जलीकट्टू आणि लीगल सोशलायझेशन
जलीकट्टू या तामिळनाडूतील पारंपारीक खेळात सहभागी खेळाडू उधळलेल्या बैलांना सहभागी खेळाडू त्यांच्या शिंगाना धरुन थांबवतात.
मानवाधिकारांप्रमाणे प्राण्यांच्या आधिकारांसाठी सुद्धा कायदे वेळोवेळी केले गेले त्यातील एक कायदा पंशुंविरुद्ध अनावश्यक क्रुरता टाळावी असे सांगतो. आणि संबंधीत जलीकट्टू खेळावर केवळ अटी टाकून सुप्रीम कोर्टाने पाहीले त्या पाळल्या गेल्या नाहीत म्हणून खेळावर सरसकट बंदी घातली. अशीच बंदी वस्तुतः बैलगाड्यांच्या शर्यतींवरही घातली गेली पण महाराष्ट्रातील लोंकानी फारशी खळखळ न करता सुप्रीम कोर्टाचा निर्णय निमुट्पणे स्विकारला.
सुधारणा विषयक कायदे समाजास स्विकारण्यास बर्याचदा वेळ लागतो. बर्याचदा अमुक एक कायदा आला समाजाने तो स्विकारला समाजाचे वर्तन बदलल्या नंतर असा कायदा आला होता हे ही समाजाच्या स्मरणात रहात नाही तर कधी कायदा स्विकारण्यास समाज मन तयार होत नाही.
सुधारणा आणि लिगल सोशलायझेशनचा मुद्दा मी मागेही एका वेगळ्या धाग्यातून वेगळ्या परिप्रेक्ष्यात चर्चीला होता बर्याचदा असा विचार समोर ठेवला जातो की समाजसुधारणा त्या त्या समाजातूनच पुढे येऊ द्याव्यात अंशतः हे खरेही आहे समाजसुधारणेचे विचार त्या त्या समाजातून पुढे यावयास हवेत पण समाज हेच एक युनीट आहे का ? त्या प्रदेशापुरता एक समाज अस्तीत्वात नाही का आणि समाज सुधारणेची सुरवात त्याच प्रदेशातील व्यक्ती कडून होणे अधिक श्रेयस्कर असणार नाही का ? मग त्या प्रदेशातील समाजाची मते बदले पर्यंत उर्वरीत समाजाने देशाने थांबले पाहीजे का ? अंदमानात इतर जगातील मानवाचे संबंध नाकारणार्या अदिवासींचा अधिकार आपण स्विकारतोच ना मग तामीळनाडू सारख्या विवीध राज्यातील परंपरा आतून बदले पर्यंत थांबले पाहीजे का ? असे कुठ पर्यंत थांबणे सयुक्तीक ठरते असे तुम्हाला वाटते ?
याद्या
3316
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
जोवर लोकानुनय हे
समाजातून येणे दुरापास्त
आपल्या प्रतिसादावरुन आठवले
In reply to समाजातून येणे दुरापास्त by पैसा
:)
In reply to आपल्या प्रतिसादावरुन आठवले by माहितगार
मला पण त्यांच्या बद्दल माहित
In reply to :) by पैसा
DNA च्या एका स्तंभ लेखात
Harini Calamur च्या अॅनालॉजी
In reply to DNA च्या एका स्तंभ लेखात by माहितगार
सांस्कृतिक अभिव्यक्ती
In reply to Harini Calamur च्या अॅनालॉजी by माहितगार
ह्याच विषयावर असलेल्या एका
ह्या धाग्याचा विषय त्या
In reply to ह्याच विषयावर असलेल्या एका by फेदरवेट साहेब
+१
In reply to ह्या धाग्याचा विषय त्या by माहितगार