मुघलांशी झुंजत असतांना एकदा संभाजीराजे दक्षिणेला पोचले आणि त्यांनी तंजावर येथे मुक्काम केला. तेथे त्यांना आमटी खायची इच्छा झाली. तंजावरच्या आचाऱ्यांना त्यांनी आमटी बनवायला सांगितली. पण आमटीत लागणारी मूग डाळ, कोकम इत्यादी तंजावरचा काय तर अख्या तामिळनाडूत मिळत नसल्याने आचारी काळजीत पडले. शेवटी वेळ मारून नेण्यासाठी त्यांनी
आमटीत कोकमाच्या जागी चिंच आणि मूग डाळीच्या जागी वाटाणा टाकला आणि भीत भीत तो पदार्थ संभाजीराजांना सादर केला. राजांना ती आमटी फारच आवडली आणि त्यांनी त्या आचाऱ्यांना बक्षिसे दिली म्हणतात. त्या दिवसापासून त्या आमटीला संभाजी राजांवरून 'संभार' (मराठीत 'संभाचे') असे म्हणत. त्याचाच अपभ्रंश म्हणजे सध्याचा सांबार. अजूनही तामिळनाडूमध्ये तंजावरचा सांबार उत्कृष्ट समजला जातो.
तानाजी मालुसरे यांनी कडा चढून सिंहगड जिंकला हे सर्वांनाच माहित आहे. हाच फंडा वापरून मराठ्यांविरोधात इंग्रज कर्नल जो मूर याने सिंहगड जिंकायचा ठरवला. मुरच्या नेतृत्वात काही सैनिक कडा चढतील आणि इतर सैनिक दरवाज्यावर हल्ला करतील हा बेत ठरला. पण ऐन वेळी हल्ला सुरु असतांना जेथे मूर लढत होता तेथे आग लागून तो वगळता सर्व मारले गेले. पण सिंहगड इंग्रजांच्या ताब्यात आला आणि मूर 'immortal joe' मानून ओळखल्या जाऊ लागला.
mad max: fury road मधला मुख्य खलनायक त्याच्यावरच बेतलेला आहे असे म्हणतात.
जयपूरचा राजा सवाई माधोसिंग हा अतिशय लठ्ठ होता. त्याच्या कपड्यांचा घेरच चार फूट असे. तलावात नौकेत फिरायला जात असतांना सुद्धा त्याला नौका बॅलन्स करण्यासाठी जास्तीची पाच सहा माणसे सोबत घ्यावी लागत. तसेच त्याला ११० बायका आणि अंगवस्त्र होत्या तसेच >२०० मुले होती असे म्हणतात.
जर तुम्हाला अजूनही अनेक किस्से, कहाण्या किंवा तथ्ये माहित असतील तर या धाग्यात ऍडवा आणि हा धागा वाढवा.
--१०० प्रतिसादांच्या प्रतिक्षेतला राक्षस.
प्रतिक्रिया
त्या दिवसापासून त्या आमटीला
मला
In reply to त्या दिवसापासून त्या आमटीला by आदूबाळ
संभाजी सारम
In reply to त्या दिवसापासून त्या आमटीला by आदूबाळ
सांबाराच्या उगमाची कहाणी खरी
In reply to त्या दिवसापासून त्या आमटीला by आदूबाळ
ह्म्म
In reply to सांबाराच्या उगमाची कहाणी खरी by प्रसाद गोडबोले
वा
उत्तम धागा.
सध्या
In reply to उत्तम धागा. by पद्मावति
चिनी, जपानी, कोरियन युद्धक्रीडाप्रकार
काही प्रश्न
एक दुरुस्ती
In reply to काही प्रश्न by रमेश आठवले
धन्यवाद
दाल माखनी
माफ करा, चुकीची पोस्ट टाकली.