डोकलाम जिंकले पण सावंतवाडीचे काय?
नमस्कार मंडळी
कालपरवाच गोव्याहून परतत असताना वाटेत सावंतवाडीला थांबलो होतो. बरोबरच्या ३-४ मित्रांना नाश्ता करायचा होता शिवाय सावंतवाडीमध्ये काही लाकडी खेळणी किंवा इतर लाकडी वस्तू मिळाल्या तर खरेदी करायची होती.
वाटेत एक दोन ठिकाणी विचारत विचारत चितारी आळीत पोचलो.सकाळचे ९-१० वाजले होते त्यामुळे फारशी दुकाने उघडलेली नव्हती.आम्हीही काही घाई नसल्याने रमत गमत पूढे चाललो होतो.कुठे काही चांगले दिसले, आवडले कि त्या दुकानात शिरायचे आणि वस्तू बघायच्या , भाव पटला तर विकत घ्यायच्या असे चालले होते.
खरेदी करता करता असेच एका दुकानात शिरलो आणि निरनिराळ्या वस्तू बघायला सुरुवात केली. एक लाकडाची जीप उचलून किंमत विचारली तर दुकानदार म्हणाला ३०० रुपये. दुसरी जरा वेगळी जीप बघितली तर किंमत ८०० रुपये. तीच तऱ्हा कार मध्ये सीटवर घालायच्या मण्यांच्या कव्हरची. एकाची किंमत वाजवी तर दुसऱ्या तशाच दिसणाऱ्या कव्हरची किंमत १००० रुपये . हे काय गौडबंगाल आहे ते कळेना. जरा खोलात जाऊन विचारू लागलो तसा दुकानदार मोकळेपणाने माहिती देऊ लागला.
पुढचा संवाद काहीसा असा झाला
मी- का हो? वस्तू तर सारखीच दिसतेय मग किंमतीत इतका फरक का?
दु- अहो तो चायनाचा माल आहे. म्हणून स्वस्त पडतो.
मी- कसे काय ?
दु- आता असे बघा.आम्ही जी वस्तू हाताने तयार करतो ती बनायला एका कारागीर ३-४ दिवस लावतो. त्याचा पगार ,लाकडाचा खर्च आणि नफा वगैरे धरून ती वस्तू मला ८०० रुपयाला विकायला लागते.पण जर मी ती वस्तू चायनाला पाठवली तर तो नमुना बघून तिकडून तशीच वस्तू ३० रुपयात बनून इकडे येते. मग ती मी ३०० ला जरी विकली तरी फायदा होतो.अट फक्त एकच, ऑर्डर निदान एका कंटेनरची पाहिजे. तरच ते लोक ऑर्डर घेतात.
मी- म्हणजे तुमचे चायनाच्या व्यापारी वर्गाशी कॉन्टॅक्ट असतात ?
दु- त्याची काय गरज आहे ?मुंबईला बरेच एजंट लोक आहेत. ते आमच्याकडे येतात आणि हे काम करतात.
मी- म्हणजे तुमच्या दुकानातील सर्व वस्तू चायनीज आहेत?
दु- नाही नाही, काही ठराविक वस्तू इथल्या लोकलचा असतात जसे कि भातुकलीची खे ळणी, फणी करंडा ,बैलगाडी ह्या वस्तू फार खपत नाहीत त्यामुळे हाताने बनवूनच विकतो. ज्या वस्तूंना मागणी फार त्या आम्ही तिकडून बनवून घेतो.
मी- चायनाचा माल स्वस्त आहे, पण टिकाऊपणाचे काय?
दु- अहो आपले गिर्हाईक टिकाऊपणा कुठे बघते? परवाच एकजण माझ्याशी या वस्तूंवरून अतिशय घासाघीस करू लागला. मी त्याला ३०० रुपयाची चायना मेड वस्तू दाखवून ३० रुपये किंमत सांगितली,त्यावर तो म्हणाला कि २५ ला देता का? एकदम ६ वस्तू घेतो. आता बोला.
मी-असे किती दिवस चालणार ?
दु- चालेल की. मी सरळ सांगतो कि हि वस्तू इथली आहे आणि हि चायना मेड आहे ,तसे सर्व दुकानदार कबूल करत नाहीत.शिवाय कितीही सुंदर कारागिरी असली तरी महागड्या वस्तू घेणारे गिर्हाईक इथे फार कमी.मग आम्हीसुद्धा मागणी तसा पुरवठा करतो.बरे वाटत नाही पण काय करणार?धंदा तर चालला पाहिजे?
काय बोलावे ते मला समजेनासे झाले.मला वाईट पण वाटत होते, पण त्यांचे बोलणे पटत हि होते.खरेदी करताना सामान्य माणूस त्या त्या वेळची गरज आणि खिशाची सोय बघतो. पण त्या पाठचे मोठे राजकारण बघायला त्याला कुठे वेळ असतो? उद्या जर आपण अशाच चायनीज वस्तू स्वस्त आणि मस्त मिळतात म्हणून खरेदी करत राहिलो तर सावंतवाडीची खेळणी ,येवल्याची पैठणी, शिवकाशी चे फटाके, आणि गोव्याची फेणी सुद्धा चायना मधून आलेली असेल. स्थानिक कारागीर मरतीलच पण सगळ्यात दुःख म्हणजे ती कलाच मरेल कारण कारागीर ती पुढच्या पिढीला कदाचित शिकवणार नाहीत. आणि मग चेन्नई ,जयपूर,कलकत्ता,लखनौ,म्हैसूर सगळीकडे एकसारख्याच दिसणाऱ्या चायनीज वस्तू विकत घ्याव्या लागतील.
म्हणून म्हणतो -एकवेळ आपले सैन्य सीमेवर चायनाशी जिंकेल, पण देशातील बाजारपेठ जर त्यांनी काबीज केली तर आपण तसेही हरलेले असू. तुमचे काय मत ?
याद्या
6086
प्रतिक्रिया
18
वर्गीकरण
मिसळपाव
एकदम सहमत
नागपूरच्या मेट्रो चे डबे
चायनीज माल
उदय यांच्याशी सहमत दर्जा
In reply to चायनीज माल by उदय
विकत घेणारे लोक मूर्ख आहेत
काहितरी गैर् समज होतोय
In reply to विकत घेणारे लोक मूर्ख आहेत by साहना
मुळात सरकार च आपली इतकी लूट
बरेच चर्वित चर्वण करण्यासारखा
चीनी मालामुळे प्रदुषण वाढते
मुळात लोकल वस्तू ३०० रुपयांना
सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे पर्यायाने कोकणातला...
एकदा पुण्यात फेरी मारा ;)
In reply to सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे पर्यायाने कोकणातला... by टर्मीनेटर
उगाच ???
In reply to एकदा पुण्यात फेरी मारा ;) by टवाळ कार्टा
टका... पुण्याला खूपच वेळा जाणे येणे होते...
In reply to एकदा पुण्यात फेरी मारा ;) by टवाळ कार्टा
कर्माचे पर्यटन
In reply to टका... पुण्याला खूपच वेळा जाणे येणे होते... by टर्मीनेटर
नैसर्गिक साधन सामुग्री लुटण्याचे प्रकार तर...
In reply to कर्माचे पर्यटन by पैसा
...
ते ठीक आहे
In reply to ... by babu b