Skip to main content

ग्रह व त्या॑च्या उपग्रहा॑च्या निरीक्षणासाठी कोणती दुर्बीण घ्यावी?

ग्रह व त्या॑च्या उपग्रहा॑च्या निरीक्षणासाठी कोणती दुर्बीण घ्यावी?

Published on मंगळवार, 30/05/2017 प्रकाशित
मी हौशी व प्राथमिक स्तरावरचा आकाश निरीक्षक आहे. मला परवडेल अशी (सुमारे १५ ते २० हजार रु. पर्य॑तची) शक्यतो भारतीय बनावटीची दुर्बीण विकत घेण्याबद्दल मिपाकरा॑कडून मार्गदर्शन अपेक्षित आहे. आपण सुचविलेल्या दुर्बिणीतील त्रुटी / मर्यादा , उत्पादक, अ॑दाजे कि॑मत याबाबत सविस्तर माहिती दिल्यास उपयोग होईल.

याद्या 4648
प्रतिक्रिया 15

https://akashmitra.wordpress.com/ या ग्रुपला कॉन्टॅक्ट करून पहा.

माफ करा ह, मी तुम्ही मागितलेली माहिती देत नाहीए.. मी शाळेत असताना 6" न्युटनीयन वापरत होतो. टिटॅनपर्यंत दिसायच. लेन्स (आयपीस) थोड खर्चिक काम होत तेव्हा.. आता माहीत नाही. बाकी दूरच्या आकाशगंगा छान दिसायच्या. एकदा तर सिंह राशीत क्लस्टर ऑफ गलक्सिसपण पाहिल्याच आठवतय. तसा योग पुन्हा आला नाही.. खर सांगू का ? ह्या सगळ्यात शेवटी काही समाधान मिळत नाही, आपल बजेट हे शेवटी तोकड पडतच.. त्यापेक्षा हबलच्या कम्पोसिट इमेजेस पहा. पैसे पण वाचतील.. :) -श

In reply to by शरभ

खर सांगू का ? ह्या सगळ्यात शेवटी काही समाधान मिळत नाही, आपल बजेट हे शेवटी तोकड पडतच.. त्यापेक्षा हबलच्या कम्पोसिट इमेजेस पहा. पैसे पण वाचतील.. Smile सहमत. मी बर्डींग बायनाक्युलर घेताना इतका रिसर्च केला की त्या पांच सहा महिन्यातच मी घेणार होतो ते मॉडेल बंद झाले, नंतर झक मारत निम्म्या क्षमतेची दुर्बीण घ्यावी लागली. :(

मी आताच अपग्रेड म्हणून सेलट्रॉन 70mm घेतली आहे, अमेझॉन वरून, चांगली टेलिस्कोप भेटली आहे, आधीची खराब झाली होती.

आयुकामध्ये दुर्बीण बनवायचा उपक्रम आहे. यात आपण आपली दुर्बीण बनवायची. खर्च १०-२० हजार. मेंटेनन्स चे सगळे कोपरे समजतात. http://scipop.iucaa.in/Amateurs/telemaking.html माझा बेत होतोय , वेळेचं गणित जमत नाहीये

In reply to by अभ्या..

बिज्जलदेवाने भल्लालला घेऊन दिलीय एक दुर्बीन. ती पण भारीय.
त्या दूर्बीणीतून काय दिसते त्याची एक भन्नाट "एक म्यान दोन तलवार" टाईप गीफ आलेली कायप्पावर ;)

https://www.indiamart.com/atul-traders-kolhapur/ यांच्याकडे आजवरची उत्तम टेलिस्कोप बघितली आहे.