माझ्याकडे सध्या ७ मांजरे आहेत. त्यांपैकी १ बोका आहे आणि १ मांजरी आणि तिची ५ पिल्ले आहेत.
पिल्ले सुमारे १ महिन्याची आहेत. कोणाला पाहिजे असल्यास कृपया सांगावे.
हा धागा मी काथ्याकूट या सदरात टाकत आहे. तरी हे सदर या धाग्यासाठी योग्य नसल्यास कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
वाचने
5066
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुठल्या गावाला आहेत?
कुठल्या गावाला आहेत?
पुणे
In reply to कुठल्या गावाला आहेत? by खेडूत
नर्हे पुणे येथे.
इतका अति शहाण पणा अजून कुठे
इतका अति शहाण पणा अजून कुठे बघायला मिळणार ? तुम्ही समजून घ्या न राव गावाचे नाव !!
हा तर बोचकारलेपणा झाला...
हा तर बोचकारलेपणा झाला...
अहो, मांजरी तुमच्याकडे इतक्या सुखेनैव नांदताहेत... कशाला उगाच कुणाकडे धाडताहेत...
यांना द्या =))
यांना द्या =))
Olx /Quikr वरुन पण मांजरांची
Olx /Quikr वरुन पण मांजरांची देवाणघेवाण होते.
बाकी वस्तूना हल्ली Quikr वाले ने-आण (डीलिवरी) करण्याची पण सोय करतात, मांजरांसाठी पण करत असतील का ?
बाकी फोटोज टाका पिलांचे...
फ्लॅटवर मांजरी पाळणे थोडे कठीणच म्हणून नाही पाळत मी ...नाहीतर खूप मस्त आहे हा प्राणी अगदी रुबाबदार.
मांजराची पिल्लं कितीही गोड
मांजराची पिल्लं कितीही गोड असली तरी त्यांची वाढती संख्या ही समस्याच असते. विशेषतः ती पिल्लं मोठी झाल्यावर मांजरी म्हणजे खुद्द त्यांची आईच त्यांना ठेवून घ्यायला नाखूष होते तेव्हा.. कधीकधी पंजे मारुन हाकलते.
समस्येचं मूळ हायलायटेड भागात आहे. बोकाच दिला तर?
;)
जोक्स अपार्ट. पिल्लं अजून लहान आहेत. अजून दोन महिन्यांनी दिलीत कोणाकडे तर बरं.
त्या पिल्लांचा बाप...
In reply to मांजराची पिल्लं कितीही गोड by गवि
अहो गवि, त्या पिल्लांचा बाप आमच्या सोसायटीत येणारा एक चोरटा बोका आहे.
१ महिन्याची पिल्लं देउ नका.
१ महिन्याची पिल्लं देउ नका. किमान दोन अडिच महिन्याची झाल्यावर द्या. अजुन आईच्या अंगावर पीत असतील ती.
http://www.misalpav.com
https://www.misalpav.com/comment/801401#comment-801401
मिपा मोघुल त्याचा आनंदाने स्विकार करतील :))
आमच्याकडे आहे.
In reply to http://www.misalpav.com by होबासराव
दर्शनमात्रे मन......
https://www.maayboli.com/node/38734
आत्ता लगेच...
आत्ता लगेच देनार नाही आहे.
२-३ महिन्यांनंतरच देणार आहे. पण शोध आत्तापासुनच सुरु केलेला बरा.
मांजारांचे फोटो
गाजरे द्यायची आहेत
गाजरे द्यायची आहेत
माझ्याकडे सध्या ७ गाजरे आहेत. त्यांपैकी १ गाजर आहे आणि १ गाजरी आणि ५ छोटी गाजरे आहेत.
छोटी गाजरे सुमारे १ इंचांची आहेत. कोणाला पाहिजे असल्यास कृपया सांगावे.
ही प्रतिक्रिया मी धागा या सदरात टाकत आहे. तरी हे सदर या प्रतिक्रियेस योग्य नसल्यास कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
-कळावे
आपलाच गाजरवाला.
यावर एक खंग्री प्रतिसाद
In reply to गाजरे द्यायची आहेत by चेक आणि मेट
यावर एक खंग्री प्रतिसाद लिहिता येईल =))
लय भारी.....
In reply to गाजरे द्यायची आहेत by चेक आणि मेट
लय भारी.....
छोटी गाजरे सुमारे १ इंचांची आहेत!!!!!
In reply to गाजरे द्यायची आहेत by चेक आणि मेट
खॅ खॅ खी खी
.
.
खे खै खो खौ खं खः
मी तयार आहे
In reply to गाजरे द्यायची आहेत by चेक आणि मेट
अट एकच -
मी प्रत्येक गाजराची पुंगी करून वाजवून पाहीन. वाजली तरच घेईन. नाहीतर नाही!
बोला!
अरे देवा!
In reply to मी तयार आहे by सुनील
मेलो!...
"गाजराची पुंगी करून वाजवून पाहीन"
ठ्ठो!!
आवरा रे कोणीतरी
अट मान्य आहे.
In reply to मी तयार आहे by सुनील
अट मान्य आहे.
पण आवाज पुंगीसारखा येणार नाही,
थोडा निराळाच येईल !!!!!!!
अमान्य
In reply to अट मान्य आहे. by चेक आणि मेट
पुंगीचा आवाज हाच तिचा युस्स्पी आहे. सबब, आवाज पुंगीसारखाच हवा!!
गाजर ही नैसर्गिक वस्तू आहे,
In reply to अमान्य by सुनील
गाजर ही नैसर्गिक वस्तू आहे,
आणि आपल्याला हवा तसाच आवाज पाहिजे म्हणजे निसर्गाला आव्हान देण्यासारखे आहे!
तेव्हा सबब अट अमान्य.
GM गाजर
In reply to गाजर ही नैसर्गिक वस्तू आहे, by चेक आणि मेट
GM गाजराचे वाण वापरून पहा. कदाचित पुंगी वाजेल!!
अरे वा एका दिवसात बरीच मजल
In reply to अट मान्य आहे. by चेक आणि मेट
अरे वा एका दिवसात बरीच मजल मारलीत की तुम्ही. लगे रहो.
एक भयाण पोटेन्शियल असलेला
एक भयाण पोटेन्शियल असलेला धागा.. या वरुन हा "उपाय सुचवाल?" धागा आठवला..
(छ्या, पूर्वीचं मिपा राह्यलं नै .. ;) )
(छ्या, पूर्वीचं मिपा राह्यलं
In reply to एक भयाण पोटेन्शियल असलेला by अस्वस्थामा
पूर्वीचे मिपाकर पण दिसत नाहीत मिपावर जास्त . त्या काळचे रथी , महारथी जवळजवळ अदृश्य झालेत . पण नवीन फळीही चांगलीच आहे की.
(कधीकधी शिनीयर मिपाकर झाल्यासारखं वाटतंय अन् पोटात गुदगुल्या झाल्यासारखे वाटतंय बघा)
हायला
In reply to एक भयाण पोटेन्शियल असलेला by अस्वस्थामा
उपाय सुचवा धागा वाचुन (प्रतिक्रिया)बेक्कार हसतोय ऑफिसमध्येच!!!
ही मांजरे होय? मला वाटले की
ही मांजरे होय? मला वाटले की तुम्हाला पैसे (मनी) द्यायचे आहेत. =))