Skip to main content

कानाडोळा की काणाडोळा ?

Published on मंगळवार, 12/07/2016
मिपाकरांना नमस्कार. आज एका पत्रकार मित्राने प्रश्न विचारला - कानाडोळा हा योग्य शब्द आहे ही काणाडोळा? नीट विचार केल्यास, मला तरी कानाडोळा हा शब्द योग्य वाटतो. डोळ्याचा उल्लेख आहे मग कानच असणार. शिवाय ऐकून न ऐकल्यासारखे आणि बघून न बघितल्यासारखे करणे, अर्थात दुर्लक्ष करणे, असा संदर्भ लागतो. योग्य शब्द हुडकण्याकरीता, मी दोन्ही शब्द गुगल केले तर, 'कानाडोळा' लिहिलेली आणि 'काणाडोळा' लिहिलेली अनेक पाने दृष्टीस पडली. नक्की कुणी सांगू शकेल का? मराठी मध्ये कोणता शब्द योग्य राहील? माझा तर्क योग्य आहे का? मी बरोबर असेल तर मग 'काणाडोळा' असं लोक का लिहित असतील? मराठी विश्वकोशातदेखील 'काणाडोळा'लिहिलेले संदर्भ मिळतील.

वाचन संख्या 3822
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

काणा डोळा करणे म्हणजे दुर्लक्ष्य करणे पाहून न पहिल्या सारखे करणे काणा म्हणजे तिरळा

लहानपणापासून मी तरी कानाडोळा, हाच शब्द ऐकलेला आहे. 'जाणीवपूर्वक दुर्लक्ष' अशा अर्थी तो वापरला जातो. काणाडोळा, हा तुमच्याकडे बघत नाही असं वाटलं तरी तो तुमच्याकडेच बघत असतो.

In reply to by तिमा

काणाडोळा करणे, हाच योग्य आहे. काणा माणूस बघत असला तरी त्याला दिसत नसते. तसे तुम्ही वागलात तर त्याला काणाडोळा म्हणायचे.

In reply to by आनन्दा

काण्या माणसाला दिसत नाही? काणा म्हणजे चकणा ना? (अनेकांना वेगळी आठवण येईल) बाकी कानाडोला बरुबर हाय, न बानातला

In reply to by धनंजय माने

चकणा माणूस जे बघत असतो (म्हणजे लोकांना वाटते) ते त्याला दिसत नसते, त्याची दृष्टी तिसरीकडेच असते

काणाडोळा हेच योग्य आहे.याचा उगम तमिळ शब्द कण्ण मधे आहे. कण्ण म्हणजेही डोळाच.अधिक संदर्भासाठी विश्वनाथ खैरे यांची अडगुलं मडगुलं,मराठी भाषेचे मूळ ही पुस्तके वाचून पहा.

सर्वांचे आभार. @केअशु - ती पुस्तके मिळवून नक्की पाहीन.

कण्ण्=डोळा हे बरोबर काणा डोळा हेच बरोबर. काना अक्षरांना देतात. डोळा काना नसतो, काणा असतो. उगंच आणीपाणीवाल्यांनी भरवलेल्या बाषासुदीकरनामुळे डोक्यात इथे 'न' हवा अशी नकारात्मक भावना उत्पन्न झाली असावी ;)