मराठी विकिपीडियावर काठी पूजा नावाने, हिंदी विकिपीडियावर छडी पूजा नावाने तर इंग्रजी विकिपीडियावर Ceremonial pole नावाने लेख मी लिहिला आहे.
काठी पूजा (जसे महाराष्ट्रात गुढी पूजा करतात) हा मानवी संस्कृतीतील जगातल्या सर्व खंडांवर केव्हा न केव्हा होऊन गेलेला तर काही ठिकाणी अद्यापही असलेला बर्यापैकी प्राचीन सांस्कृतीक प्रकार आहे. इंग्रजी भाषिक देश सोडता उर्वरीत बर्याच देशामध्ये स्पॅनिश अथवा फ्रेंच भाषेचा वापर होतो आणि वेगवेगळ्या आफ्रीकन आणि दक्षिण आमेरीकन आदीवासी जमातीतील Ceremonial pole आणि/अथवा काठी पूजा विषयक माहिती मिळत रहावी म्हणून इंग्रजी विकिपीडियावरील Ceremonial pole लेखाचा अथवा किमान पहिल्या परिच्छेदाचा स्पॅनिश आणि फ्रेंच भाषेत अनुवाद करुन हवा आहे.
हि विनंती विकिपीडियावरच्या अनुवादकांना न टाकता मिपावर का टाकतो आहे ? तर याचे अप्रत्यक्ष कारण कदाचित ख्रिश्चनॅटीक पार्श्वभूमीच्या लोकांकडून होणारे सांस्कृतीक दमनाच्या प्रयत्नात आहे(चुभूदेघे), कारण ज्यू /ख्रिश्चन/ इस्लामिक इतिहासात Ceremonial pole आणि/अथवा काठी पूजेच्या दमनाचा ऐतिहासीक आणि सातत्याने चालत आलेला इतिहास आहे त्यामुळे तिकडून साहाय्य मिळणे दूर, मी अनुवादाच्या विनंती करतोय उलटपक्षी इंग्रजी विकिपीडियावरील लेख कसा वगळला जाईल याचेच प्रयत्न अधिक होताना दिसताहेत हे खेदाने नमुद करावे लागते आहे. इंग्रजी विकिवरील लेख मोठ्या कष्टानेच जेवढा आणि जसा आहे तसा टिकवला आहे. त्यामुळे Ceremonial pole या इंग्रजी विकिपीडियावरील लेखाचा किंवा किमानपक्षी पहिल्या परिच्छेदाचा फ्रेंच आणि स्पॅनिश मधील अनुवाद हो न हो आपल्यातीलच कुणी जमवून दिल्यास हवा आहे.
टिप गूगल अथवा इतर मशिनी भाषांतर चालवून घेतले जाण्याची किमान या केस मध्ये शक्यता कमी आहे कारण उणीवा दाखवून लेखन वगळणे सोपे जाऊ शकते म्हणून मानवी भाषांतर हवे आहे.
-इतर भाषांमधले चालू शकेल का ? (स्पॅनीश, फ्रेंच, मँडरीन, कोरीअन, जॅपनीज भाषांतले विशेषत्वाने हवे आहेत, इतर जागतीक अथवा भारतीय भाषातील सुद्धा चालतीलच)
जे अनुवादक धर्म वगैरे मानत नाहीत विरोध करु इच्छितात त्यांनी या विषयाकडे धार्मीक दृष्टीने न पाहता सांस्कृतिक दृष्टीने पाहण्याचा आणि/अथवा अँथ्रॉपॉलॉजी शास्त्रास साहाय्यभूत विषय म्हणून प्रयत्न करावा हि नम्र विनंती.
अवांतर, फाटे फोडणे अथवा नकारात्मक चर्चा टाळण्यासाठी आभार
आपले प्रतिसाद आणि अनुवाद विकिसाठी वापरले जाणारे असल्यामुळे प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.
वर्गीकरण
याद्या
2586
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्पॅनिश
अनुवादाच्या प्रतिक्षेत असेन,
In reply to स्पॅनिश by श्रीरंग_जोशी
Español
खूप खूप धन्यवाद. परदेशी
In reply to Español by श्रीरंग_जोशी
संधी साठी धन्यवाद
In reply to खूप खूप धन्यवाद. परदेशी by माहितगार
ज्याची आशंका वाटत होती शेवटी
In reply to संधी साठी धन्यवाद by श्रीरंग_जोशी
गूगल कॅशमध्ये जुनी आवृत्ती
In reply to ज्याची आशंका वाटत होती शेवटी by माहितगार