Skip to main content

The Man Who Knew Infinity अर्थात थोर गणिती रामानुजन

Published on गुरुवार, 28/04/2016
गणित आणि माझे नाते म्हणजे विळा आणि भोपळा. यातल्या भोपळ्याशी माझी कशी सलगी होती हे प्रगती cum अधोगती पुस्तकात दिसत असे. कदाचित पाया भरतानाच कच्चा राहिल्याने माझी गणिताची इमारत कधी उभी राहिलीच नाही पण गणित आणि विज्ञान हे दोनच विषय शालेय अभ्यासक्रमात खुप महत्वाचे आहेत हे पुढे जिवनात कळालेच, असो. एप्रिल महिन्यात सैराट, बागी बरोबरच एका महान गणितज्ञाच्या जिवनावर आधारित एक चित्रपट येतोय तो म्हणजे " the man who knew infinity" रामानुजन यांच्या जिवनावर आधारित हा चित्रपट हॉलिवुड वाले बनवत आहेत याचा मला विशेष आनंद आहे कारण हाच चित्रपट हिंदीत बनला असता तर खास लोकाग्रहास्तव म्हणुन रामानुजन झाडाभोवती नाचताना पहावले नसते. रामानुजन यांचा जन्म 1887मधे मद्रास प्रांतात झाला. दैव आहे कि नाही माहीती नाही पण कुठलेही शिक्षण अथवा पार्श्वभूमी नसताना या मुलाला गणितात जन्मजात दैवी प्रतिभा लाभलेली होती. या मुलाला गणित शिकवण्याची आमची योग्यता नाही असं त्यांच्या शिक्षकांनी शाळेला कळवलं होतं. रामानुजन यांचे गणितावर एवढे प्रेम होते कि ते दिवसरात्र फक्त गणिताचाच विचार करत आणि याचा परिणाम म्हणजे गणित सोडुन इतर सर्व विषयात ते नापास झाले होते. पुढे घरची गरिबी आणि अपुर्ण शिक्षण यामुळे त्यांच्या जिवनाची दैना झाली परंतु पुन्हा एकदा दैव कामाला आले आणि एका शिष्यवृत्तीवर आणि खुप खटापटींमुळे त्यांना इंग्लंडला जायची संधी मिळाली. अंगातील मुलभुत गुणांमुळे एका काळ्या आणि गुलाम मुलाला रॉयल सोसायटीचे सभासदत्व मिळणे हि फारच मोठी गोष्ट होती. गणितातील खुप गमती आणि शोध रामानुजन यांच्या नावावर जमा आहेत. चित्रपटात त्यांच्या आयुष्याची कथा पहायला मिळेलच त्यामुळे जास्त काही लिहित नाही.या विषयात आवड आणि गती असलेल्या सर्वांना ते इंटरनेटवर वेगवेगळ्या साईटवर तसेच यु ट्युब वर उपलब्ध आहेत. यु ट्युबवर कधीकधी सनी लिओने शाझिया साहरी शिवाय अशा हुशार भारतीय लोकांचे विडिओ बघायला काहीच हरकत नाही. २९ एप्रिल ला हा चित्रपट प्रदर्शित होतोय , मसाला सिनेमा नसल्याने साहजिकच कमी स्क्रिन वर हा चित्रपट लागेल तरीही आपल्या मुलाबाळांसहीत आवर्जून बघा आणि प्रेक्षकांना असे चित्रपटही आवडतात हे दाखवुन द्या जेणेकरून दुसऱ्या एखाद्या निर्मात्याला अशा विषयात हात घालायचे धाडस होईल. (सौजन्य- मेघपुष्प)

वाचन संख्या 1844
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

मस्तच! या विषयावर धागा येण्याची वाटच पहात होतो. अगदी अभिमानास्पद गोष्ट आहे ही! लेखात दोन तीन पंचेस भारी मारलेत!

In reply to by पिलीयन रायडर

भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी करण्यार्या व्यक्तीमत्वाविषयी आपणा सर्वांना त्रोटक माहिती असते. ही वस्तुस्थिती कोणिही नाकरु शकत नाही. वरती ट्रेलरची लिंक दिली आहे. तो पाहिल्यावर चित्रपट किती भव्य असणार आहे याची कल्पना येते. अजून एक गोष्ट. रामानुजन यांच्या पत्नीची भूमीका एका मराठी अभिनेत्रीने साकारली आहे.

In reply to by राजे साहेब

वरडा! असो,
रामानुजन यांच्या जिवनावर आधारित हा चित्रपट हॉलिवुड वाले बनवत आहेत याचा मला विशेष आनंद आहे कारण हाच चित्रपट हिंदीत बनला असता तर खास लोकाग्रहास्तव म्हणुन रामानुजन झाडाभोवती नाचताना पहावले नसते.
यातच मलाही आनंद आहे! :) Sandy

(सौजन्य- मेघपुष्प)
(सौजन्य- मेघपुष्प) म्हणजे नक्की काय ? हा लेख तुम्हीच लिहिला आहे की दुसर्‍या कोणी ? मिपावर स्वतःलिहिलेले लेखन प्रकाशित केले जावे असे काहीसे धोरण होते ना ? ५) मिसळपाव.कॉम हे मराठी भाषेतून मराठी लोकांसाठीचे संकेतस्थळ आहे. त्यामुळे येथे केवळ मराठीतूनच चर्चा व अन्य लेखन अपेक्षीत आहे. आणि हो येथे केवळ तुमचेच लेखन किंवा कविता प्रकाशित करता येतात. अन्य कुणाचेही चोरलेले लेखन येथे प्रकाशित करता येत नाही.