Skip to main content

मोदीं सरकारची ३वर्षे

लेखक प्रतापराव यांनी शुक्रवार, 07/07/2017 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
बस हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. टिव्हिवर ही आणि अशाप्रकारच्या बर्याच जाहिराती पाहुन भारावुन गेलो होतो. यावेळेस मत मोदींनाच द्यायचे असे ठरविले. मिडीयात सातत्याने येणारा गुजरातचा विकास त्याच्या बातम्या, देशाला गुजरातसारखेच प्रगत करणार वैगरे ऐकुन, वाचुन देशाला एक विकासपुरूष मिळणार याची खात्रिच झाली होती.निवडणुकीच्या काळात देशाला मोदींची किती गरज आहे काँग्रेस कशी भ्रष्ट आहे यावरच चर्चा चालायच्या. काही मित्रांना मोदी हे हिंदुत्ववादी असल्याने आवडत होते. हिंदुराष्ट्राचे स्वप्न साकार होणार असे त्यांचे म्हणने होते. मला मात्र हिंदुत्व वैगरे गोष्टित रस नव्हता. दलित असल्याने हिंदुराष्ट्र या शब्दाची भिती वाटे. हिंदुराष्ट्र झाले तर पुन्हा जुन्या वर्णव्यवस्थेला बळ मिळणार आणि ज्या वाईट अवस्थेतुन आंबेडकर साहेबांनी संविधानाच्या माध्यमातुन आम्हाला बाहेर काढले त्याचे खच्चिकरण करण्याचे प्रयत्न होणार याची भिती वाटे. पण मोदींनी संपुर्ण प्रचारात धार्मिक मुद्दे काढले नाहित. सबका साथ सबका विकास यावरच त्यांचा भर राहिला.मोदींनी मनावर मोहिनी केली . अपेक्षेप्रमाणे मोदी सरकार भारतात आले. त्याला आता तिन वर्ष होउन गेली. ह्या तिन वर्षात काही ठोस असे झाले नाही असे वाटतेय. नोटबंदीने जीव नकोसा केला होता.एकीकडे देशातील जनतेला कँशलेस व्यवहार करा सांगायचे दुसरीकडे चारहुन जास्तवेळा बँकेत आलात तर अमुक तमुक रुपये चार्ज द्यावा लागेल अशी व्यवस्था करायची। त्यात आता जिएसटी काय करतोय कुणास ठाउक. काही मित्रांच्या मते याचे फायदे पुढे दिसतील मोदी योग्य मार्गावर आहेत. काही कळेनासे झाले आहे. मात्र एक गोष्ट नक्की काँग्रेसच्या काळात हा १०००० कोटींचा तो २०००० कोटींचा घोटाळा झालाय असे ऐकायचो पण सामान्य माणसाला झळ लागायची नाही आता मात्र झळा जाणवतायत. नक्की ह्या सरकारने देशपातळीवर काही चांगले बदल घडवलेत का? भविष्यात आता मोदी जे निर्णय घेतात ते योग्य ठरू शकतील का? याबद्दल मिपाकरांचे काय मत आहे हे जाणुन घ्यायला आवडेल.

वाचने 24654
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

नोटाबंदीच्या काळात पंतप्रधानांनी आपल्या आमदार खासदारांना ८ नोव्हें २०१६ ते ३१ डिसें. २०१६ दरम्यान झालेले त्यांचे बँक व्यवहारांचे तपशील अमित शहांकडे जमा करायला सांगितले होते. असे तपशील दिले गेले असल्यास पुढे त्याचे काय झाले?