गेल्या वर्षभरात शेअरबाजारात डायग्नोस्टिक कंपन्यांचे IPO इश्यु प्राइसच्या ४०-५०% अधिक किंमतीने लिस्ट झाल्या. ह्या कंपन्यांना भविष्यात होणारा नफा गृहीत धरुनच गुंतवणुकदारांनी ही किंमत मोजली असणार. डायग्नोस्टिक कंपन्यांचा बिझनेस कळणे सहज शक्य नसते. परंतू आज मटा मध्ये आलेल्या बातमीनुसार आपल्याला ह्या कंपन्यांचा बिझिनेस कसा चालतो ह्याचा अंदाज घेणे सोपे होणार आहे. अंतिम ग्राहकाच्या खिश्यातून जाणार्या पैशापैकी नेमके किती पैसे कंपनीला मिळनार हे कळू शकेल. इतके दिवस वैद्यकीय चाचण्यांमधून डॉक्टरांना मिळणारे कमिशन हे अधिकृतपणे कोणालाही माहीत नव्हते. परंतू
डायग्नोस्टिक कंपन्यांनी आता त्यात 'पारदर्शकता' आणल्यामुळे हे काम सोपे झाले आहे. कदाचीत आता वैद्यकीय चाचण्यांचे 'प्राईस वॉर' सूरू होण्याची शक्यता आहे.
वाचन संख्या
1405
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
जुनेच तुणतुणे.