हिंदू धर्म - हिंदू आणि धर्म म्हणजे काय अशा विषयां वाद विषयांबद्दल हा धागा नाही . छोटे मोठे प्रश्नांची उत्तरे शोधणे असा उद्देश आहे.
१) वाल्मिकी रामायणातील संपूर्ण व्यक्तीनाम सूची कुठे मिळेल ?
* खाली प्रतिसादात समीर वैद्यांनी रोमन लिपीत व्यक्तीनाम सुची उपलब्ध असलेला पिडीएफ दुवा दिला आहे. या सूचीतून निश्चितपणे संस्कृतोद्द्भव असलेली संस्कृतोत्भवद्भव असण्या बद्दल शंका असलेली नावे वेगवेगळी करण्यात जाणकारांचे सहकार्य उपयूक्त ठरेल असे वाटते.
वाल्मिकी रामायणातील संपूर्ण व्यक्तीनाम सूची (फक्त मुख्य नावे नाही तर सर्वच्या सर्व व्यक्ती नावांची सूच) मी आंतरजालावर जरा धांडोळा घेतला तर ५००० रामायणातील संस्कृत शब्दांची सूची दिसली (पण त्याची खातरजमा कशी केलेली आहे माहित नाही) पण त्यात सर्वाधिक वापरलेल्या शब्दांच्या क्रमवारीने आहे. म्हणजे काही नावे एकेकदाच आली असतील तर त्यात असणार नाहीत . कदाचित यूनिकोडात नसल्यामुळे गूगल सर्चात व्यक्ती नाव यादी येत नसेल पण पिडीएफ दुवा कुणाला माहित असेल असे होऊ शकते म्हणून ही पृच्छा .
व्यक्ती नाम यादी संबधीत अजून काही प्रश्न डोक्यात येतील असे वाटते पण ते सविस्तर यादी वाचल्या नंतरच नक्की करता येऊ शकतील असे वाटते .
२) हिंदू धर्मीय देवतांच्या तिथ्यांचे जयंत्यांचे स्रोत नेमके कोणते ? म्हणजे जसे की राम नवमी कृष्ण जयंती हनुमान जयंती इत्यादी नेमकी कोणती तिथी असावेत हे त्या त्या रामायण महाभारत ग्रंथात आहे कि ह्या तिथ्या पुराणे अथवा नेमक्या कोणत्या ग्रंंथातून सुचवल्या गेल्या आहेत की तसे कोणतेच स्रोत ठाऊक नाहीत .
३) व्यास महाभारत आणि वाल्मिकी रामायणात कॉमन नसलेले तुमच्या परिचयातील संस्कृत शब्द, मला स्वतःला आढळलेले असे शब्द म्हणजे चित्र, नन्द , मन्दीर हे शब्द रामायणात दिसले महाभारतात मिळाले नाही पण महाभारतात असे आढळल्यास अशा श्लोकाचा संदर्भ द्यावा. आणि असे अनकॉमन असामायिक आणखी शब्द सुचवावेत
४) माझ्या वाल्मिकी रामायण वाचनात उपनिषद आणि ब्राह्मण ग्रंथ* यांचा प्रत्यक्ष उल्लेख आला नाही. तसा तो कुठे असल्यास जाणकारांनी ससंदर्भ कल्पना द्यावी हि विनंती.
* (ब्राह्मण ग्रंथ म्हणजे ब्राह्मणांनी लिहिलेले ग्रंथ नव्हे तर तो अध्यात्मिक ग्रंथ रचनेतला एक टप्पा आहे. ज्यांना कल्पना नाही त्यांच्यासाठी)
५) वाल्मिकी रामायणातील दोन प्रसंग वाल्मिकी रामायणाच्या नेमक्या कोणत्या (संस्कृत) आवृत्तीतून येतात, आवृत्ती कांड, सर्ग आणि श्लोक क्रमांकासहीत माहिती हवी आहे.
५ अ) वाल्या कोळी ते वाल्मिकी हि महाराष्ट्रातील प्रचलीत कथेचे गूगलवर तुरळक हिंदी इंग्रजी संदर्भ दिसतात पण कथा नेमक्या कोणत्या संस्कृत ग्रंथातून घेतली गेली याचा आदमास येत नाहीए.
५ ब) युद्धकांडात रावणाने सगळे लढू शकणारे सोबती गमवल्यावर कोणतेसे अस्त्र मिळवण्यासाठी तो एक पुजा करण्यास घेतो , ती पुजा थांबवण्यासाठी वाली पूत्र अंगद मंदोदरीला वेठीस धरतो असे काहीसे वर्णन एका इंग्रजी लेखकाच्या पुस्तकात मिळाले पण इतर भारतीय खासकरुन वाल्मिकी रामायणा च्या कोणत्या आवृत्तीतून संदर्भ येतोय ते कळाले नाही.
वाचने
5980
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
धागा शीर्षक जरा व्यापक केले
हिंदू धर्मीय देवतांच्या
प्रश्न क्र १ साठी
ऊपयूक्त माहितीसाठी अनेक आभार
In reply to प्रश्न क्र १ साठी by समीर वैद्य
वाल्मिकी रामायणातील हे प्रसंग कोणत्या आवृत्तीतून येतात ?
५ अ) वाल्या कोळी ते वाल्मिकी
In reply to वाल्मिकी रामायणातील हे प्रसंग कोणत्या आवृत्तीतून येतात ? by माहितगार
प्रयत्नपूर्वक माहिती
In reply to ५ अ) वाल्या कोळी ते वाल्मिकी by प्रचेतस
खुप उपयुक्त धागा.
वाल्मिकी आणि वाल्या कोळी
@ प्रचेतस, तुमची आठवण केली
In reply to वाल्मिकी आणि वाल्या कोळी by Jayant Naik
संदर्भ मराठी विश्वकोशात
In reply to वाल्मिकी आणि वाल्या कोळी by Jayant Naik
ओके दासबोध दशक सोळावा :
In reply to वाल्मिकी आणि वाल्या कोळी by Jayant Naik
काही अजून माहिती मिळाली.
In reply to ओके दासबोध दशक सोळावा : by माहितगार
तरुण भारत मधील दिपाली पाटवदकर
In reply to काही अजून माहिती मिळाली. by माहितगार
१) मंदिर शब्दाबद्दल मागे एकदा