पुण्यांत शाळांचा काळा दिवस
ऑक्टॉबर १२ रोजी पुण्यातील ७०० शाळा मधील शिक्षक आणि इतर कर्मचारी काळे कपडे घालून फडणवीस सरकारचा निषेध करणार आहेत. कारण : RTE
सर्वप्रथम RTE कायद्याची अंबलबजावणी करताना बिगर-अल्पसंख्यांक खाजगी शाळांत विश्वासात घेतले जात नाही. २०१२ पासून खाजगी शाळांना २५% आरक्षण सरकारने निर्धारित केलेल्या मुलांना दिले असले तरी अजून त्याची थकबाकी सरकारने ह्या शाळांना दिलेली नाही अश्या अनेक मुद्यावरून हे आंदोलन छेडले जात आहे.
काही आकडेवारी पाहूया
- मागील ४ वर्षांत महाराष्ट्रात 7,349 शाळा RTE मुळे बंद पडल्या आहेत.
- सरकारने थकबाकी ना दिल्याने आर्थिक परस्थिती बिघडून सुमारे ३००० शाळा बंद पडल्या आहेत.
- बहुतेक शाळा ह्या सेल्फ फायनांन्सड होत्या. कायद्यप्रमाणे त्यांना किमान एक एकर जमीन घ्यावी लागत होती, ५ लोकांचे डिपॉझिट ठेवावे लागत होते आणि त्यावरून २५% सीट्स सरकारला द्याव्या लागत होत्या. इतर मुलांकडून महिन्याला ५०० - ते ३००० रुपये फी घेऊन शाळा चालवणे अशक्य झाल्याने त्यांनी त्या बंद केल्या.
- बाकं रिकामी ठेवायला सरकाने भाग पाडले
RTE कायद्याचा एक विशेष पैलू म्हणजे शाळेतील बांक बंद ठेवावी लागणे. समाज इयत्ता १ मध्ये १० RTE सीट्स होती. त्यातील फक्त १ सीट भरले तर इतर ९ सीट्स शाळेलाय इयत्ता ८वि पर्यंत रिकामी ठेवावी लागत. शाळेच्या आजू बाजूला गरीब आणि गरजू मुले असली तरी हि सीट्स त्यांना देता येत नाही.
महाराष्ट्रांत सध्या ८ - १२% सीट्स अश्या प्रकारे खाली जातात.
सीट्स खाली जाण्याचे कारण
प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला आपल्या बजेट मधील सर्वांत चांगल्या शाळेंत पाठवायला बघतो. ऍडमिशन चा दिवस आला कि असे पालक त्या शाळेंत ऍडमिशन घेतातच पण त्याच वेळी RTE लॉटरीत सुद्धा आपल्या पाल्याचे नाव टाकतात. आता नशीब चांगले असून समजा त्या मुलाला पाहिजे त्या चांगल्या शाळेंत फुकट प्रवेश मिळाला तर बरे आहे नाहीतर आधी ऍडमिशन घेतलेल्या शाळेंत त्या मुलाला पाठवले जाते. ह्यामुळे RTE चे एक सीट फुकट जाते. ह्यासाठीच सरकार लॉटरीचे १, २, ३, ४ राऊंड करते आणि प्रत्येक राऊंड्स मध्ये अनेक सीट्स वाया जातात.
संपूर्ण मुंबई शहरांत आज १ - ४ इयत्ता मध्ये १३,००० सीट्स अश्या प्रकारे खाली आहेत. ह्या रिकामी बाकावर बसण्यासाठी इच्छुक मुले सुद्धा आहेत पण सरकारी नियमा नुसार हे सर्व बाकी खाली ठेवावे लागणार आहेत.
२५% सीट्स नक्की कुठल्या गरीब विद्यार्थ्यांना मिळतात ?
RTE कायदा गरीब हा शब्दप्रयोग करत नाही तर "Economically Weaker Sections" असा शब्द प्रयोग करतो. कपिल सिब्बल ह्यांचा हा आणखीन एक मास्टर स्ट्रोक. गरीब म्हणजे नक्की कोण हे कायद्याच्या भाषेंत स्पष्ट आहे पण EWS हा प्रकार ओपन एंडेड आहे आणि ह्याची व्याख्या राज्य सरकार वाट्टेल तेंव्हा बदलू शकते.
मीडिया अनेकदा RTE हा गरीब मुलांसाठी आहे असा प्रचार करते पण प्रत्यक्षात हि सीट्स नक्की कुणाला दिली जातात ?
केंद्रीय विद्यालयाचे RTE नॉर्म पहा :
--
From Sec 5-A Step 2: Out of 41 Seats in Std 1, 10 seats are reserved as per the following rules.
6 Seats to SC + 3 Seats to ST + 1 Seat to economically disadvantaged (poor) + disabled from all categories including SC/ST + all other social classes.
--
म्हणजे ४० पैकी १ सीट गरीब विद्यार्थ्याला मिळते. ह्यांत सुद्धा रेशन कार्ड, निवासी दाखला, आय दाखल इत्यादी सर्व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावी लागतात. खरोखर गरीब लोकांकडे हि कागदपत्रे थोडीच असतात!
बहुतेक राज्यांत २५% सीट्स हि जातीवर आधारित असतात आणि जाती निहाय प्रवेश संपला कि गरीब मुलांना त्यांचा लाभ घेता येतो.
[१] http://punemirror.indiatimes.com/pune/civic/rtes-interference-instigates-schools-to-celebrate-black-day/articleshow/60998357.cms
[२] http://www.hindustantimes.com/mumbai-news/mumbai-has-13-000-vacant-rte-seats-but-no-place-for-rape-survivor/story-Mx7KzAz1OA6MoSoF5tET1L.html
[३] http://ccs.in/sites/all/books/com_books/rte-state-rules-matrix.pdf
[४] https://realitycheck.wordpress.com/2012/04/15/is-the-right-to-education-quota-really-for-the-poor/
वाचने
9804
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
या विषवल्लीविरुद्ध तुमचे
ऑक्टॉबर १२ रोजी पुण्यातील ७००
In reply to ऑक्टॉबर १२ रोजी पुण्यातील ७०० by अभ्या..
हा हा हा.
"सीट्स खाली जाण्याचे कारण"
In reply to "सीट्स खाली जाण्याचे कारण" by रामपुरी
खाली - empty
In reply to खाली - empty by साहना
त्यासाठी "रिकाम्या" हा मराठी
"हिंदी मिडीयम " नावाचा चांगला
शिक्षण हक्क कायद्यात मिळणार्
आणि
In reply to आणि by एमी
Not In My Name
खाजगी शाळा बंदच कराव्यात नफा
RTE फक्त आर्थिक दृष्ट्या मागास लोकांसाठीच असणं जरूरी आहे
> ज्यांना वाटतं की खाजगी शाळा
प्रत्येक आई वडील आपल्या
In reply to प्रत्येक आई वडील आपल्या by आनन्दा
समाज मी SC/ST आहे. माझ्या
In reply to समाज मी SC/ST आहे. माझ्या by साहना
...
निषेध वगैरे
In reply to निषेध वगैरे by धर्मराजमुटके
Organiser च्या संपादक
In reply to Organiser च्या संपादक by साहना
ग्रेट मुव्ह !
ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी:
पुणे झाल्यानंतर आता उत्तर
अवांतर : हिटलर आणि फ्यासिस्ट ?
In reply to अवांतर : हिटलर आणि फ्यासिस्ट ? by गामा पैलवान
गापै..