डू आयडी हा नेहमीच माझ्या उत्सुकतेचा विषय राहिला आहे. हि परंपरा कदाचित अहिरावण-महिरावणाच्या काळापासून सुरु झाली असावी. एक धारातीर्थी पडला कि दुसरा जणू त्याच्या रक्तातून उठून पुन्हा युध्दाला तयार! जणू काही आपला जन्मच यासाठी आहे असे डू आयडी ला वाटत असावे. चक्रव्युहात घेरून एखाद्या योद्ध्याला मारणे एकवेळ खूप सोपे हो, पण हा डू आयडी स्वतःच बाकीच्यांना चक्रव्युहात ओढून आपल्याभोवती घेरा घालून आपल्याशी लढण्यास भाग पडतो. अर्थात त्यानंतर तुंबळ युद्ध होऊन अपेक्षेप्रमाणे त्याची अवतार समाप्ती तेथेच होते, पण सर्वांचे लक्ष वेधण्यात तो यशस्वी झाला असतो. कारण हे युध्द रणांगणावरील योद्ध्यांबरोबर इतर प्रेक्षक हि पाहत असतात. विजयीवीरांना आपल्या यशाचा आनंद फारकाळ मात्र घेऊ न देता पुनर्जन्म घेऊन नव्या जोमाने सर्वांसमोर उभा ठाकतो.
आता तुम्ही म्हणाल याला डू आयडीची एवढी उठाठेव का? हा इतका रस घेतो म्हणजे नक्कीच अवतारी पुरुष दिसतोय. होय, मला ही तेच मांडायचंय. म्हणजे ‘तो मी नव्हेच’ इतकंच सांगायचंय. तसे मिपा मला अजिबात अनोळखी नाही, पण मी मात्र मिपासाठी अजून तरी पूर्णपणे ओळखीचा नाही. तसे येथे प्रथम आलेला प्रत्येकजण अनोळखीच होता. तो आला, तो रमला, आणि शेवटी इथेच टिकला ही क्रांती बरेच आयडींच्या बाबतीत घडल्याचा मी अनेक वर्ष साक्षीदार आहे. मूळ आयडी बरोबरच भूछत्रासारखे उगवलेले अनेक डू आयडी आणि त्यांचे मिपावरील ‘दीर्घ’ आयुष्य ही पाहत आलो आहे. तसे आपले मिपाकर आहेतच मुळी हुशार. नवीन आयडी दिसला की आधी त्याची पारख जुने जाणते मिपाकर एखाद्या जवाहीऱ्याला लाजवतील अशा पद्धतीने करतात, याचेच मला नेहमी अप्रूप आहे.
माझा पहिला लेख काही दिवसांपूर्वी मिपावर प्रकाशित झाला. पदार्पणात सर्वांनी अनपेक्षितरीत्या अर्धशतकवीराचा बहुमान मिळवून दिला. सर्वच प्रतिसाद उत्साह दुणावणारे होते. अचानक कुठे तरी माशी शिंकली आणि प्रतिसादांचा रोख डू आयडी कडे वळला. कदाचित माझ्या आयडीमुळेच हा गोंधळ सुरु झाला. त्याबरोबर हाच गोंधळ माझ्या मनातही सुरु झाला. कुठली कसोटी लावली ज्यामुळे सर्वाना मी डू आयडी वाटू लागलो? मात्र, अक्षर कळले संकट टळले, नाना-माई यांच्या वंशाला दिवा मिळाला किंवा तुम्हाला ओळखले, जसे पोलीस ओळखपरेड मधून बरोबर गुन्हेगाराला ओळखून काढत्तात. अशा पद्धतीच्या प्रतिसादांमुळे मात्र माझे कुतूहल चांगलेच जागृत झाले. जरा आपल्याही ज्ञानातही काही तरी भर पडेल आणि आपल्यालाही “जवाहरी विद्यापीठ” मध्ये प्रवेश घेता येईल या विचाराने हा लेखनप्रपंच करावा वाटला. तर मग अनुभवाने जेष्ठ मिपाकरांनो, आपल्या शिष्यासाठी आपले ज्ञानभांडार खुले करा.
-आपलाच नम्र
गुरुविण ज्ञानप्राप्ती करणारा एकलव्य.
टीप – गुरुदक्षिणा म्हणून अंगठा देण्यात दाखविण्यात येईल.
वाचन संख्या
6944
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
फारच सरळ धोपट लेख झाला डुआइडी
तुम्ही डू आय डी नाही हे
In reply to फारच सरळ धोपट लेख झाला डुआइडी by कंजूस
ते कसे करायचे? काही
In reply to तुम्ही डू आय डी नाही हे by सुबोध खरे
पांडु मोड अॉन ~
टेक्स्टबुक पाहिजे असल्यास
ओळखी कश्या वाढवाव्यात?
In reply to टेक्स्टबुक पाहिजे असल्यास by अभ्या..
ह्याचा अर्थ तुम्हाला 21
In reply to ओळखी कश्या वाढवाव्यात? by संत घोडेकर
एकवीस जोडे
In reply to ह्याचा अर्थ तुम्हाला 21 by अभ्या..
"मज्यशि मय्तरी क्रनार क?" असा
In reply to ओळखी कश्या वाढवाव्यात? by संत घोडेकर
हो.
In reply to "मज्यशि मय्तरी क्रनार क?" असा by नितिन थत्ते
मिपावर अंदाज नाय करायचा....
+१
In reply to मिपावर अंदाज नाय करायचा.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थोडं व्यक्तिगत सोडून भांड्न
थोडं व्यक्तिगत सोडून भांड्न करावं,
चांगले वैचारिक प्रतिसाद देण्यासाठी कोण डु आयडी घेणार. खरा आनंद दुसर्याला .... देण्यातच आहे.सांगा बघू
इतक्या लहान मिपावयात इतका प्रगल्भ विचार ?
भेटूयात की, पण कधी?
In reply to इतक्या लहान मिपावयात इतका प्रगल्भ विचार ? by माम्लेदारचा पन्खा
त्यांनी लिहिले आहे की.....
In reply to इतक्या लहान मिपावयात इतका प्रगल्भ विचार ? by माम्लेदारचा पन्खा
छान लिहिताय हो घोडेकर.
ठरावा कि राव एखादा कट्टा
In reply to छान लिहिताय हो घोडेकर. by प्रचेतस
पुढच्या शनिवारी संध्याकाळी
In reply to ठरावा कि राव एखादा कट्टा by संत घोडेकर
वा! चालेल की.
In reply to पुढच्या शनिवारी संध्याकाळी by प्रचेतस
कट्टा करा फोटो पाठवा...
In reply to पुढच्या शनिवारी संध्याकाळी by प्रचेतस
कट्टा करा फोटो पाठवा...
In reply to कट्टा करा फोटो पाठवा... by खटपट्या
अमीत गार्डनला आमचा रोजचा
In reply to कट्टा करा फोटो पाठवा... by मुक्त विहारि
अमीत गार्डन कुठेशी आले?
In reply to अमीत गार्डनला आमचा रोजचा by खटपट्या
आला होतात की. पारसिक नगर...
In reply to अमीत गार्डन कुठेशी आले? by मुक्त विहारि
पारसिक नगर...
In reply to आला होतात की. पारसिक नगर... by खटपट्या
हे नाना माई कोण आहेत ,लैइच
=((
In reply to हे नाना माई कोण आहेत ,लैइच by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
किती तो साळसूद प्रश्न...!
सरावलेल्या हातांनाही स्वत
सरावल्या हातांनाही कंप का
वेळेवर मिळाली नाही कि सुटतो
In reply to सरावल्या हातांनाही कंप का by सूड
वेळेवर मिळाली नाही कि सुटतो
In reply to सरावल्या हातांनाही कंप का by सूड
कंप