हल्ली बऱ्याच ठिकाणी समान नागरी कायदा याविषयी बऱ्याच चर्चा सुरु असतात. पण याविषयी स्पष्ट आणि सोप्या स्वरूपात प्रत्येकाला माहिती असते असे नाही.
या काथ्याकूट चा उद्देश "समान नागरी कायदा" या विषयावर अधिकाधिक चर्चा करून ती माहिती उपलब्ध करून देणे असा रहावा असे वाटते...
चर्चेचे साधारण मुद्दे:
1. समान नागरी कायदा म्हणजे काय?
2. भारत सारख्या हजारो जाती धर्म आणि तितक्याच प्रथा-परंपरा असलेल्या देशात असा समान कायदा करण्याचा उद्देश आणि उपयोग काय?
3. आपण भारताच्या ज्या विविधतेबद्दल बोलत असतो त्यामध्ये या कायद्याने काही बाधा येऊ शकते का?
4. हा कायदा झाला तर तो जणू काही मुस्लिम विरोधात आहे असे वातावरण तयार होत आहे त्याला काही आधार आहे का?
5. हिंदू धर्मातील सगळे समुदाय देखील यासाठी अनुकूल असू शकतील काय?
याबद्दल माझी सध्याची मते खालील प्रमाणे आहेत: (ती बरोबर असतील असे नाही, चर्चेतून योग्य माहिती मिळू शकते)
समान नागरी कायदा हा घटस्फोट, पोटगी, वारस हक्क यासारख्या कौटुंबिक गोष्टींसाठी असेल. जर याबाबत तयार केलेले निकष कुठल्याही समाजाच्या/धर्माच्या व्यक्तीने मोडले तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाही केली जाऊ शकते.
भारतीय दंड संविधान आधीपासूनच या तत्वावर काम करत आहे. पण प्रत्येक जाती-धर्माच्या प्रथा वेगवेगळ्या असल्या कारणाने घटस्फोट, पोटगी, वारस हक्क या सारख्या गोष्टी अजूनही वेगवेगळ्या प्रकारे हाताळल्या जातात.
अशा परिस्थितीत खरंच समान नागरी कायदा अस्तित्वात येऊ शकतो का?
याद्या
10790
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे बापरे! स्फोटके भरायला हवी
गोव्यात समान नागरी कायदा आहे.
कायदा हा नेहमीच सामान हवा तो
कायद्याची उपयुक्तता हि ज्याने
In reply to कायदा हा नेहमीच सामान हवा तो by साहना
समान नागरी कायदा : अवांतर
दुरून डोंगर साजरे !
In reply to समान नागरी कायदा : अवांतर by chitraa
काही म्हणा पण भावी
In reply to दुरून डोंगर साजरे ! by साहना
या लेखात वेगवेगळ्या धर्मामधील