शोध स्तूप आणि स्तव शब्दांचा
अलिकडे मराठी विकिपीडियातील संपादनांवर लक्ष ठेऊन असताना शतपथ ब्राह्मणातील 'स्तूप' या शब्दोल्लेखाचा संदर्भ दिला गेला आणि वगळला गेला. विकिपीडियातील उल्लेख शक्यतो केवळ प्रथम स्रोतावर आधारीत न राहता समिक्षीत ग्रंथांवर आधारीत असणे श्रेयस्कर असते पण बर्याचदा बर्याच नोंदींची साक्षेपी समिक्षा झालेली नसते त्यादृष्टीने त्यास समिक्षापोकळी म्हणावे असे वाटते.
शतपथ ब्राह्मणातील 'स्तूप' शब्दाचा उल्लेख दोन कारणांनी साक्षेपी समिक्षेस पात्र होतो असे वाटते तो उल्लेख कोणता ते पाहू
देवांचे स्तूप चौकोनी व असुरांचे गोलाकार असत. (शतपथ ब्राह्मण १३.८.२.१.४ ) संदर्भ (हा संदर्भोल्लेख नंतर लेखातून वगळला गेला आहे. शतपथातला मूळ संस्कृत श्लोक कोणता ते माहित नाही, जाणकारांनी मूळ श्लोक उधृत केल्यास आभारी असेन.)प्राचीन भारतीय उल्लेखातील असुर या शब्दाभोवतीचा गुंफलेला निगेटीव्ह नरेटीव्ह पाहता किमान प्रथम दर्शनी हे स्पृहणीय नसलेले स्टिरिओटायपींग असल्याचे आणि आजच्या काळात तार्कीककतेच्या कसोट्यांवर घासले असता तार्कीक उणीव असलेले आणि विनोदी वाटते. पण तरीही संस्कृत ग्रंथातील मर्यादीत आणि उशीराने आलेले उल्लेख पाहता, स्तूप शब्द वापरणार्या संस्कृत ग्रंथांच्या काल निश्चितीसाठी या शब्दाचा शोध उपयूक्त ठरावयास हवे असे वाटते. दुसरे स्तूपांची उभारणी मुख्यत्वे अशोकाच्या काळानंतर झाली भारतातील तत्पुर्वी अलेक्झांडरचे भारतात आक्रमण होऊन गेल्या नंतर ग्रिक कलांचा प्रभाव पडावयस लागला असावा तर स्तूप हा शब्द अलेक्झांडर पूर्व भारतीय शब्दातूनच तयार झाला असण्याची शक्यता किती कि ग्रिक आक्रमक येऊन गेल्यानंतरच्या इंडोयुरोपीयन प्रभावाने तयार झाला असू शकेल असा प्रश्न मनात येऊन गेला. संस्कृत विकिस्रोतात स्तूप शब्दाचा शोध घेतला असता प्रथम दर्शनीतरी शुक्ल आणि कृष्ण यजुर्वेदातील काही उल्लेखांपलिकडे इतर वेदांमध्ये हा शब्द येऊन गेल्याचे दिसत नाही. (चुभूदेघे) शुक्ल आणि कृष्ण यजुर्वेदातही कोणत्या अर्थाने आला आहे ते संस्कृत भाषा जाणकारच सांगू शकतील. शतपथब्राह्मण, तैत्तिरीयब्राह्मण आपस्तम्ब गृह्यसूत्र व्यतरीक्त मानसारम् नावाच्या संग्रहात स्तूप शब्दाचा मर्यादीत उपयोग झालेला दिसतो आहे. अर्थशास्त्रम् निघण्टुशास्त्रम् , वाचस्पत्यम् मध्ये उल्लेख दिसताहेत पण ते कदाचित शब्दकोश समकक्ष असावेत (चुभूदेघे) 'स्तूप' या वास्तूरचनेचा उपयोग मुख्यत्वे बौद्धधर्मीयांनी केलेला दिसतो. "महान व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी, केस इ. जमिनीत पुरून त्यावर दगड व मातीचा ढिगारा रचत." असा स्तूप आणि चैत्य यांचा उल्लेख सध्या मराठी विकिपीडियात दिसतो आहे. 'स्तूप' शब्दाची निर्मिती वस्तू शब्दावरून पवित्र वस्तू या अर्थानी झाली असेल आणि 'व' या अक्षराचा लोप झाला असेल. तर 'वस्तू ह्या शब्दाचे संस्कृत ग्रंथातील प्राचिनत्व शोधावे लागते' मग तो पुराण काळांपर्यंत मागे गेलेला दिसतो यात महाभारत आणि अग्निपुराणातील उल्लेख महत्वाचे असावेत कारण भवन निर्मितीचे उल्लेख या ग्रंथांमध्ये ठळकपणे येत असावेत. वास्तू शब्दही पौराणिक समकालीन पण कदाचित अजून थोडा जूना पण अधिक व्यापक उपयोग असावा (चुभुदेघे) युरोपियन भाषांचा मागोवा केवळ stup या चारच अक्षरांवर घेतला तर नॉर्वेजीअन भाषात cliff अथवा स्टीप उतार या अर्थाने आल्याचे दिसते. विषय निघालाच आहे तर stupa या अक्षर समूहाची इंग्रजी विक्शनरीवरील नोंदीची दखल घेण्यासही हरकत नसावी. topos हा शब्द ग्रीक भाषेत literally "place, region, space," या अर्थाने दिसतो. भारतीय भाषातून ग्रीक मध्ये गेला कि ग्रीक मधून भारतीय भाषेत आला माहित नाही पण 'टोपोस'चे 'स्तूप' शी उच्चार साधर्म्य लक्षणीय वाटते त्या शिवाय ग्रीक 'टोपोस' मध्ये अर्थ केवळ प्लेस या अर्थानी आहे त्यात धार्मिक अर्थ सामावलेला नाही ह्याचीही नोंद घ्यावी असे वाटते. topic शब्दाची व्युत्पत्ती शोधताना from Latin Topica, from Greek Ta Topika, literally "matters concerning topoi," "commonplaces," neuter plural of noun use of topikos "pertaining to a common place, of a place, local," from topos "place" असा उल्लेख एटीमऑनलाइनवर मिळाला. तोही दखल घेण्या जोगा वाटतो म्हणजे नुसते प्लेस म्हणण्या सोबत commonplaces असाही त्याचा जवळ जाणारा अर्थ topos शब्दास प्राप्त झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. Top या इंग्रजी शब्दाची uppermost part of a visual field ह्या अर्थछटेस peak, summit हे समानार्थी शब्द दिसतात. to-peak पासून Top शब्द आला असेल का हा एक वाईल्ड गेस झाला. एनीवे हे मुद करण्याचे कारण हे की summit या शब्दासही दोन अर्थछटा आहेत एक उंचीवरची जागा आणि आणि gathering of leaders ह्या अर्थाने इंग्रजीतील उल्लेख अर्वाचीन दिसत असलातरी इतर युरोपीअन भाषात केव्हापासून आहे हा वेगळ्या अनुषंगिक अभ्यासाचा विषय ठरावा असे वाटते. 'स्तूप' शब्दाशी सरळ कोणताही संबंध नसलेल्या एका शब्दाने अवांतर लक्ष वेधले ते म्हणजे stove या इंग्रजी शब्दाचे 'विस्तव' या शब्दाशी असलेले उच्चर साधर्म्य. stove शब्दाच्या सध्याच्या प्रचलीत युरोपीय भाषाशास्त्रींच्या व्युत्पत्ती वेगळ्या दिशेने जातात पण फारशा लांब पोहोचत नाहीत त्यापेक्षा विस्तव स्तवन या शब्दांचे साधर्म्य मला व्यक्तिगत पातळीवर जवळचे वाटते ते कदाचित चुकीचेही असेल तरीही. तसेच स्टॉप या इंग्रजी शब्दाची व्युत्पत्तीही त्यांच्या भाषाशास्त्रींना फार दूरवर नेता आल्याचे दिसत नाही. असो. या धाग्यासाठी चर्चेचे मुख्य विषय म्हणजे; स्तूप शब्द वापरलेले संस्कृत ग्रंथातील श्लोक त्यांचे अर्थ; स्तूप शब्दाची व्युत्पत्ती काय असू शकेल ? स्तूप शब्दाचा वापर भारतीय भाषांमध्ये कोणत्या कालखंडात चालू झाला असावा ? वापर चालू होण्यावरून संस्कृत ग्रंथांच्या कालनिर्णयात काही मदत होण्याची शक्यता असू शकते का ? शतपथ ब्राह्मणातील असुर हा उल्लेख ग्रीकांबद्दल असण्याचीही काही शक्यता असू शकते का ? अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार
याद्या
7263
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
स्तूप या शब्दाची १)
स्तू म्हणजे ढिगारा
In reply to स्तूप या शब्दाची १) by कंजूस
ढिगारा या अर्थाने 'स्तू' हा
In reply to स्तू म्हणजे ढिगारा by प्रचेतस
सतह हा हिंदी शब्द 'सत' या
In reply to ढिगारा या अर्थाने 'स्तू' हा by माहितगार
विकिस तर्कसुसंगत दुजोरा
In reply to स्तूप या शब्दाची १) by कंजूस
*शक्यता*
स्तुपाचा आकार - बुद्धाच्या
या प्रतिसादाशी सहमत!
In reply to स्तुपाचा आकार - बुद्धाच्या by कंजूस
पुस्तक डॉट ऑर्ग वर खालील
In reply to स्तुपाचा आकार - बुद्धाच्या by कंजूस
कॅप किंवा हॅट साठी भारतीय
In reply to स्तुपाचा आकार - बुद्धाच्या by कंजूस
अडिच हजार वर्षांपुर्वीचे
बुद्ध जयन्ती
उपरोक्त प्रतिसाद स्वतंत्र
In reply to बुद्ध जयन्ती by व्ही. डी. सी.
स्तुप
धागा लेख चर्चेचा मुख्य विषय
In reply to स्तुप by व्ही. डी. सी.
स्तुप
धागा लेख चर्चेचा विषय स्तूप
In reply to स्तुप by व्ही. डी. सी.
स्तूप
बुद्धाचे विचार, त्याकाळी
etymonline.com वर PIE *teuk-
थुपो मूळ पाली / प्राकृत शब्द
तसे पाहता जमीन, जागा, 'शेत',
In reply to थुपो मूळ पाली / प्राकृत शब्द by व्ही. डी. सी.