Skip to main content

वधूपरिक्षेच्या पारंपारिक पद्धतीत सुधारणा शक्य आहे का?

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शुक्रवार, 13/01/2017 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
वधूपरिक्षेच्या पारंपारिक पद्धतीत सुधारणा शक्य आहे का? मुली बघण्याच्या पारंपारिक पद्धतीमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत तसेच काही दोषसुद्धा आहेत आपल्याला जर एखादी वस्तू विकायची असली तर आपण काय करतो? त्या वस्तूला सजवून मांडतो, त्यातले दोष झाकून असलेले अन नसलेले गुण वर्णन करून सांगतो. वधू वर परीक्षणाचही असंच आहे. ही निवडप्रक्रिया बऱ्याचअंशी दिखाव्यावर आधारीत असते. शिवाय पहायला गेल्यावर मुलगा अन मुलगी फक्त पाच ते दहा मिनीटं समोरासमोर असतात. अन तेवढ्या भेटीवरच लग्नाचे निर्णय घेतले जातात. एकमेकांचे स्वभाव कळण्याचा प्रश्नच नाही. यावर एक उपाय असा सुचवला जातो की मुलीला एकदोन वेळा वैयक्तिकरित्या भेटावं आणि आपल्या अपेक्षा वगैरेंबाबत बोलावं. पण अशा भेटीतून खरा तो किंवा ती एकमेकांना कळतात का ही शंकाच आहे. कारण अर्थातच मुलीला(आई, वडील, बहीण, मैत्रीण इ.)घरून पढवून पाठवलेलं असतं की त्यांच्याशी असं असं बोल.चांगल स्थळ आहे जमलंच पाहिजे वगैरे वगैरे. मला पडलेला गहन प्रश्न असा आहे की वरील परिस्थितीवर काही उपाय शक्य आहे का जेणेकरून ती त्याच्यासाठी योग्य आहे की नाही याची थोडी तरी चाचपणी करता येईल? मत,कल्पना, सल्ला, अनुभव ?

वाचने 15957
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

In reply to by चिनार

अहो नवीन कुठे आहे हे ? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असही म्हणतात ना त्यालाच. अनिल कपूर , काजोलचा हम आपके दिल मे रहते है १९९९ चा आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

contract म्हणजे दोघांनी बघायचं की आपण एकमेकांना 'पती-पत्नी म्हणूनआवडतो की नाही' .. कुणा एकाचं उत्तर 'नाही' असलं की contract period नंतर लग्नाचा दी एन्ड, असं..

बऱ्याच लोकांनी चांगले सल्ले दिलेत, असेही मिपाकर मदतीला तयार असतातच! या गोष्टीवर सल्ला वगैरे देण्याचं माझं वय नाही पण मग गोष्टच सांगतो! इथे बऱ्याच लोकांना माहित आहे, बघा तुम्हाला काही फायदा होतो का... एकदा एक गुरु त्यांच्या शिष्याला एका बागेतून सगळ्यात सुंदर फूल आणायला सांगतो. बाग मोठ्ठी असते आणि त्यातून एक सरळ रस्ता जात असतो. पण हे काम करताना एक नियम देखील असतो की एकदा एखादे फुलझाडं ओलांडले कि पुन्हा मागे वळून त्याचे फूल घ्यायला यायचे नाही. शिष्य बागेमध्ये जातो. बराच वेळ झाल्यानंतर तो रिकाम्या हाताने गुरुकडे परत येतो. गुरु विचारतात,"रिकाम्या हाती परत का आलास?" त्यावर शिष्य म्हणतो कि," मी बागेत चालायला सुरुवात केली तेव्हा सगळ्या झाडांना विविध प्रकारची फुले होती. कोणाचा आकार मोहक होता, कोणाचा रंग, कोणाचा सुगंध छान होता पण दरवेळी मला वाटायचं कि याहीपेक्षा सुंदर फूल मला पुढे मिळेल. मग मी पुढे चालत राहिलो आणि बराच वेळ चालल्यावर बागेच्या शेवटाला पोहोचलो! तेव्हा जाणवले तिथे असलेल्या फुलांपेक्षा आधीची फुले सुंदर वाटत होती. पण आता मागे जाऊ शकत नसल्याने मी रिकाम्या हाती आलो..." गुरु हसले आणि म्हणाले,"आकर्षण असे असत. माणसाला कायम वाटत राहत कि अजून आकर्षक काहीतरी पुढे मिळू शकेल आणि त्याला शोधत राहतो... शेवटी कायम रिताच राहतो! "आता तू असे कर, पुन्हा बागेत जा आणि तुला जे फूल सुंदर वाटेल ते घेऊन ये!" शिष्य पुन्हा जातो. यावेळी परत येताना मात्र त्यांच्या हातात एक सुंदर फूल असते. गुरु विचारतात,"हे सगळ्यात सुंदर आहे का?" शिष्य म्हणतो,"माहित नाही गुरुजी, पण जेव्हा मी हे फूल पाहिलं तेव्हा ते मला आवडले! कदाचित याच्यापेक्षा सुंदर फुले बागे मध्ये असतीलही पण मग मला त्यांच्याकडे बघण्याची गरज वाटली नाही. माझ्यासाठी हेच फुल सुंदर आहे!" गुरुजी हसले आणि म्हणाले "प्रेमाचं असे असते एकदा एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडले कि ती तुमची होऊन जाते. मग त्याला गुण किंवा दोष यामध्ये तोलण्याची गरज पडत नाही" असच काहीस लग्नाबद्दल म्हणता येईल... जशी आठवली तशी लिहिलीये बर का! ;)

खूप छान कथा शब्दबंबाळजी. मी ऐकलेली नव्हती. लग्नाच्या बागेत मात्र एकच चक्कर मारायला मिळते पण वरील कथेतला दृष्टीकोन वापरल्यास शोधाशोध सोपी होईल. धन्यवाद

In reply to by अॅस्ट्रोनाट विनय

त्यावर एकच सोल्यूशने. एका वेळी एकच विंडो उघडायची, ती बंद केल्यावर पुन्हा मागे पाहाणे नाही. विंडो बंद केली की विषय संपला, नो कंपॅरीजन. याचं कारण म्हणजे कंपॅरीजन अशक्य आहे. दोन व्यक्ती पूर्णतः वेगवेगळ्या आहेत. आणि एकदा निर्णय झाला की पुढची विंडो उघडायची नाही! नाऊ इट इज ऑल डन.

रेवती मॅडम, बरूबर हाये तुमचं. सगळ्यांचे विचार आयकून माझ्या टकूळ्यात प्रकाश पडतोय. एक ठोस विचार तयार व्हायला मदत होतीये. तुम्ही म्हटल्याप्रमाणे ध्यानीमनीही नसतात अशा पद्धतीने लग्न ठरतात कधीकधी. माझ्या आत्याभावाला एका मुलीचं स्थळ आलं होतं,ती बँकेत नोकरी करायची. पठ्ठ्या गेला बँकेत, दोन तिन तासांत काय observe केलं काय माहीत पण बाहेर येऊन सुमडित मला बोलला की पोरगी पसंद आहे. नंतर मुलगी बघण्याचा फक्त औपचारिक कार्यक्रम. माझा चुलतभाऊ त्याच्या मामाच्या गावी गेला, तिथे त्याच्या लग्नाचा विषय निघाला. नेमकं तेव्हा समोरच्या घरातली मुलगी सडा टाकत होती. त्याची आजी बोलली की ही समोरची पोरगीपण आहे लग्नाची सांग कशी वाटते? गड्याला आवडली की एकाच नजरेत. कशाच बोलणं अन कशाच भेटणं. एकही पोरगी पाहली नाही त्यानं. आता मस्त चालू आहेत की दोघांचे संसार थोडक्यात This is a game of chance :)

त्याने आणि तिने थोडावेळ एकमेकांशी बोलून, समजवून घेऊन लग्न करण्याचा धोका पत्कारावा .. किंवा त्याने आणि तिने बरीच वर्षे एकमेकांना स्मजाऊन घेऊन मग लग्न करण्याचा धोका पत्करावा... :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

विवाह ही मजा आहे. फुल एंटरटेनमंट आहे. तो सहवासाचा आनंद आहे. एकटा प्रवास करण्यापेक्षा सहप्रवासी असला की जगणं मजेचं होतं.

In reply to by जयंत कुलकर्णी

पण प्रश्नकर्ता लग्नाच्या प्रतिक्षेत आहे त्याला धोक्याचा कंदील कशाला ? म्हणून प्रतिसाद दिला.

लग्न (मग ते arrange marriage असो की love marriage ) ही व्यक्तीसापेक्ष गोष्ट आहे. तुमची वृत्ती खिलाडू नसेल तर कुठल्याही मुलीसोबत लग्न केलं तरी ते फसेल, असेल तर ते टिकेल. अर्थात ऐकानेच समजूतदार असून भागत नाही.तिचीसुद्धा तशीच वृत्ती हवी. याअर्थाने हा धोका आहेच. पण संक्षीजींचा दृष्टीकोन कामात पडणारा आहे. आणि तुम्हाला compromise करत जगायचं नसेल तर त्यांच्या theory ला आणि विवाच्या कथेला पर्याय नाही.