डिमॉनीटायझेशन प्रकाराने हात बांधल्या सारखे झालेत आणि आणखी चर्चेचा कंटाळा आलेला असतानाच डोनाल्ड ट्रंपच्या जावयाच्या निमित्ताने आमेरीकेतील नेपोटीझमचा कायदा चर्चा वाचनात आली. आमेरीकेत नेपोटीझम बद्दल कायदा अस्तीत्वात आहे हेच माहित नव्हते तर या आमेरीकेतील कायद्याचे स्वरुप काय आहे ? भारतात असे काही कायदे आहेत का ? नेपोटीझम बद्दल आमेरीकन लोकांच्या तुलनेत भारतीय लोक आणि त्यात महाराष्ट्रीय लोक उदासिन असततात की उत्साही असतात ?
आणि नेपोटीझमला (nepotism) मराठी परिभाषा कोशात आप्त पक्षपात, आप्तानुग्रह, स्वजनपक्षपात, बंधुपक्षपात, रिश्तेबाजी, कुलपक्षपात इत्यादी शब्द दिसतात यातील अधिक चपखल शब्द कोणता ? किंवा दुसरा कोणता शब्द सुचवता येईल का ?
नेपोटीझम = घराणेशाही हा शब्दप्रयोगही बरोबर आहे का ?
याद्या
934
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
माहितगारसाहेब, पुनरागमनाबद्दल अभिनंदन!