एक दिवसीय आणि टेस्ट मॅचेस च्या ICC नामांकनात भारत भले पहिल्या क्रमांकावर असेल. पण ICC's Best Dramebaaz अशी लिस्ट काढल्यास बांगलादेश चा क्रमांक निश्चितच पहिला लागेल. परवाच्या सेमी-फायनल मध्ये अटीतटीच्या सामन्यात एकापेक्षा एक ड्रामे करून जिंकल्यानंतर शेवटी बांगला क्रिकेटर्स ने मैदानावर नागीण डान्स केला. एवढ्याने समाधान झालं नाही म्हणून ड्रेसिंग रूम चे दरवाजे फोडले.
T20 च्या फायनल ला आपली नेहेमीची टीम नसून देखील बांगलादेश विरुद्धची मॅच सहज जिंकू असे वाटत होते. १६७ धावसंख्येचा पाठलाग देखील बऱ्यापैकी चालला होता. मात्र शिखर धवन आणि रैना पाठोपाठ बाद झाले आणि बांगला नाग बिळाबाहेर येऊन दंश करू लागले. नागांवर 'विजय' मिळवण्यासाठी खुद्द 'शंकर' मैदानावर आला, पण त्याचे देखील काही चालले नाही. लवकरच 'शंकरा'च्या गळ्याभोवती असलेल्या बांगला नागाने भारतीय टीम चा गळा आवळण्यास सुरुवात केली.
पौराणिक कथांत शंकरानंतर कार्तिकस्वामी येतात. तसेच काल देखील १२ चेंडूत ३४ धावा हव्या होत्या तेव्हा 'शंकराच्या साथीला 'दिनेश कार्तिक' मैदानावर आला. आल्या-आल्या षटकार आणि चौकार मारून सुरुवात तर जोरदार केली. तरीदेखील शेवटच्या षटकात १२ धावा हव्या होत्या. बांगला कप्तानाने मेहदी हसन ऐवजी पार्ट टाइम गोलंदाज 'अबकी बार सौम्या सरकार' धोरण अवलंबिले. २ चेंडूत ५ धावा हव्या असताना 'विजय शंकर' महाराज तिसरा डोळा उघडण्याच्या नादात बाद झाले. बांगला फॅन्स नागीण डान्स करण्यास हात उंचावून सज्ज झाले.
भाग्यवान लोकं तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतात. दिनेश कार्तिक डोक्यावर बर्फाची लादी घेऊन जन्माला आला असावा. शेवटच्या चेंडूवर ५ धावा हव्या होत्या तरीदेखील इतका शांत आणि संयमी दिसत होता. एक्सट्रा कव्हरला फ्लॅट षटकार मारून सामना जिंकून दिला. कार्तिकच्या बॅटरूपी पुंगीने बांगला क्रिकेटर्स 'नागीण' झाल्यासारखे निपचित पडले. बांगलादेश च्या हातातोंडाशी आलेला विजय कार्तिक ने ८ चेंडूत २९ धावा ठोकून अलगद काढून घेतला. इतका जबरदस्त खेळ करून सामना जिंकल्यावर कसे वागावे हे बांगलादेशी क्रिकेटर्स ने कार्तिक कडून शिकावे!
काल भारतात जरी चैत्र महिना सुरु झाला असला तरी कोलंबो च्या क्रिकेट ग्राउंडवर 'कार्तिक' महिना बहरात होता आणि बांग्लादेशमध्ये 'भाद्रपद'!
वाचने
6938
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
:-D
उपमा, उत्प्रेक्षा आणि
छान
काल मज्जा आली. शंकरला वर
सॉरी बॉस
उपमा?
In reply to सॉरी बॉस by प्रचेतस
हो.
In reply to उपमा? by सरनौबत
उपेक्षा
बांग्लादेश कधीतरी, 'आपल्याला
In reply to उपेक्षा by फेरफटका
'आपल्याला सतत कुणीतरी
'आपल्याला सतत कुणीतरी उपेक्षेनं मारून राह्यलाय'तुम्हाला विदर्भ मोड असे म्हणायचं आहे काविदर्भ मोड
In reply to 'आपल्याला सतत कुणीतरी by विजुभाऊ
कमाल कार्तिक..
कुणाचा कधी दिवस येईल सांगता
हे पहा विजय शंकर काय म्हणतोय.
हे असे एक्सपेरिमेंट(टाकीचे
In reply to हे पहा विजय शंकर काय म्हणतोय. by दुर्गविहारी
मुस्तफिजूर शेवटच्या ४ षटकात
In reply to हे पहा विजय शंकर काय म्हणतोय. by दुर्गविहारी
मुस्तफिजूर
In reply to मुस्तफिजूर शेवटच्या ४ षटकात by श्रीगुरुजी
मस्त म्याच झाली.
शंकरला जमत नव्हते हे मान्य.
In reply to मस्त म्याच झाली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे