कितीतरी by वीणा३
ज्याला हवं त्याने अगदी जरूर
In reply to तुमचाही प्रतिसाद आवडला खूप ताई by जेम्स वांड
परखडपणे मांडलेलं
In reply to ज्याला हवं त्याने अगदी जरूर by पिलीयन रायडर
मुंज आताच्या का करावी हा
In reply to तुमचाही प्रतिसाद आवडला खूप ताई by जेम्स वांड
आहे तसे पाळू अथवा पूर्ण मोडीत काढू
In reply to मुंज आताच्या का करावी हा by वीणा३
...त्यापेक्षा खरंच भिशी
In reply to मुंज आताच्या का करावी हा by वीणा३
"ओम भवती भिक्षांदेही " का
In reply to मुंज आताच्या का करावी हा by वीणा३
तुम्हाला काय म्हणायचं आहे ते
In reply to "ओम भवती भिक्षांदेही " का by माहितगार
आपण परंपरेच्या आधूनिकीकरणाचा
In reply to तुम्हाला काय म्हणायचं आहे ते by वीणा३
क्या बात है!
In reply to शेंडी आणि ज्ञान by शब्दानुज
अँटेना
:)
In reply to अँटेना by उपाशी बोका
एकाद्याला "शेडी लावणे" ह्या
शेंडी
शेंडीचा उपयोग काय
प्लासिबो ईफेक्ट असावा
वीणा३ व पिलियन रायडर यांनी
आचार्य अत्रे यांनी लिहिले आहे
ऋग्वैदीक तमीळ सिंधू शेंडी
शेंडीवरून इतकी उलथापालथ झाली