खूप दिवस ही मळमळ मनात खदखदत होती... मिपाचा हा प्लॅटफॉर्म एखादा विषय चर्चिण्यासाठी अगदी योग्य आहे. आणि मुळात, मला माझे मत बदलायचे आहे ह्यासाठी हा विषय मी इथे मांडत आहे...
पोलीस कायद्याचे रक्षक आहेत. ते आपल्यासाठी आहेत. ते आपल्यासाठी त्यांचे कर्तव्य पार पाडत असतात. ते खूप हालअपेष्टा सोसत असतात. त्यांचा पगार खूप कमी असतो. तरी ते आपल्यावर उपकारासारखं काहीतरी करत असतात. आपण त्यांचा आदर केला पाहिजे. आपण पोलीस मित्र म्हणून वागलं पाहिजे. आपलं संरक्षणखातं आणि पोलीस खातं एकंच काम करतं. ते बाहेरच्या शत्रूंच्या विरोधात लढतात आणि हे आतल्या शत्रूंच्या विरोधात... वगैरे वगैरे... लहानपणापासून हेच ऐकत आलोय. वर्तमानपत्रातून... रेडिओवर... चर्चासत्रांतून... सोशल मीडियातून हाच सूर दिसतो. पण माझं निरीक्षण खूप वेगळं आहे. कदाचित सगळ्यांचंच तेच निरीक्षण असेल.
१. पोलीसखातं महसूल खात्यासारखंच अत्यंत करप्ट आहे. बहुतेक पोलिसांचं पोट उगाच वाढलेलं नसतं. जे उन्हातान्हातून ट्रॅफिक आणि गर्दी कंट्रोल करतात ते जास्त करून झीरो पोलीस असतात, कॉन्ट्रॅक्टबेसिस वरचे. तेही अधूनमधून हात मारतच असतात. पुण्यात जवळपास बर्याच पोलीस स्टेशन जवळ ऑनलाईन मटका जोरात चालतो. तिथले पोलीस आंधळे नसतात. दणक्यात मलिदा मिळतो... अगदी कमिशनर पर्यंत हे पैसे जातात असं ऐकलंय... नॉन-करप्ट पोलीस माझ्यातरी पाहण्यात नाही. आमच्या गावातल्या एका पोलिसांचं प्रकरण तर विधानसभेत गाजलं होतं.. आता त्यांना आमदारकीची स्वप्ने पडत आहेत.
२. पोलीस कधीही आपले मित्र म्हणून वागत नाहीत. उलट त्यांचे हात मोकळे करायचे साधन म्हणजे सामान्य जनता, बऱ्याचदा असंच त्यांचं वर्तन असतं. अश्यातला माझा अनुभव सांगतो.. आमच्या कॉलेजमध्ये एक प्रकरण घडलं होतं. मुलीच्या तक्रारीवरून मुलाला वाकड पोलीस चौकीवर बोलावलं. तिच्या नुसत्या तक्रारी वरून मुलाला बेदम मारलं.. एक दिवस कस्टडीत पण होता तो. आम्ही फॅकल्टी म्हणून तिथे गेलो होतो. त्यांनी आम्हाला विचारलं "इथे कशाला #$%$ घालायला आला आहात?" आम्ही म्हणालो कि आमचा विद्यार्थी आहे तो म्हणून आलोय. मग ते म्हणाले "मग काय त्याला आमच्या $%# वर बसवू" आंम्ही म्हणालो "अहो तो मुलगा लहान आहे हो आणि काहीच चौकशी नं करता का त्याला मारताय?" त्यांनी आमचा अजून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. आणि आमच्या अंगावर "जाता कि नाही आता" म्हणून आले. आम्ही निघालो. दुसर्या दिवशी त्याला बेल मिळाली. एक आठवड्यात त्याने कॉलेज मधून टीसी घेतला. कॉलेजची बदनामी नको व्हायला म्हणून आम्हाला शांत बसायला सांगितलं गेलं. निदान मला तरी तुलनेने कायदे जरा जास्त माहिती आहेत. काय उपयोग? फाटायची ती फाटलीच कि... सामान्य माणसाची काही वेगळी गत असते? नुसत्या तक्रारीवरून कुठलीही चौकशी नं करता मारहाण करायचा त्यांना परवाना दिलेला असतो.
३. कुठलाही नवीन कायदा पास झाला कि ह्यांना चरायला कुरण सापडतं. ह्यांना खायच्या संधी मिळतात. साधारण आरोपी जरी असला तरी त्याला नं मारण्यासाठीसुद्धा पोलीस पैसे घेतात. बलात्काराचा आरोपी असला तर विचारायलाच नको. त्यातल्यात्यात जेंव्हा डोमेस्टिक व्हायोलन्स ऍक्ट पास झाल्यापासून तर त्यांना दाबून पैसे कमावण्याची संधी प्राप्त झालीये. एका केसमागे कित्येक लाख मिळतात, तेही बिनबोभाट... खरंतर इतकि उदाहरणे मला व्यक्तिशः माहित आहेत पण असल्या गोष्टींचे पुरावे नसतात कधीच म्हणून इथे लिहिता येत नाहीत... जर कोणी गरीब ह्या भानगडीत फसला तर मेलाच म्हणून समजा... हे खातं गरिबांसाठी नाही... आताच ट्रॅफिकरुल्स अजून कडक केलेत आणि दंडाची रक्कमपण वाढलीये...सो.. पोलिसांचा भाव पण वाढलाय.
४. जेल ऍडमिनिस्ट्रेशन आणि तिथे चालणारे गोंधळ ह्यावर तर एक मोठा प्रबंध होऊ शकेल. श्रीमंत आणि सेलिब्रिटी गुन्हेगारांना प्रचंड ऐषाराम कसा मिळतो आणि त्यावर कसं त्यांचं अर्थपूर्ण जीवन अवलंबून असतं हे सर्व ओपन सिक्रेट आहे. अबू सालेम ने जेलमधला महागडा असा टीव्ही फोडला होता. कोण त्याला बोलल्याचं ऐकिवात नाही. त्याने त्याच्या वाढदिवसाची जंगी पार्टी दिली होती, हे चालवून घेतलं जातं? त्यांच्यादृष्टीने देशद्रोही बिशद्रोही असलं काही नसतं... त्यांचा देश आणि धर्म एकंच... पैसा.
५. काही पोलिसांना मारलं कि लगेच सगळ्या देशातून पोलिसांच्या बाजूने आवाज सुरु लागला. अर्थात मी पोलिसांना मारण्याच्या बाजूने अजिब्बात नाही. पण त्याहीपेक्षा पोलिसांनी निरपराध लोकांना बेदम मारहाण केल्याची असंख्य उदाहरणे मी पहिली होती, पाहत आहे. त्यांना असे लायसन्स दिली आहेत.
६. गेल्या महिन्यात बाणेरच्या यशदामध्ये माजी आयपीएस अधिकारी वाय.पी.सिंग दिग्दर्शित आणि लिखित "क्या यही सच है" ह्या चित्रपटाचे स्क्रिनिंग होते. तेंव्हा मी आमच्या कॉलेजच्या मुलांना घेऊन तिथे गेलो होतो. चित्रपट तांत्रिक आणि अभिनयाच्या बाबतीत फार काही उच्च वगैरे नाही. अगदीच साधारण आहे. पण ज्या काही गोष्टी दाखवल्या त्या खूप हॉरिबल होत्या. काही गोष्टींचा अंदाज येणं वेगळं आणि त्याच गोष्टी खऱ्या आहेत ह्याची खात्री होणं वेगळं. कमिशनरच्या नेमणुकीला स्पॉन्सर लागतात आणि त्याचा जो काही रेट असेल तो ते स्पॉन्सर देतात, हे मला नवीन होतं. चित्रपट दाखवून झाल्यावर मी खुद्द वाय.पी. सिंग ह्यांनाच मी प्रश्न विचारला होता कि, जर एव्हढं हे खातं भ्रष्ट आहे तर आम्ही त्याच्यावर विश्वास का आणि कसा ठेवावा? त्यावर त्यांनी थातूरमातूर उत्तर देऊन वेळ टाळली. मला काय ते उत्तर मिळायचं ते मिळालं.
७. बांधकाम क्षेत्रात आज कित्येक अंडरवर्ड डॉन्सचे पैसे गुंतले जात आहेत आणि पुण्यात तरी बहुतेक एजंट्सना ते माहित आहे. पोलिसांना माहित नसेल?
८. अंतर्गत सुरक्षा खरंच ते सांभाळतात? ह्यावर मला खरंच शंका आहे. कारण पोलीस खातं हे नेहमी नेहमी विकलं जाऊ शकणारं खातं आहे.
९. मुळात मला पोलिसांबद्दल अजिब्बात आदर वगैरे नाही. उलट माझी सटकते, नेहमीच.
ही सर्व माझी वैयक्तिक मते आहेत.
(माझी ही मते फक्त पोलिसांसंबंधीच आहेत)
याद्या
20529
प्रतिक्रिया
118
मिसळपाव
प्रतिक्रिया
आदर
मुळात तुमचा विचार
मुळात तुमचा विचार
मला पोलिसांबद्दल अजिब्बात आदर वगैरे नाही. उलट माझी सटकते, नेहमीच. असे आहे त्यात तुम्ही "माझे विचार बदलायला मळमळ काढतोय" वगैरे म्हणताय, हे काँट्राडिक्शन काही खास पचले नाही, त्यामुळे तुम्हाला चार मुद्दे सांगून काही खास हाती येऊन मला काही नवे शिकता येईल असेही वाटत नाही, तस्मात तुमच्या धाग्यावर तुम्हाला आवडेल असेच बोलून मी रजा घेतो, "सगळे पोलीस हरामखोर असतात, १००% पोलीस ऐदी ऐतखाऊ अन जनतेचे दुश्मन असतात, त्यांचे सख्य फक्त पैश्याशी असते" धन्यवाद.धन्यवाद..
In reply to मुळात तुमचा विचार by कैलासवासी सोन्याबापु
Power corrupts and absolute power corrupts absolutely
चूक दोघांचीही होती... पण
In reply to Power corrupts and absolute power corrupts absolutely by बोका-ए-आझम
सर
पोलीस
अशातला एक अंगावर शहारे आणणारा
In reply to पोलीस by कपिलमुनी
समोरचा पोलिस या टाईपचा आहे /
In reply to अशातला एक अंगावर शहारे आणणारा by वटवट
टाका जी...
In reply to समोरचा पोलिस या टाईपचा आहे / by टवाळ कार्टा
हे व्हॅल्यू ऍडिशन कुठे करून
In reply to टाका जी... by विशुमित
एखादा तरी क्लासमेट, जवळचा
In reply to हे व्हॅल्यू ऍडिशन कुठे करून by वटवट
अहो ते सामान्य माणसाबद्दल
In reply to एखादा तरी क्लासमेट, जवळचा by अभ्या..
...
In reply to पोलीस by कपिलमुनी
सर्व प्रयत्न
In reply to ... by chitraa
पोलीस मॅन्युअल नुसार एका
In reply to ... by chitraa
...
In reply to पोलीस मॅन्युअल नुसार एका by वटवट
तुमचं चालू द्या हवं तसं....
In reply to ... by chitraa
100 नंबर वर कॉल केला तर
In reply to पोलीस by कपिलमुनी
100
In reply to 100 नंबर वर कॉल केला तर by विशुमित
माझ्या मते तरी शक्यता खूप कमी
In reply to 100 by कपिलमुनी
ही सर्वाना कळकळीची विनवणी आहे
In reply to माझ्या मते तरी शक्यता खूप कमी by विशुमित
माझा अनुभव जरा वेगळा आहे. 100
In reply to माझ्या मते तरी शक्यता खूप कमी by विशुमित
बर्र... हा घ्या फर्स्ट हँड
In reply to 100 नंबर वर कॉल केला तर by विशुमित
बाब्बो...ट्रकवाल्याला भर
In reply to बर्र... हा घ्या फर्स्ट हँड by मोदक
पोलिसांच्या
In reply to बर्र... हा घ्या फर्स्ट हँड by मोदक
मुर्दाड्+लाचखाऊ आणि रानटी
In reply to पोलिसांच्या by नाखु
मुर्दाड्
In reply to मुर्दाड्+लाचखाऊ आणि रानटी by विशुमित
मुर्दाड
In reply to मुर्दाड् by कपिलमुनी
हो लाच खाऊ बद्दल एकदम लेटेस्ट
In reply to मुर्दाड्+लाचखाऊ आणि रानटी by विशुमित
हे बरंय राव.
In reply to हो लाच खाऊ बद्दल एकदम लेटेस्ट by विशुमित
अहो अभ्या जी...
In reply to हे बरंय राव. by अभ्या..
माहीताय की सोयरे.
In reply to अहो अभ्या जी... by विशुमित
त्यांचं म्हणणंय कि सामान्य
In reply to माहीताय की सोयरे. by अभ्या..
<<<<<<त्यांचं म्हणणंय कि
In reply to त्यांचं म्हणणंय कि सामान्य by वटवट
सामान्य माणसाने किंमत आणि
In reply to <<<<<<त्यांचं म्हणणंय कि by विशुमित
अभ्या
In reply to सामान्य माणसाने किंमत आणि by अभ्या..
म्हणजे ज्याची कुणाशी ओळख नाही
In reply to सामान्य माणसाने किंमत आणि by अभ्या..
सोप्पे आहे.
In reply to म्हणजे ज्याची कुणाशी ओळख नाही by वगिश
नुसत्या ओळखींचा फायदा शुन्य
In reply to सामान्य माणसाने किंमत आणि by अभ्या..
खराडी वाघोली रस्त्यावरील जकात
In reply to हो लाच खाऊ बद्दल एकदम लेटेस्ट by विशुमित
१० प्रत्येकी हो.
In reply to खराडी वाघोली रस्त्यावरील जकात by आदूबाळ
ठीके ना. प्रत्येकी दहापण फारच
In reply to १० प्रत्येकी हो. by अभ्या..
मुद्दा 1-नॉन-करप्ट माणूस मी
दृष्टी सुधारा
In reply to मुद्दा 1-नॉन-करप्ट माणूस मी by विशुमित
सहमत आहे.
In reply to दृष्टी सुधारा by कपिलमुनी
मुद्दा १ - नॉन करप्ट ही
In reply to मुद्दा 1-नॉन-करप्ट माणूस मी by विशुमित
माझ्या ऐकीव माहिती नुसार वकील
In reply to मुद्दा १ - नॉन करप्ट ही by वटवट
वकील आणि पोलीस ह्यामध्ये कधीच
In reply to माझ्या ऐकीव माहिती नुसार वकील by विशुमित
हा प्रसंग घ्या..
In reply to माझ्या ऐकीव माहिती नुसार वकील by विशुमित
हा हा हा हा.... प्रसंग
In reply to हा प्रसंग घ्या.. by मोदक
असे लै प्रसंग आहेत.
In reply to हा हा हा हा.... प्रसंग by वटवट
साहेब ...वरचे लोक चांगले असते
In reply to असे लै प्रसंग आहेत. by मोदक
विशुमितजी... आता ह्यात जात
In reply to साहेब ...वरचे लोक चांगले असते by विशुमित
वटवट भाऊ..
In reply to विशुमितजी... आता ह्यात जात by वटवट
हम्म्म... येतील लवकरच... मग
In reply to वटवट भाऊ.. by चिनार
धनुष्यबाण , कमळ, हत्ती असला
In reply to हा प्रसंग घ्या.. by मोदक
तुमच्या वाक्यातून "धनुष्यबाण,
In reply to धनुष्यबाण , कमळ, हत्ती असला by विशुमित
तुमच्या मुद्दा क्रमांक १ शी वेगळ्या प्रकारे सहमत आहे.
In reply to मुद्दा 1-नॉन-करप्ट माणूस मी by विशुमित
अगदी... पाणी आहे ते घाण होऊ
In reply to तुमच्या मुद्दा क्रमांक १ शी वेगळ्या प्रकारे सहमत आहे. by बोका-ए-आझम
माझा कोणाही पोलिसा विषयी आकस
दोन वर्षांपूर्वी घरातील
..
हजारात एखादा चांगला नेक बंदा
मी त्याच नेक बंद्याच्या शोधात
In reply to हजारात एखादा चांगला नेक बंदा by अभ्या..
आम्हाला माहीतीय.
In reply to मी त्याच नेक बंद्याच्या शोधात by वटवट
पोलीस यंत्रणा नेहमी व्हिलन
कसंय विशुमित जी
हेच्च म्हणतो..कारण काहीही
In reply to कसंय विशुमित जी by वटवट
>> -- सहमत
<<<<जे पोलिसांच्या ह्या
मोबाईल सरळ सरळ चोरीला गेला
कारण त्यांना "किती चोर्या
In reply to मोबाईल सरळ सरळ चोरीला गेला by माझीही शॅम्पेन
जास्त काही सांगत नाही,
आयला...
In reply to जास्त काही सांगत नाही, by संदीप डांगे
आम्ही लिहितो, इतर लिहीत नैत.
In reply to आयला... by अनुप ढेरे
आत्मचरित्राची एक प्रत
In reply to आम्ही लिहितो, इतर लिहीत नैत. by संदीप डांगे
बाकी घाटपांडे सर खुद्द
अहो आम्ही बिनतारी पोलीस
In reply to बाकी घाटपांडे सर खुद्द by संदीप डांगे
तुमच्या ब्लॉग वरचा मिपाचा
In reply to अहो आम्ही बिनतारी पोलीस by प्रकाश घाटपांडे
धन्यवाद! दुरुस्ती केली आहे
In reply to तुमच्या ब्लॉग वरचा मिपाचा by मोदक
एकदा दुपारी घरीच सुटीवर होतो.
पोलिसी विनोद...
चांगले पोलीस ... वारजे पोलीस
जास्त अनुभव नाही पोलिसांचा.
मला तर पोलिसांची दयाच जास्त
पोलीस खाते राज्य सरकारच्या
अगदीच अपवाद सोडला (तोही
100% सहमत
वरळीला पासपोर्ट औफिस आणि
मावळच्या गरीब शेतक-यांमागे
???
In reply to मावळच्या गरीब शेतक-यांमागे by Ram ram
सहमत!
In reply to ??? by मोदक
तुकाराम ओंबळे, करकरे, साळस्कर
In reply to मावळच्या गरीब शेतक-यांमागे by Ram ram
धाग्यावरील
काेणताही पाेलिस मेल्याची
आपापले अनुभव आहेत बापू,
In reply to काेणताही पाेलिस मेल्याची by कैलासवासी सोन्याबापु
बापूसाहेबांशी सहमत
In reply to आपापले अनुभव आहेत बापू, by संदीप डांगे
सहमत आहे,
In reply to बापूसाहेबांशी सहमत by सुबोध खरे
परवाचीच गोष्ट, एक पोलीस नो
बूलशिट!!
शांत
In reply to बूलशिट!! by चांदणे संदीप
शांत व्हा सँडी भाऊ, शांत व्हा
In reply to बूलशिट!! by चांदणे संदीप
वकील लोक तर पोलिसांपेक्षा महा
In reply to शांत व्हा सँडी भाऊ, शांत व्हा by कैलासवासी सोन्याबापु
पोलीस खातेच बंद केले तर काय
In reply to शांत व्हा सँडी भाऊ, शांत व्हा by कैलासवासी सोन्याबापु
आपले जर काही चांगले अनुभव
In reply to बूलशिट!! by चांदणे संदीप
परफेक्ट
मावळच्या शेतक-यांमागे धाऊन
हो का?
भावनाओको समझो बापुसाहेब, दिल
In reply to हो का? by कैलासवासी सोन्याबापु
वो मै समझ गया डांगे बुआ, मावळ
In reply to भावनाओको समझो बापुसाहेब, दिल by संदीप डांगे
ते काय?
In reply to वो मै समझ गया डांगे बुआ, मावळ by कैलासवासी सोन्याबापु
बापू साहेब आझाद मैदान मोर्चा
In reply to वो मै समझ गया डांगे बुआ, मावळ by कैलासवासी सोन्याबापु
काही दिवसापूर्वी लोकसत्तेत
केस मिटवामिटवी करणारे एजंट ....
In reply to काही दिवसापूर्वी लोकसत्तेत by दिगोचि
"नोकरशहा आणि राजकारणी
In reply to काही दिवसापूर्वी लोकसत्तेत by दिगोचि
बाकी ठिकाणी
In reply to "नोकरशहा आणि राजकारणी by मराठी_माणूस
बाडीस
In reply to बाकी ठिकाणी by नाखु