टी-परमीट घेण्याबद्दल मदत अपेक्षित
नमस्कार,
माझ्याकडे सध्या Renault Kwid ही टॉप मॉडेल कार आहे. कल्याण आरटीओ ला नोव्हेंबर २०१५ ला रजिस्टर्ड ही कार असून, कार साठी DNS बँकेतून ४ लाखांचे लोन काढलेले आहे व सध्या साडेतीन लाखांपर्यंत लोन बाकी आहे.
मला माझी ही कार प्रायव्हेट टू कमर्शियल अशी कन्व्हर्ट करून हवी आहे, त्यासाठी पुढील काही शंका आहेत, त्यांचे निरसन कोणी करू शकेल तर नवीन व्यवसाय करण्यासाठी मदत होईल:-
१. कार ला प्रायव्हेट टू कमर्शियल कन्व्हर्ट करण्यासाठी अर्थात टी परमीट घेण्यासाठी साधारण किती खर्च येऊ शकेल? हा खर्च एजंट मार्फत करावा लागेल की आरटीओ मध्ये आपण स्वतः जाऊन हे करणे शक्य आहे? शक्य असल्यास होणाऱ्या खर्चात, लागणाऱ्या वेळात आणि होणाऱ्या त्रासात किती फरक पडेल?
२. कार चा १ वर्षांचा इन्शुरन्स संपला आहे. टी परमीट घेण्याआधी इन्शुरन्स ची comprehensive policy घेणं अनिवार्य आहे का? की थर्ड पार्टी इन्शुरन्स घेतला तरी चालेल? कमर्शियल साठी इन्शुरन्स प्रीमियम जास्त असेल का?
३. कार लोनवर घेतलेली असल्याने, टी परमीट घेताना बँकेची भूमिका काय असेल? लोन घेताना प्रायव्हेट कार साठी घेतले असल्याने, टी परमीट घेताना इंटरेस्ट रेट आणि पर्यायाने इ एम आय वर काय फरक पडेल?
४. टी परमीट घेल्यानंतर मी स्वतः ही कार चालविण्यासाठी माझ्या रेग्युलर ४ चाकी लायसेन्स मध्ये काही बदल करावे लागतील का? की टी परमीट कार चालविण्यासाठी वेगळा वाहन परवाना घ्यावा लागेल? असल्यास त्याचा अतिरिक्त खर्च किती?
त्याशिवाय काही इतर गोष्टींची पूर्तता करणे गरजेजे असेल का?
५. टी परमीट रजिस्ट्रेशन होण्याआधी आरटीओ कडून कार चे इन्स्पेक्शन होणे अपेक्षित आहे का? त्यासाठी विशेष काही बाबींची पूर्तता करावी लागेल का?
६. व्यवसाय करण्यासाठी मी माझ्या घरच्या पत्त्यावर टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे गुमस्ता लायसन्स घेतले आहे, त्या व्यतिरिक्त इतर कोणकोणती कागदपत्रे आरटीओ मध्ये देणे अनिवार्य आहे?
ह्या शिवाय इतर काही तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता असल्यास त्या देखील नमूद कराव्यात, ही नम्र विनंती...
तज्ञ व्यक्तींचा सल्ला अपेक्षित.
धन्यवाद... __/\__
याद्या
5619
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
अवघडंय! पण जमेल.
सहमत.
In reply to अवघडंय! पण जमेल. by भटकंती अनलिमिटेड
भटकंती अनलीमीटेडने
In reply to अवघडंय! पण जमेल. by भटकंती अनलिमिटेड
प्रतिसादांबद्दल धन्यवाद..
इतक्या लवकर विकायची म्हणता
In reply to प्रतिसादांबद्दल धन्यवाद.. by बटाटा चिवडा
विकायची इच्छा नाहीये, पण
In reply to इतक्या लवकर विकायची म्हणता by टवाळ कार्टा
मला शीर्षकावरुन विनोदी लेखन
तज्ञ व्यक्तींचा सल्ला अपेक्षित.