Skip to main content

उत्तराखंड, पक्षांतर, बंदी आणि घोळ

Published on रवीवार, 15/05/2016
भारत स्वतंत्र झाला तेव्हा आणि भाषावार पुर्नरचने नंतर सुद्धा बर्‍याच राज्यांचे आकार आणि विधानसभा सदस्यांची संख्या पुरेशी मोठी असे जे काही कमी लोकसंख्येचे प्रदेश होते त्यात दिल्ली गोवा अशा बर्‍याच केंद्र शासित प्रदेशांना राज्यांचा दर्जा प्राप्त झाला नव्हता, तर काही राज्यांचा आकार खूपच मोठा होता. काळाच्या ओघात लोकसंख्या वाढली राजकारणी लोकांच्या आकांक्षा वाढल्या आणि वाढीव आकांक्षांचे पुढारी वाढले. सुरवातीच्या काळात एकाच पक्षाचे काँग्रेसचे बहुतेक राज्यातून राज्य असे पण काँग्रेस मधून फुटलेल्या अथवा स्वतंत्र नव्याने संसार मांडलेल्यांना जनतेने सावकाशीने का होईना विवीध राज्यातून स्विकारावयास आणि राज्य कारभार हातात देण्यास सुरवात केली. १९८५ च्या आधी पर्यंत खासदार असोत वा आमदार असोत आपापला राजकीय पक्ष बदलून दुसर्‍या पक्षात जाऊन बसणे फारच सोपे होते. तत्वांएवजी त्याच्या आडून आपमतलबासाठी पक्षांतरांची संख्या वाढू लागली- धुतलेला तांदूळ अदृश्य झाला. १९८५ मध्ये राजीव गांधींकडे लोकसभेत दणदणीत बहूमत आले तरी एक गोष्ट जे काय आखाडे असतील त्यानुसार त्यांनी केली ती म्हणजे पक्षांतर बंदी कायदा घटनेच्या दहाव्या अनुसुचित समाविष्ट केला. म्हणजे एक तृतींआंश पेक्षा कमी संख्येने पक्षांतर करण्याचा प्रयत्न केल्यास आमदार खासदार पद रद्द होऊन त्या जागांवर काळाच्या ओघात पुन्हा निवडणूका होतील. लोकसभा आणि मोठी राज्ये यांमधील मोठ्या संख्येने निवडून गेलेल्यांवर राजकीय स्थैर्याच्यादृष्टीने या कायद्याचा सकारात्मक प्रभाव पडला नाही असे नाही. पण अपक्ष आणि कमी सदस्य निवडून आले पक्ष आणि छोटी राज्ये की जिथे एकुण विधान सभा सदस्य संख्याच कमी असणार आहे ह्यांच्यावर या कायद्यास पुरेसा प्रभाव टाकण्यात यश आलेच नाही. उलट अपक्ष आणि कमी संख्येने निवडून येणारे पक्ष यांना चांदी करण्याच्या अधिक संधी मिळाल्या. छोट्या आकाराच्या राज्यांची संख्या वाढली एकुण सदस्य संख्याच कमी असेल तर १/३ सदस्य फोडणे घोडाबाजार करणे सोपेच राहीले. तांत्रिक आणि घटनात्मक कारणावरुन पेच निर्माण होणे न्यायालयात जाणे नित्याचे झाले (आहे). पुर्वी सभापती अध्यक्ष ह्या पदावरील व्यक्ती पदावर असताना निष्पक्ष पणे काम करत ते दिसेनासे झाले. संघराज्याने (केंद्राने) नियुक्त केलेले राज्यपाल आणि त्यांचे घटनादत्त कर्तव्या पलिकडे जाऊन स्थानिक सत्ताकारणातील अप्रत्यक्ष हस्तक्षेप पक्षांतरबंदी कायद्याने मोठ्या राज्यात कमी झाला तर छोट्या छोट्या राज्यातून चालू राहीला असावा. छोट्या छोट्या राज्यातून पक्षांतरे आणि सत्ताबदल इतपत नित्याचे झाले आहेत की सहसा त्याची बातमी पण होत नाही. आपल्या मिसळपाव संस्थळावर सुद्धा उत्तराखंड विधानसभेतील पक्षांतराबद्दल एका लेखाचे शीर्षक सनसनाटी लिहिले गेल्यामुळे का होईना सार्‍यांचे तिकडे लक्ष गेले, लोकांचे लक्ष कितपत नव्हते ? बहुतेकांना त्या विधानसभेतील कोणत्या पक्षाची सदस्य संख्या किती आणि किती जणांनी पक्षांतराचा प्रयत्नकरुन निलंबन ओढावून घेतले याची व्यवस्थीत आकडेवारी सुद्धा माहित असेल का अशी शंका बाकी राहते. (मलाही नव्हती) असो. लक्ष गेलेच तर त्या निमीत्ताने आकडेवारीची प्रथम दखल घेऊ उत्तराखंडच्या विधानसभेत ७१ सदस्य असू शकतात (त्यातला एक नॉमीनेटेड अँग्लो इंडीयन असतो पण २०१२च्या निवडणूकी नंतर ही जागा बहुधा भरली नसावी चुभूदेघे) उर्वरीत ७० विधानसभा सदस्यांपैकी २०१२ मध्ये काँग्रेसचे ३३ बसपा ३ अपक्ष आणि एकसिटी पक्ष मिळून ४ तर दुसर्‍या बाजूस भाजपा चे ३० असे विभाजन होते. ७० जणांची विधान सभा असेल तर ३६ सदस्य एवढ्या बहू मताची गरज असावी. काँग्रेसचे नियुक्त हरिश रावत यांचा कारभार बहुधा अपक्ष सदस्यांच्या पाठींबा मिळवून चालू असावा. (चुभूदेघे). म्हणजे अपक्ष आणि बसपाचा पाठींबा असता तर कदाचित भाजपालाही सरकार बनवता आले असते पण तसे झाले नव्हते. अपक्ष आणि बसपा सोबत नसेल तर भाजपाला सत्ता बनवण्यासाठी उरलेला मार्ग म्हणजे काँग्रेसचे ३३ भागीले ३ म्हणजे ११ आमदार फोडणे. अलिकडच्या काळात अरुणाचल प्रदेशात प्रयोग केला गेला, तांत्रिक कारणावरुन राष्ट्रपती राजवट आणली गेली आणि आमदारांच्या आकडेवारीची जुळवाजुळव करुन नंतर भाजपाचे सरकार सत्तेत आणले गेले. साधारणतः असाच काहिसा प्रयोग उत्तराखंडात करण्याचे घाटले असावे. कदाचित ११ पेक्षा अधिक आमदारांनी आधी पक्षांतर तयारी दाखवली असेल आणि नंतर दोघांनी पाय मागे घेतला असेल किंवा जे काही असेल ते पडद्या मागचे कळण्यास मार्ग नाही पण काँग्रेसच्या बंडखोर गटाचे नेतृत्व करणार्‍या माजी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालील नऊ जणांना फोडण्यात यश मिळाले असावे. संख्या ११ची तर मिळाली नसेल विधान सभेच्या बजेट विषयक विधेयकाला या नऊ जणांनी खो घातला. ११ जणांची संख्या पूर्ण झाली नसेल तर ९ जणांना पक्षांतर बंदी कायद्यानुसार निलंबीत करता यावयास हवे. पण विधानसभा सभापतींनी बडतर्फीचा निर्णय घेण्याच्या आत - विधान सभेतील तांत्रिक कारणे नमुद करुन रातोरात राष्ट्रपती राजवट लागू केली गेली म्हणजे त्या कारणांवरुन राष्ट्रपती राजवट लागू करणे योग्य का हा एक घटनात्मक पेच आणि लगोलग राष्ट्रपती राजवट लागू झाल्याच्या नंतर विधानसभा अध्यक्षांनी पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत निलंबनाचा निर्णय योग्य आहे का हे दोन घटनात्मक पेच पुरेसे नसावेत; न्यायालयीन बाजूने उच्च न्यायालयाने पक्षांतर बंदीचा निर्णय तात्कालीक स्वरुपात का होईना स्विकारुन राष्ट्रपती राजवट स्थगीत करुन हरिश रावतांना पुर्नस्थापित करण्याचा निर्णय तोंडी जाहीर केला - (विचीत्र?) गोष्ट अशी की कोर्टाची लिखीत ऑर्डर येई पर्यंत तोडीसुद्धा लागु होते (चुभूदेघे) यावर कडी म्हणजे जी ऑर्डर लिखीत स्वरुपात उपलब्धच नाही त्यावर सुप्रीम कोर्टाने लगोलग स्टे दिला. -आणि ती तोंडी ऑर्डर देणार्‍या उच्च न्यायालयीन न्यायाधिश महोदयांची दुसर्‍या राज्यात बदली करण्याचा योगायोग आला (संदर्भ) - जे काही असेल सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूच्या वकीलांच्या युक्तीवादातून घटनात्मक पेचावरचे निकाल न्यायालयानी काळाच्या ओघात द्यावेत पण तो पर्यंत निर्विवाद स्वरुपाच्या सदस्यांच्या बळावर जे काही सरकार देता येईल ते विधानसभेत मत मोजणी घेऊन होऊ द्यावे यावर किमान स्वरुपाची सहमती झाली. विधान सभेतील सदस्यांची मोजणी अध्यक्षांनी जाहीर करावयाची असते त्या अध्यक्षांबद्दल काय वाद आहे माहित नाही पण अगदी प्रोटेम स्पीकर सुद्धा न देता सुप्रीम कोर्टाने चक्क सचीवांकरवी मतमोजणी करवली. विधान सभा सदस्यांची पळवा पळवी अथवा दबाव येऊ नयेत म्हणून राज्याच्या मुख्य सचिव आणि पोलीस अधिक्षकांना विशेष सुचना दिल्या आणि विधान सभेतील सदस्य मोजणि होतानाचे व्हिडीओरेकॉर्डींग मागवले. मोजणी घेऊन ६१ उपस्थित सदस्यांपैकी काँग्रेसच्या बाजूने ३३ जणांनी मतदान केल्याची नोंद ऑनलाईन दस्त एवजात दिसते. (९ जणांना निलंबन निर्णय प्रलंबीत असल्याने मतदान करता आले नाही) एकुण तुर्तास तरी हरीश रावतांच्या हातात सत्तासूत्रे पुन्हा एकदा हाती आली. अर्थात मतमोजणी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखी खाली होऊनही सर्व बारकावे कव्हर होतात का तर कदाचित नसावे, कोर्टाने निकालात केवळ ६१ उपस्थित सदस्यांपैकी काँग्रेसच्या बाजूने ३३ जणांनी मतदान केल्याची नोंद घेतली गेली बाकीचे बायफर्केशनचे डिटेल कोर्टाच्या निकालात दिसत नाहीत त्यामुळे मतमोजणी नंतर वृत्तमाध्यमांनी शक्यतांकडे लक्ष वेधले पण कोर्टाने निकाल अधिकृतपणे सांगितल्यावर आकडेवारीतील बारकावे सांगितले नाहीत कदाचित त्यांना पुर्न उक्ती करावयाची नसेल अथवा कोर्टाशी पंगा नको असेल. पण आदल्या दिवशी बारकाव्यांच्या शक्यता व्यक्त झाल्या त्यात काँग्रेसी आणि भाजपा प्रत्येकी एक सदस्याने बहुधा क्रॉस वोटींग केले - तसे असेल तर विधानसभा अध्यक्षाने त्या दोघांवरही पक्षांतरबंदीचा बडगा उचलावयास हवा - म्हणजे २८ जणांनीच भाजपाच्या बाजूने मतदान केले काँग्रेसचे स्वतःचे ३३ होते ९ गेले म्हणजे २४ उरले त्यातील एकीने क्रॉस वोटींग केले म्हणतात म्हणजे २३ उरले मग बाकी दहा कसे जोडले ? बसपा आणि अपक्ष ७ होतात १ अँग्लो इंडीयन मग दोन उरतात मग भाजपातून क्रॉस वोटींग २ चे झाले असले पाहीजे ? मग तीन जणांनी क्रॉस वोटींग केले त्यांना भावी निलंबना साठी वगळले तर ५८ उरतील त्या पैकी काँग्रेसचे २३ + बसपा अथवा अपक्ष मिळून रावतांचे सरकार नक्की टिकेल. विधानसभेच्या निवडणूका वर्षभराच्या अंतरावर आहेत नविन सरकार येईल प्रक्रीया पार पडतील घटनात्मक पेचांवर न्यायालये तात्पुरता तोडगा निघेल हे बघतील पण सातत्याने घटनात्मक पेच निर्माण होतील अशा पद्धतिचे लोकशाही संस्थांचे अवमुल्यन -अवमुल्यनात सहभागी राजकीय पक्ष आणि व्यक्ती कुणी का असेनात - भूषणावह ठरते का हा प्रश्न शिल्लक राहतो. पक्षवार आकडेवारी अद्यापही एक्झॅक्ट मॅच होत नसावी माहितीत कुठेतरी उणीव शिल्लक असावी चुभूदेघे संदर्भ आणि अधिक वाचन *https://en.wikipedia.org/wiki/Uttarakhand_Legislative_Assembly_election,_2012 *https://en.wikipedia.org/wiki/Uttarakhand_Legislative_Assembly गूगल शोध १ गूगल शोध २ *http://supremecourtofindia.nic.in/FileServer/2016-04-22_1461326716.pdf *http://supremecourtofindia.nic.in/outtoday/sc1156716p-2016_05_06.pdf *http://supremecourtofindia.nic.in/FileServer/2016-05-09_1462791940.pdf *http://supremecourtofindia.nic.in/FileServer/2016-05-11_1462966286.pdf

वाचन संख्या 5044
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

नावाला शोभेल अशी फारच सुरेख मांडणी करता तुम्ही, अगदी दुव्यांसहित. पण अशी शिस्तबद्ध मांडणी कुणाला झेपत नाही, कायतरी खळबळजनक पाहिजे राव! म्हणजे शेलकी भाषा वगैरे वापरून आग ओकणारे लेखन=))

हे रावत सरकार औट घटकेचे सरकार असू शकते,खान्ग्रेस च्या 9 सदस्यांच्या सदस्य पदाबाबत जून/जुलाई मध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे। ......

पक्षांतर बंदी कायद्यात २००३ मध्ये केलेल्या सुधारणेनुसार कोणत्याही पक्षाचे किमान दोन तृतीयांश फुटले तरच त्यांना निलंबित करता येत नाही. एक तृतीयांश फुटले किंवा निम्मे जरी फुटले तरी या कायद्यानुसार त्यांना निलंबित करता येते व त्यांना आमदारकी गमवावी लागते. जर पक्षादेश (व्हिप) जारी केला असेल व जर दोन तृतीयांश पेक्षा कमी सदस्यांनी व्हिपचे उल्लंघन केले असेल तरच अशी कारवाई करता येते. व्हिप जारी केला नसेल तर अशी कारवाई करता येत नाही. उत्तराखंडमध्ये अंदाजपत्रकावरील चर्चेनंतर मतदान होत असताना व्हिप जारी केलेला नव्हता. ९ खांग्रेसी सदस्यांनी विरोधी आवाज काढल्यावर मतदान न घेता आवाजी मतदानाने अर्थसंकल्प मंजूर झाल्याचे जाहीर करून ९ आमदारांना निलंबित केले गेले. न्यायालयात त्यांचे निलंबन टिकणार नाही. परंतु आमदार निलंबनाचे खटले खूप वेळखाऊ असतात व न्यायालये अशा खटल्यांना प्राथमिकता देत नाही. त्यामुळे हा निकाल अनेक वर्षानंतर लागेल व त्यावेळी त्या निकालाला काहीही महत्त्व असणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

किमान दोन तृतीयांश फुटले तरच त्यांना निलंबित करता येत नाही
आणि ३३ पैकी ९ (दोन तृतीयांशहून कमी) फुटलेले असतानादेखिल
न्यायालयात त्यांचे निलंबन टिकणार नाही
हे समजलं नाही..

In reply to by बाळ सप्रे

पक्षादेशाविरूद्ध (व्हिपविरूद्ध) मतदान केले किंवा पक्षादेश डावलला तरच पक्षांतरबंदी कायदा लागू होतो. अर्थसंकल्पावरील मतदानाच्यावेळी व्हिप काढलेला नव्हता. त्यामुळे हा कायदा लागू करून सदस्यत्व स्थगित किंवा रद्द करता येणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

हम्म हे १/३ चे २/३ झाल्या कडे माझे लक्ष नव्हते. बहुधा २/३ बद्दल तुमचे म्हणणे बहुधा बरोबर दिसते. संदर्भ १० वा स्केड्यूल पण त्यातील कलम २ ए चा कोर्टांकडून बहुधा अधिक व्यापक अर्थ काढून व्हीप नसताना बिहेवीअरल अंडरस्टँडींग वरुन पक्षांतराचा अर्थ लावण्याची मोकळीक झाली आहे संदर्भ त्यामुळे विधान सभा अध्यक्ष कदाचित तसा अर्थ लावू शकत असावेत अन्यथा उत्तराखंडच्या उच्च न्यायालयाने हरीश रावतांच्या बाजूने एवढाही सहज हस्तक्षेप केला नसता. एनी वे जर हे २/३ नव्हते तर हे नऊ जण कशाच्या बळावर उड्या मारत होते ? त्यांची इच्छा त्यांना विधानसभा अध्यक्षांनी नव्हेत तर पक्षाने निलंबीत करावे अशी काही असू शकेल का ?

In reply to by श्रीगुरुजी

हम्म हे १/३ चे २/३ झाल्या कडे माझे लक्ष नव्हते. बहुधा २/३ बद्दल तुमचे म्हणणे बहुधा बरोबर दिसते. संदर्भ १० वा स्केड्यूल पण त्यातील कलम २ ए चा कोर्टांकडून बहुधा अधिक व्यापक अर्थ काढून व्हीप नसताना बिहेवीअरल अंडरस्टँडींग वरुन पक्षांतराचा अर्थ लावण्याची मोकळीक झाली आहे संदर्भ त्यामुळे विधान सभा अध्यक्ष कदाचित तसा अर्थ लावू शकत असावेत अन्यथा उत्तराखंडच्या उच्च न्यायालयाने हरीश रावतांच्या बाजूने एवढाही सहज हस्तक्षेप केला नसता. एनी वे जर हे २/३ नव्हते तर हे नऊ जण कशाच्या बळावर उड्या मारत होते ? त्यांची इच्छा त्यांना विधानसभा अध्यक्षांनी नव्हेत तर पक्षाने निलंबीत करावे अशी काही असू शकेल का ?

In reply to by श्रीगुरुजी

हा आणि हा उत्तरांचल उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधीचा आहे पण एकुण विवादावर आणि घटनाक्रमावर जरा अधिक प्रकाश पडण्यास उपयूक्त वाटतो.

माहितगार सर , आकडेवारीचा ताळेबंद नि विश्लेषणा बद्दल धन्यवाद. उत्तराखंडचा पेच समजून घेणे ( तटस्थ पणे ) हे तुमच्या धाग्यामुळे बरेचसे सोपे झाले आहे, निदान माझ्यासाठी तरी. सदर विषयावर भाऊ तोर्सेकारांचा ब्लॉग ही वाचला, उरलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या धाग्यातून व गुगल बुवांच्या लिंक मधून शोधणे सोपे गेले

९ विधायकांचे अध्यक्षाने निलंबन केले. या निर्णयावर उत्तराखंड न्यायालयाने शिक्का मोर्तब केले. यावर या विधेयकांनी सर्वोच न्यायालयात उत्तराखंड मध्ये मतदान होण्या पूर्वी म्हणजे १० मे पूर्वी अर्ज केला. त्याना वेळेवर न्याय दिला गेला नाही . आता १२ जुलैला सर्वोच न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला तरी काही फरक पडेल असे वाटत नाहि. न्यायालयाने त्यांच्या अर्ज निकालात काढे पर्यंत मतदान पुढे ढकलायला हवे होते. C. Northcote Parkinson Quote- Delay is the deadliest form of denial.

In reply to by रमेश आठवले

९ जण निलंबीत केले आणि मतदान घेतले तर हरीश रावत सरकार बहुमतात राहते हे मतदान घेऊन सिद्ध झाले आहे. आता समजा या ९ जणांना निलंबीत नाही केले आणि विश्वासदर्शक ठरावासाथी पक्षादेश व्हीप काढला तरीही त्यांनी पक्षादेशाप्रमाणे मतदान करणे अभिप्रेत आहे. तसे त्यांनी नाही केले की ते पुन्हा निलंबीत होतात म्हणजे कोणत्याही पद्धतीने कॉंग्रेस मधले २२ लोक (२/३) फोडल्या शिवाय हरीश रावतांचे सरकार बुडत नाही. प्रश्न राहतो एक वित्त विधेयक एका बैठकीत संमत न झाल्याचा ते विधेयक दुसरी बैठक घेऊन व्हीप काढून पारीत करुन घेता येतच होते, आता विधेयक पारीत न झालेल्या क्षणी पारीत झाले असे घोषित करणे ह्यावर ज्युडीशीअल रिव्ह्यू होऊ शकेल आणि न्यायालयातून पारीत न झालेली पण तसे उद्घोषित विधेयके निरस्त केली जाऊ शकतात किंबहूना त्या प्रोसेस मधून गेले न्यायालयालाही दाद दिली नाही तर राष्ट्रापती राजवटीचा विचार केला जावयास हवा एकुण भाजपा समर्थकांची गणिती गल्लत आणि केंद्रसरकारची हातघाई झाली नाही ना अशी साशंकता वाटते.

In reply to by माहितगार

आता विधेयक पारीत न झालेल्या क्षणी पारीत झाले असे घोषित करणे ह्यावर ज्युडीशीअल रिव्ह्यू होऊ शकेल माझ्या माहितीप्रमाणे विधानसभा अध्यक्षांचे निर्णय "सहजासहजी" न्यायालयात फिरवता येत नाहीत. फारच घटनाबाह्य असतील तर गोष्ट वेगळी त्यामुळे "नैतिकदृष्ट्या" रावत सरकार अल्पमतात असले तरीही न्यायालयात अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देता येत नाही. याच मुद्द्यामुळे उत्तराखंड उच्च न्यायालयाने तेवढा प्रश्न सोडून इतर सर्व मुद्द्यांवर भर दिला आहे. यावर उत्तराखंड भाजप आणी केंद्र सरकार यांनी भावनेच्या भरात येऊन कार्यवाही केली असेच वाटते. एकुण भाजपा समर्थकांची गणिती गल्लत आणि केंद्रसरकारची हातघाई झाली हि आपली शंका सार्थ आहे.

एखादा विधेयक ( खासकरून अर्थ विधेयक) जर विधानसभेत / लोकसभेत पास झाले नाही तर सरकारने राजीनामा द्यावा असा नियम आहे का ? या संदर्भात घटनेत काय लिहिले आहे ? ( सर्वमान्य संकेत असू शकतो , पण सध्याचे गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांना कोणताही विधीनिषेध नाही )

In reply to by कपिलमुनी

एखादा विधेयक ( खासकरून अर्थ विधेयक) जर विधानसभेत / लोकसभेत पास झाले नाही तर सरकारने राजीनामा द्यावा असा नियम आहे का ?
घटनेतील तरतुदी अभ्यासण्यास वेळ लागेल. पण माझ्या आत्ता पर्यंतच्या माहितीत असा कोणताही कायदा अथवा नियम वाचण्यात आलेला नाही. केवळ विश्वास अथवा अविश्वासदर्शक ठरावाच्या वेळी हजर सदस्य संख्येत बहुमत दाखवता आले नाही तरच सरकार कोसळते अन्यथा नाही. माझ्या व्यक्तिगत मते केवळ अ‍ॅडमिनीस्ट्रेशनसाठी विशीष्ट सरकार सत्तेत ठेवावे पण प्रत्येक विधेयक विधीमंडळांनी सरकारला न विचारता स्वतंत्र स्व मर्जीने पारीत करावे असे भारतात अद्याप घडले नसले तरी भारतीय घटनेनुसार शक्य असावे. चुभूदेघे. इतर वेळी जेसे राज्यपालांसमोर बहुमत दाखवता येणे अथवा एखादा कायदा विधानसभेत लोकसभेत मंजूर करुन घेण्यास अपयश येणे हा केवळ नैतीक पराभव मानला जातो/ जात असे. अशा केस मध्ये नैतीक जबाबदारी घेऊन सरकारने राजीनामा दिला तर ठिक नाही तर सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतात अथवा राज्यपाल अमुक इतक्या दिवसात विश्वास दर्शक ठराव घेण्याचा आदेश देऊ शकतात. एखादे अर्थ विधेयक अथवा इतर विधेयक मंजूर न करण्याचाही अधिकार विधान मंडळांना असतो आणि तेच (मंजूर अथवा ना मंजूर करण्याचे) त्यांचे काम असते. काही वेळा सरकारी बाजूचे सदस्य उपस्थितच राहीले नाही तरीही विधेयक पडू शकते किंवा सरकार एखाद्या खाजगी विधेयकाला विरोध करु देणार नाही व्हीप न काढता सदस्यांना मोकळेपणाने मतदान करु देईल असेही होऊ शकते. अर्थ विधेयक मंजूर नाही झालेतर सरळ सरकार पडते असे होत नाही परंतु सरकारी खर्च म्हणजे अप्रत्यक्ष रित्या सरकारी कामकाजाचा खूप महत्वपूर्ण्भाग थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व अर्थ विधेयके वेळेवर पास झाली तरी सरकारी पेमेंट्स वेळेवर होतच नाहीत एखादे अर्थ विधेयक वेळेवर पास नाही झाले तर खोळंबा नक्कीच होतो पण किमान राज्य सरकारांच्या बाबतीत फारमोठे गंडांतर नव्हे. आकस्मिक नैसर्गीक आपत्ती हाताळणे कठीण होणार असेल तर गोष्ट वेगळी. केंद्र सरकारच्या बाबतीत संरक्षण परराष्ट्र अशी महत्वाची खाती असतात तिथे खोळंबा होणे जिकीरीचे ठरु शकत असावे. समजा महिना दोन महिने अर्थ विधेयक मंजूर नाही झाले तर राज्यपालांनी हस्तक्षेप करुन राष्ट्रपती राजवट आणणे वेगळे. असो.

In reply to by माहितगार

माझ्या व्यक्तिगत मते केवळ अ‍ॅडमिनीस्ट्रेशनसाठी विशीष्ट सरकार सत्तेत ठेवावे पण प्रत्येक विधेयक विधीमंडळांनी सरकारला न विचारता स्वतंत्र स्व मर्जीने पारीत करावे असे भारतात अद्याप घडले नसले तरी भारतीय घटनेनुसार शक्य असावे.
उदाहरण म्हणून महाराष्ट्रात भाजपाने शिवसेने सोबत सरकार बनवले आहे. समजा शिवसेना सत्तेत असूनही अर्थ विधेयकाला मंजूरी देणार नाही विधेयक ना मंजूर होईल, भाजपा आणि राष्ट्रवादीची अर्थ विधेयका पुरती तडजोड होईल आणि दुसर्‍या बैठकीत विधेयक राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर मंजूर होईल मात्र सरकार भाजपा शिवसेनेचे राहील एवढी फ्लेक्झीबिलीटी जिथपर्यंत मला वाटते भारतीय घटनेत आहे. अद्याप तसा प्रयोग झाला नसला तरीही

In reply to by माहितगार

पण माझ्या आत्ता पर्यंतच्या माहितीत असा कोणताही कायदा अथवा नियम वाचण्यात आलेला नाही. केवळ विश्वास अथवा अविश्वासदर्शक ठरावाच्या वेळी हजर सदस्य संख्येत बहुमत दाखवता आले नाही तरच सरकार कोसळते अन्यथा नाही.
राज्यघटनेत कलम ७५(३) प्रमाणे केंद्रीय मंत्रीमंडळ लोकसभेला सामुहिकरित्या जबाबदार असते असे लिहिले आहे तर राज्यातील मंत्रीमंडळांसाठी १६४(२) प्रमाणे राज्यातील मंत्रीमंडळ राज्यातील विधानसभेला सामुहिकरित्या जबाबदार असते असे लिहिले आहे. त्यामुळे नक्की कोणत्या परिस्थितीत सरकार पडते हे स्पष्ट करणारा कायदा/नियम नाही हे बरोबर आहे. राज्यघटनेत लोकसभेला/विधानसभेला मंत्रीमंडळ "जबाबदार" असते म्हणजे काय हे स्पष्ट केलेले नाही.आणि तसे करायची गरजही नाही.राज्यघटनेत केवळ तत्वे सांगून त्या तत्वांची अंमलबजावणी सभागृहांचे नियम/परंपरा यावर सोडणे योग्यच आहे.आपण ब्रिटिशांचे वेस्टमिन्स्टर मॉडेल अंगीकारले असल्यामुळे परंपराप्रिय ब्रिटिशांनी ज्या प्रथा/परंपरा आणल्या त्याप्रमाणेच आपल्याकडेही कामकाज चालते. त्याप्रमाणे पुढील परिस्थितीत सरकार पडते: १. विश्वासदर्शक ठराव फेटाळला जाणे/ अविश्वास ठराव मंजूर होणे. २. राष्ट्रपती/राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव लोकसभेत/विधानसभेत फेटाळला जाणे. ३. अर्थविधेयकाचा लोकसभेत/विधानसभेत पराभव होणे. वर म्हटल्याप्रमाणे यापैकी कशाचाच राज्यघटनेत उल्लेख नाही तर या तीन परिस्थिती परंपरांवरून आल्या आहेत. यापैकी धन्यवाद प्रस्तावावर विरोधकांनी दुरूस्ती आणली आणि ती दुरूस्ती लोकसभा/विधानसभेने मंजूर केली तरी सरकार पडते. तसेच अर्थविधेयकामध्ये विरोधक 'कपात सूचना' (कट मोशन) आणतात. म्हणजे अमुक एका गोष्टीसाठी समजा 'क्ष' इतके रूपये खर्च करणे अर्थविधेयकात प्रस्तावित असेल तर त्या गोष्टीवर त्यापेक्षा कमी रक्कम खर्च करावी अशी कपातसूचना विरोधकांनी आणली आणि ही कपातसूचना लोकसभा/विधानसभेने मंजूर केली तरी सरकार पडते. यापैकी विश्वासदर्शक ठराव फेटाळला जाऊन केंद्रातील सरकारे आतापर्यंत दोनदा पडली आहेत (१९९० मध्ये वि.प्र.सिंग आणि १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी). तसेच विश्वासदर्शक ठराव फेटाळला जाणार हे लक्षात घेऊन १९७९ मध्ये चरणसिंग आणि १९९६ मध्ये अटलबिहारी वाजपेयींनी त्या ठरावावर मतदान होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता. केंद्रात तरी अविश्वास ठराव मंजूर होऊन सरकार पडले अशी परिस्थिती अजून तरी एकदाही आलेली नाही. अर्थातच १९७९ मध्ये यशवंतराव चव्हाणांनी आणलेला अविश्वास ठराव मतदानाला येण्यापूर्वी पंतप्रधान मोरारजी देसाईंनी राजीनामा दिला होता. राज्यांमधील स्थिती तपासून बघायला हवी. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव फेटाळला गेला म्हणून सरकार पडले असे अजूनतरी झालेले नाही. पण ६ मार्च १९९१ रोजी राष्ट्रपती वेंकटरामन यांना धन्यवाद देणारा प्रस्ताव लोकसभेत आला त्यावेळी चंद्रशेखर यांच्या सत्तारूढ समाजवादी जनता दलाचे ५०-५५ सदस्यच लोकसभेत हजर होते तर विरोधक मात्र सगळे हजर होते.तर चंद्रशेखर यांच्या सरकारला पाठिंबा देणार्‍या काँग्रेस सदस्यांनी लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार घातला होता (कारण २८ फेब्रुवारी १९९१ रोजी राजीव गांधींच्या घरावर पाळत ठेवताना हरियाणा पोलिसांच्या दोन पोलिसांना अटक झाली होती) आणि ते सभागृहात हजर नव्हते. धन्यवाद प्रस्ताव फेटाळला जाणार हे लक्षात घेऊन चंद्रशेखर यांनी त्या चर्चेला उत्तर देताना राजीनाम देत असल्याची घोषणा केली.राज्यांमधील परिस्थिती तपासून बघायला हवी. केंद्रात अजून तरी अर्थविधेयक फेटाळले गेले/कपातसूचना मंजूर झाल्या म्हणून सरकार पडले असे झाले नाही. पण राज्यांमध्ये मार्च २००३ मध्ये झारखंडमध्ये बाबूलाल मरांडींचे भाजप सरकार कपातसूचना मंजूर झाल्यामुळे पडले. तर मार्च १९७६ मध्ये गुजरातमध्ये बाबूलाल पटेल यांचे सरकार सहकारी पक्षांशी मतभेदामुळे अर्थसंकल्प पास करून घेऊ शकले नाही आणि त्या कारणामुळे पडले.

उत्तराखंड मधील कॉंग्रेसचे नऊ बरखास्त विधायक आता भाजपा मध्ये सामील झाले आहेत. त्यांनी सर्वोच न्यालयात त्यांच्या बरखास्तीच्या विरुद्ध दाद मागितली होती .त्यांचा अर्ज कोर्टाने दाखल करून घेतला पण त्या वरील निर्णय १२ जुलैला देऊ- म्हणजे उत्तराखंड मध्ये मतदान झाल्यावर देऊ - असे सांगितले. या सर्वोच न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करत त्यांनी त्यांचा अर्ज आता मागे घ्यायला हवा . कारणे Justice delayed is justice denied. आणि Justice should not only be done; it should also appear to have been done.

माहितीपूर्ण धागा आणि चर्चा. पक्षांतरबंदी विधेयकाची ऐशी की तैशी गोव्यातल्या चाळीस चोरांनी आतापर्यंत केली आहे तशी कुठेच झाली नसेल.

In reply to by पैसा

पक्षांतरबंदी विधेयकाची ऐशी की तैशी गोव्यातल्या चाळीस चोरांनी आतापर्यंत केली आहे तशी कुठेच झाली नसेल.
काय आठवण आहे!! १९९०-९१ या काळात त्या अलीबाबाच्या ४० चोरांनी गोव्यात खरोखरच धुमाकूळ घातला होता. त्याविषयी नंतर कधीतरी लिहिनच.