Skip to main content

कट्टा

कट्टा

Published on 07/08/2017 - 09:25 प्रकाशित
सप्टेंबर २ ते १२ च्या दरम्यान मी भारतात येणार आहे. मुंबईत आणि पुण्याला कट्टा करायला आणि मिपाकरांना भेटायला आवडेल. मिपाकरांना आवडेल का आणि जमू शकेल का? कृपया कळवावे म्हणजे त्याप्रमाणे प्लॅन करता येईल. टीपः कट्टा ओला, सुका, सुका/ओला करायची माझी तयारी आहे. ==================================

पुण्याच्या कट्ट्याची वेळ :

शुक्रवार ८ सप्टेंबर, संध्याकाळी ६ वाजता: बार्बेक्यू नेशन, डेक्कन जिमखाना ==================================

मुंबईच्याच्या कट्ट्याची वेळ :

(नक्की झाल्यावर इथे टाकली जाईल.) ==================================

याद्या 5444
प्रतिक्रिया 19

स्वागत ! तुम्ही बाहेरून भारतात येत आहात. त्यामुळे इतरांना विचारण्याऐवजी, तुम्हाला पुणे व मुंबईत कोणता सोईचा दिवस व वेळ आहे हे इथे प्रतिसादात टाका. ते जास्त सोईचे होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद. शनिवारी २ सप्टेंबरला बहुधा जेटलॅग असेल, त्यामुळे रविवारी सकाळी किंवा संध्याकाळी भेटता येईल, असा विचार आहे. म्हणजे मला कधीही, वीकडेला पण जमू शकेल, पण सर्वांना सोयीस्कर म्हणून शनिवार-रविवारला प्रेफरन्स. ३ सप्टेंबरला मुंबई आणि ८ संध्याकाळ/९ दुपार पुणे जमू शकेल का? माझा मुक्काम बोरिवली, विक्रोळी आणि तळेगाव इथे आहे, त्याप्रमाणे कुठेही चालेल. शक्यतो रेल्वे स्टेशनजवळ भेटलो तर सर्वांना सोयीस्कर होईल, असा अंदाज. त्या दृष्टीने बोरिवली, ठाणे, शिवाजी नगर ही ठिकाणे बरी वाटतात. वीकडेला मी १ दिवस फोर्ट एरियात जातो, तिथेपण महेश लंच होमला जमवता येईल.

३/४ ला गणेश विसर्जनाची ब्येक्कार गर्दी अवघ्या महाराष्ट्रात असते. त्यामुळे एकच वीकांत तुम्हाला मिळेल, एका तरी ठिकाणी कामाच्या दिवशी कट्टा करावा लागेल असे वाटते. पुण्यात म्हात्रे पुलाजवळ ज्याला डी पी रोड म्हणतात, तिथे साताठ ठिकाणी मुबलक जागा मिळते. फक्त फुंकणार्‍यांच्या धुराचा त्रास न होणारे ठिकाण कुणी सुचविल्यास येता येईल. समोरच एक मराठी प्रकाशनाचे दुकान आहे तिथेही जरा जाता येईल.

In reply to by उदय

असतात एकेक गैरसमज लोकांचे, दुर्लक्ष करायचं. सबंध विश्वाच्या मध्यवर्ती असलेलं पुणं लोकांना बघवत नाही आणि मग उगाच वावड्या उठवतात.

शुक्रवार ८ सप्टेंबर, संध्याकाळी ६ वाजता: बार्बेक्यू नेशन, डेक्कन जिमखाना https://www.zomato.com/pune/barbeque-nation-deccan-gymkhana सर्वांना भेटायला आवडेल. धन्यवाद.


In reply to by उदय

ये हुई ना बात ! मी येणार... मी पयला सुद्धा ! ;) :) (मुंबईची वेळ नक्की केली की अशीच एका प्रतिसादात टाका. तिला मुख्य धाग्यात टाकले जाईल.)

In reply to by अभ्या..

मी ते झोमॅटोवरून शोधले होते आणि रेटिंग चांगले आहे. ३-४ मिपाकरांना विचारले तर ते त्यांना सोईस्कर आहे, म्हणून निवडले. बाकी ते कसे आहे, याची मला काही कल्पना नाही.

झोमॅटोवरून शोधलेले हे रेस्टॉरंट कसे वाटते? ठाण्याला आहे आणि रेटिंग चांगले वाटले. जर आवडले नाही तर मला दुसरीकडे चालेल. https://www.zomato.com/mumbai/masaledaar-by-mini-punjab-panch-pakhadi-thane-west शनिवार २ सप्टेंबर संध्याकाळी किंवा ३ सप्टेंबर संध्याकाळी जमेल का सर्वांना?

In reply to by उदय

जागा चांगली आहे. पण ज्यांना ओला कट्टा करायचा आहे त्यांच्यासाठी फक्त तेथे फोन करून विचारणे आवश्यक आहे कि बार चालू आहे का? कारण हि जागा हायवेपासून ५०० मीटर अंतराच्या आत आहे. जाता जाता -- आजकाल बार असलेली पण ५०० मीटर अटीमुळे बार बंद झालेली हॉटेले कट्टा करण्याच्या दृष्टीने फारच चांगली पडतात कारण शनिवारी किंवा रविवारी गर्दीच्या वेळेस सुद्धा आरामात जागा मिळते आणि ग्राहक बांधून ठेवण्याच्या दृष्टीने सेवा स्वस्त आणि मस्त मिळते. फक्त तोंड "कोरडे" ठेवायची तयारी असावी लागते. मागच्या रविवारी "मंत्र" हॉटेलात गेलो होतो अनुभव वरीलप्रमाणे आला आहे. ----(((( ))))---