" भूत " एक सत्य कि मिथ्य ?
भूत होते कि अजून कोण हे तुम्हीच ठरवावे ?
आम्ही पूर्वी वरळीला समुद्रकिनारी राहत असू . डेव्हलपमेंटच फॅड नुकताच सुरु झालेलं होत . जुन्या इमारती जमीनदोस्त करायच्या आणि नवीन बांधायच्या . घटना घडली ते साल साधारण १९९५ असेल . मी , माझा भाऊ सागर आणि अजून एक मित्र मंगेश संध्याकाळी क्रिकेट खेळात होतो . खेळाडू जास्त नसल्याकारणाने आम्ही घराशेजारी एक जाण्यायेण्यासाठी बऱ्यापैकी मोठी अशी जागा होती त्या जागेमध्ये खेळ चालू होता . मी बराच वेळ आउट होत नसल्याने , जीवावर आल्याप्रमाणे सागर बॉलिंग करत होता आणि मंगेश विकेटकीपर होता . आमच्या इमारतीसमोर एक चाळ होती ती पुर्णपणे खाली करण्यात आली होती . तिथे नवीन टॉवर जो बनणार होता .
बऱ्यापैकी अंधार झाला असल्याने , मी तडकावलेला बॉल त्या चाळीत गेला . बॉल आणण्यास कोणीच तयार नव्हते . नाईलाजाने मी चाळीत घुसलो. मी बघितलं होत बॉल कुठे गेला होता ते . बॉल एका शेवटच्या घरात , जिथे पहिले कुंभारकारकाका राहायचे तेथे गेला होता .चाळीतले शेवटचं घर असल्याने , त्या घराला समोर एक छोटी पडवी होती. मी तिथे गेलो आणि बॉल कुठे दिसतोय का ते पाहत होतो . तितक्यात पायाला काहीतरी लागलं . कुणाची तरी साडी , कोणतरी आडवं पडलं होत .
मी अचानक झालेल्या अनपेक्षित स्पर्शाने पुरता धास्तावून गेलो आणि लागलीच मंगेशला हाक मारली . सागरने त्याला रोखलं आणि म्हटलं अरे त्याला शोधून देत बॉल . तो उगीच काहीतरी कारण देतोय . मी तस्साच परत धावत गेलो आणि काकुळतीला येऊन त्यांना सांगितलं कि कोणीतरी तिथे बाई पडली आहे .
आम्ही सर्व परत त्या घरात शिरलो , अंधार असल्याने फार्स काही दिसत नव्हतं . आम्ही त्या बाईला उचलून शेजारी रस्त्यावरच्या दिव्याखाली आणलं . तिथे ती बाई थोडी शुद्धीवर आली आणि फक्त " माया " एवढंच म्हणाली .
माया नावाची माझ्या मित्राची बहीण होती . शेजारीच असल्याने मी धावत मायाच्या आईला तिचा ओळखनामा करण्यासाठी बोलावण्यास गेलो . मामी ( मायाची आई ) धावत आल्या . त्यांनी तिला तुरंत ओळखलं . ती त्यांच्या चुलत भावाची बायको होती . ते सर्व जण बी डी डी चाळीत राहत होते . तिथे लग्नानंतर त्या बाईला काहीतरी भुतबाधेचा त्रास होता आणि ती अशीच पौर्णिमेच्या रात्री जर मोकळी असेल तर धावत समुद्रावर जायची . ती घर सोडून जाऊ नये म्हणून तिचे हात आणि पाय बांधण्यात येत .
असो ... या सर्व गोष्टीवर माझा विश्वास नव्हता . मी त्या फक्त ऐकायच्या म्हणून ऐकल्या आणि आम्ही सारे त्या बाईला , मायाच्या घरी घेऊन आलो ..
तिथे चटईवर तिला आडवे ठेवण्यात आले . मामींचं पुराण चालूच होत . मी त्यांना सांगूनही पाहिलं कि भूत बीत काही नसत .
मी, सागर आणि मंगेश त्या बाईच्या अवतीभवती उभे होतो . मी पाहिलं कि त्या बाईचे डोळे अर्धे उघडेच आहेत
आणि मला वाटलं कि ती फक्त पडून राहायचे नाटक करत आहे .. मी मामींना सांगितलं कि काही लोक उगाच बाधा झालीय असं सांगून छळत असतात .. तसे काही नसेल हे मी आता सिद्ध करू शकतो .
मी अचानक त्या बाईचे नाक दाबून धरले . काही वेळातच ती बाई , विचित्र पुरुषी आवाज काढू लागली आणि प्रचंड ताकद काढून तिने मला अक्षरशः उचलून आपटले . आणि माझ्यावर चालून आली .
काही क्षणात हे सारे चित्र पालटल्यावर , इतर साऱ्यांची पाळता भुई थोडी झाली . सागर क्षणात शोकेसवर चढून बसला . मंगेश गॅलरीत लपला .. मामी त्यांनी बाथरूम गाठला आणि आटऊन काडी लावून घेतली . आता फक्त मी आणि ती चवताळलेली बाई एवढेच उरलो . मी लगेच हातात झाडू घेतल्या आणि त्या बाईला प्रतिकार केला . थोडीफार नखे लागली पण थोड्याच वेळात ती पुन्हा जमिनीवर आडवी पडली ..
मग मात्र मी तिथून पाल काढला आणि इमारतीमधील बाकी सार्यांना बोलावून आणले .
हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आली .आणि मामींच्या घरात तोबा गर्दी उसळली . सर्व महिलामंडळ काय झालं ते विचारात होते . मामींनी माझ्याकडे बोट दाखवून म्हंटल , आम्ही सारे जागा मिळेल तिथे लपलो आघाडीवर हेच लढत होते . झालं माझा इंटरव्यू सुरु झाला .
पवार मामींनी परत प्रात्यक्षिक दाखविण्यास सांगितले . मी आधी समजावून सांगितले . कि प्रचंड ताकदीने ती उचलून फेकते , एवढ्या साऱ्या बायका , त्याही जाडजूड .. दरवाजातून बाहेर पाळताना , कुणाला काही लागलं तर ? तरीही बहुतेक जणीं आर्जवू लागल्या , तेव्हा कुठे मी परत तयार झालो . मला पुढे काय होणार याची पूर्वकल्पना होतीच , म्हणून खारबारदारीचा उपाय म्हणून , मी गॅलरीचा दरवाजा उघड ठेवला होता . जेणेकरून मला बाहेर लपता येईल .
मी सावधपणेच नाक दाबलं , जेव्हा भूत परत वैतागलं, मी आधीच गॅलरीत लपलो . पुढे काय झालं ते बघता आलं नाही पण , शिंदे मामींच्या पायाला तर मोहिते मामींच्या ढोपराला बाहेर पाळताना खरचटलं होत .
ती बाई दंगा करून परत आडवी पडली . नंतर तिच्या यजमानांनी तिला टॅक्सित घालून नेलं . पुढे काय झालं ते माहीत नाही तिचं पण तिथपासून आजपर्यंत एक प्रश्न मला पडलेला आहे . भूत सत्य आहे कि मिथ्या?
अजून दोन माझ्यासोबत घडलेलं प्रसंग आहेत ते मी नंतर सांगेन , पण मला मिपावासियांना हे विचारायचं आहे कि आपण या साऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवता का ?
सिद्धेश्वर विलास पाटणकर
याद्या
6139
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
आटऊन काडी लावून घेतली
आतून काडी लावून घेतली असं
In reply to आटऊन काडी लावून घेतली by दीपक११७७
आतून काडी लावून घेतली असं लिहायचं होत ....
In reply to आतून काडी लावून घेतली असं by सिद्धेश्वर विल…
दादा तुझ्या नावातला तो C
मस्त !
आम्ही नविन घरात रहायला
(No subject)
In reply to आम्ही नविन घरात रहायला by अमरेंद्र बाहुबली
मग मात्र मी तिथून पाल काढला
पळ काढला ....
सिद्धेश्वर साहेब
साहेब मी आपण दिलेली लिंक
पुर्वी समाज अशिक्षीत असल्याने
होय तुम्ही म्हणता ते खरं आहे
अनुभव आवडला...
In reply to होय तुम्ही म्हणता ते खरं आहे by सिद्धेश्वर विल…
भूत असतं की नसतं ते वैयक्तिक
मिपाला एका भुताने झपाटलय. ते
मिपाला एका भुताने झपाटलय>>>>
सगळ्या भुतांपेक्शा एक शॉलीड
In reply to मिपाला एका भुताने झपाटलय>>>> by प्रमोद देर्देकर
मला सकाळी भूत मित्थ्या वाटतं