नमस्कार.
मी एका दोन बीएचके फ्लॅट ची नोंदणी केली आहे. स्टेट बँकेचे ८८% कर्ज घेतले आहे आणि दोन हप्ते झालेत. एकूण आठ माजले असलेल्या इमारतीत माझा फ्लॅट पाचव्या मजल्यावर व माझ्या भावाचा फ्लॅट पहिल्या मजल्यावर आहे. इमारतीचे बांधकाम सध्या चौथ्या मजल्यापर्यंत आले असून पाचव्या मजल्याचे कॉलम व छत पूर्ण झाले आहे.
फ्लॅटचा फ्लोअर प्लॅन असा आहे:
खालील बाबतीत मला सल्ला, माहिती, अनुभव इ हवे आहेत.
अ. फ्लॅटच्या अंतर्गत रचनेविषयी:
१. देवघर ही एक स्वतंत्र (३*४ फुटाची) खोली बांधून घ्यावी की ते शोभिवंत लाकडाचे/ प्लायवुडचे असावे की संगमरवराचे असावे की अजून काही?
२. माझ्या भावाने त्याच्या फ्लॅटमध्ये किचन एरिया वाढवून घेऊन देवघर त्यामध्येच घेतले आहे पण मला किचन मध्ये देवघर असणे प्रशस्त वाटत नाही. (प्लॅनमध्ये किचनच्या बाजूला दिसणारा केशरी रंगाचा चौकोन ही देवघराची नियोजित जागा आहे.) आपला काय सल्ला आहे?
३. किचन मध्ये वूडवर्क करायचे आहे, पण प्लायवुडला कालांतराने वाळवी लागते असा अनुभव आहे. काय करावे?
४. दोन स्नानगृहां पैकी एकामध्ये पाश्चात्य शैलीचे आणि एकात भारतीय शैलीचे शौचालय असावे असे पत्नीचे मत आहे. भारतीय शैलीचे शौचालय खूपच जागा व्यापेल आणि नंतर गरज पडल्यास बदलणे फार अवघड होईल असे साईट इंजिनीअरचे मत आहे. भारतीय शैलीचे शौचालय (विशेषतः निमशहरी भागातील स्त्रियांसाठी) गरजेचे आहे का?
५. सध्या जिथे मी राहतो तिथे आम्ही गच्चीवर कपडे वाळू घालतो. नवीन फ्लॅटमध्ये गेल्यावर बहुधा गच्ची वापरायला मिळणार नाही किंवा ती वापराने गैरसोयीची असेल, अश्या वेळी काय करावे?
ब. खरेदी व्यवहार कर्ज इ. विषयी:
१०. कर्ज घेताना शाखा व्यवस्थापकाने खूपच मदत केली, अतिशय मैत्रीपूर्ण व्यवहार केला, आणि कमालीच्या झटपट वेळेत कर्ज मंजूर करून disbursement देखील केली. तथापि त्याने एसबीआइ ऋण रक्षा हा गृह कर्ज संरक्षण योजना या प्रकारचा विमा मी घ्यावा असा आग्रह केला. मला तो विमा फारसा पटला नाही आणि मी तो घेतला नाही.
माझा पुरेश्या रकमेचा टर्म इन्शुरन्स आधीपासून आहे. या घराच्या कर्जाला संरक्षण म्हणून अजून एक कर्जाच्या रकमेइतका आणि मुदतीइतका एसबीआइचा टर्म इंशुरन्स घ्यावा असा माझा विचार आहे.
असा विमा बँक तारण म्हणून ठेवून घेते का? कर्जाच्या मुदतीत जर कुठल्याही कारणाने माझा मृत्यू झाला तर बँक माझया वारसाला उर्वरित कर्ज न मागता त्या विम्यातून कर्जाची रकम वसूल करून घेऊन उरलेली रक्कम माझ्या वारसांना देईल याची खात्री आहे का?
११. माझा बिल्डर बऱ्यापैकी नामांकित आहे, पूर्ण व्यवहार केवळ चेकने व ऑनलाईन ट्रान्सफरने झाला आहे तरीही फ्लॅट खरेदी करताना बिल्डरकडून कुठे कुठे फसवणूक होऊ शकते?
अजून मुद्दे सुचले तर प्रतिसादांतून सांगेन.
विस्कळीत शीर्षक/धाग्याबद्धल क्षमस्व. प्रतिसादकांचे आगाऊ आभार.
याद्या
2712
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन
देवघरात ..
पंडित जी
चांगल्या कंपनीचे वाळवी आणि
१. देवघर ही एक स्वतंत्र (३*४