स्टेट बँकेच्या सहयोगी बँकाचे विलीनीकरण
उद्या पासून म्हणजे दिनांक १ एप्रिल पासून पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण स्टेट बंकेत होत आहे. देशपातळीवर याचे काय परिणाम होतील वगैरे या भानगडीत न पडता एक सामान्य ग्राहक म्हणून मला काय अडचणी येतील किंवा येवू शकतील या बाबत शंका वाटते. स्टेट बँकेतील कर्मचारी आधीच वैतागलेले असतात. त्यात अजून नवीन शाखांची व ग्राहकांची भर त्यामुळे सोय होण्यापेक्षा ग्राहकांची अडचणच अधिक होईल असे वाटते. इतर बँकांचा विचार करता जेथे गर्दी कमी तेथे सेवा चांगली असा अनुभव आहे. किमान आलेल्या खातेदाराला बसा असे जरी म्हणले तरी खूप झाले. माझ्या मित्राचे एक online बिल भरताना ७०० रुपये खात्यातून वजा झाले मात्र बिल काही भरले गेले नाही. त्याचे खाते स्टेट बँकेत होते. तक्रार करून काहीच फायदा नाही.उलट तुम्हाला नको त्या भानगडी कशाला करता असे ऐकावे लागले. त्याउलट माझे हैदराबाद बँकेत खाते आहे. माझे देखील अनेकदा ONLINE व्यवहारात पैसे खात्यातुन वजा झाले मात्र तक्रार केल्यानंतर ३-४ दिवसात ते परत देखील आले. आता मला काळजी वाटत आहे की, हैदराबाद बँक विलीन झाल्यानंतर स्टेट बँकेत मला चांगली सेवा मिळेल का ? आतापर्यंत सगळे चांगले चालले होते हि उगाचच काहीतरी भानगड झाली असे वाटते. मिपावरील मंडळीना देखील असे वाटते का?
याद्या
3439
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
असे काही होणार नाही
>>स्टेट बँकेतील कर्मचारी आधीच
कुनीतरी सांगा ना राव, कशे
आमच्या गावी युवे होती. सगळा
In reply to कुनीतरी सांगा ना राव, कशे by अभ्या..
शेअर्स ?
माझे पण SBH मधे अकाउंट आहे.
ह्यामुळे स्टेट बँक जगातील ५०
उद्या पासून म्हणजे दिनांक १
सर्वच लहानमोठ्या
काहीतरी चुकलंय ह्या तक्त्यात.
In reply to सर्वच लहानमोठ्या by डॉ सुहास म्हात्रे
माझी माहीती, http://www
In reply to काहीतरी चुकलंय ह्या तक्त्यात. by अभिजीत अवलिया