Skip to main content

विवाह

Published on मंगळवार, 13/12/2016
.. वैदीक विवाहात एक नवा विधी आला आहे... विवाह वेदीवर वधु वरांनी एकमेकास "मधु मिठीत "घेण्याचा

याद्या 8113
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

त्यापेक्षा किरिस्तावांचा आदर्श ठेवता आला तर बघा बुवा ! कसें !

सदर सिझणमधी आम्मी लावलेल्या येकाही इवाहात हे घडल्यालं णाही.. थेच्यामुळे ही जिल्बी आम्मी काल् पनिक माणतो. ढन्य वाड!

In reply to by अत्रुप्त आत्मा

हे म्हणजे आज आमच्याकडे हवामान ढगाळ आहे म्हणून कुठेच सूर्य उगवलाच नाही असं म्हणण्यासारखं झालं !!

चित्र नीट बघा. पुरुषाने मुंडावळ्या बांधलेल्या नाहीत. तो वधूचा भाऊ असणार नक्कीच. काहीही खपवू नका.

In reply to by पैसा

बाकी सगळं ठीक आहे ताई..पण काहीही खपवू नका ह्या वाक्याचा सौम्य निषेध नोंदवू इच्छितो. ह्या असल्या कंडीशन तुम्ही अकुकाकांना सांगणे योग्य नाही. मुळात 'काहीही' हाच त्यांच्या लिखाणाचा पाया आणि सेलिंग पॉईंट आहे..! तुमचा सौम्य निषेध आणि अकुकाकांविषयी असलेला आदर अधोरेखित करण्यासाठी मी मिपावर १५ मिनिटाचे मौन पाळत आहे..

In reply to by पैसा

मलाही दिसली मुंडावळ्याची दोरी. भाऊ मिठीत शक्यतो बिदाई च्या वेळेस घेतो, फोटोत मागे उभी असलेली मुलगी हसते आहे, एक माणूस टाळ्या वाजवतो आहे. बिदाईच्या वेळेस टाळ्या वाजवण्याच्या मनस्थितीत कुणी असते का ? अपवाद म्हणून एखाद्या विवाहात हे घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अकुकाका मुळे या गोष्टीचा प्रचार होऊन प्रथा रुजू झाली तर या विधीचे नाव अकुमिठी पडावे !

In reply to by संजय क्षीरसागर

त्यांच्यामुळे झाली प्रथा तर तेवढं क्रेडीट तर मिळायला हवं ना त्यांना :) पण असू दे मराठी वळणावळणावर बदलते त्यामुळे काही अकुमिठी म्हणतील काही मधुमिठी. आपल्याला काय विधीशी मतबल!

In reply to by पैसा

तू म्हणलीस तर आधी दिसली नाही.. मग कुणीतरी म्हणलं म्हणुन नीट पाहिलं तर दिसली.. जाउ दे.. मी दुसरा पुरावा देते अकुंना सपोर्ट करायला. हा मृण्मयी देशपांडेच्या लग्नातला फोटो. आत्ताच झालंय जस्ट. आणि तो तिचा नवराच आहे. पण म्हणुन आता ही नवी पद्धतच आली आहे असं म्हणणं थोडंसं जास्त होतंय, पण अकुंना सुट करतंय सो... mithi

In reply to by पिलीयन रायडर

सदर नवरोबा मोंडालेझ*मध्ये कामाला आहेत का? पगडी/फेटा बघून वाटलं... *सध्या कॅडबरी ब्रँडचा मालक असलेली कंपनी

In reply to by आदूबाळ

खि खि खि!! नाही हो.. असं काही तरी त्यांच्या चेपुवर लिहीलय.. स्वप्निल राव Director (company) at Transhuman Collective Managing Director at Mobizon Media Worked at xenium digital pvt ltd

In reply to by बोका-ए-आझम

बाबौ हे फोटो परवडले हो राया, ते शब्द लैच बेक्कार असते ना भाऊ, तुमच्यावानी शब्दप्रभु मानसाले काय अलग सांगा लेक हेच्यावर ;) .

In reply to by बोका-ए-आझम

मग तुम्ही त्यांचे ह्या पेक्षा भयानक धागे पाहिलेले नाहीत. तेव्हा आमच्या नशिबात ज्या दोन चार मिनिटांसाठी धागा बोर्डावर राहिला त्या दोन मिनिटात धागा बघणे असल्याने, काही महान फोटो पहायला मिळाले होते. त्या नंतर धागाच काय, अकु सुद्धा उडतील असं वाटलं होतं. त्या मानाने मग हा धागा अत्यंत सोज्वळ आहे.

आमच्या वेळी हे असे नव्हते. सर म्हणतात तशा सुधारणा जर पुढेही चालु राहिल्या तर "दा विंची कोड" मधे उल्लेख झालेली प्रायरी पंथाची प्रथाही लग्नविधीचा एक भाग होईल. पैजारबुवा,

अवांतरः बेंबट्या आपल्या लग्नातल्या 'लवंगा तोडणे' नामक विधीचा उल्लेख करतो. कोणाला माहिती आहे का या विधीची? वर-वधु एक लवंग एकसाथ दाताने तोडतात कि काय???

In reply to by संजय पाटिल

आमच्या वेळी नव्हती असली थेरं ;) पण आम्हाला काहि फरक पडला नाहि... कारण.. असु दे.

गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहोत आम्ही तर अशा "मधु मिठी" साठी :P पण विरोधी पक्षच उपलब्ध नाही :(

मिठी मारणे अथवा चुम्बन घेणे विवाहात (अर्थात विधीचा एक भाग म्हणून नाही) यात काही गैर नाही असे वाटते, किंबहुना विवाहापूर्वी घेणे ही चुकीचे वाटत नाही मला.