एक उघडे पत्र- सर्व मि.पा.सद्स्याना
प्रिय विसोबा खेचर आणि मि.पा. मित्रमंड्ळी,
माझ्या टोचणी मध्ये भरभरुन सहभागी झाल्यबद्दल शतशः धन्यवाद. मी आपल्या सर्वांचा आभारी आहे.
गेली ३० वर्षे समुपदेशन मी करत आलो आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात. पण छोट्या खुर्चीत बसायचा योग प्रथमच आला. मी स्वतः सर्वांना खांब सोडायचा सल्ला न चुकता देतो. आणि मीच हा खांब पक्डुन बसलो होतो घट्ट्पणे. ही मिठी सोडवणे सोपे नव्हते. ते तुम्हा सर्व मंडळीनी अगदी सहज केले. समुपदेशनकाराचे सामुहिक समुदेपशन. आता कसे मोकळ वाटतय. मुक्ति मिळाली.
का कुणास ठाउक पण शाळेनंतर कोणी मित्र झालेच नाहीत. तेच माझ्या रेस्टलेसनेस च कारण आहे असे बायको म्हणते. कदाचित मला माझे सेन्सरस बंद न ठेवता कुणाकडे बोलताच आले नसेल. त्यामुळेच कुणाशी मैत्री झाली नाही. आज बघा -चेहेरे पण न बघितलेले असंख्य मि.पा. वरचे मित्र. अशा न भेट्लेल्या मित्रांची यादी बायकोला सांगितली तेव्हा तिचा चेहेरा बघण्यासारखा झाला. बहुतेक माझ्या मेंदुत काहीतरी केमिकल लोचा झाला आहे असे तीला वाट्ले असावे. तस चूक नाही. कारण संभाषण संपर्क नसताना सुद्धा मैत्री होउ शकते हे समजणे तिच्या आवाक्याबाहेरचे आहे. घरी आलेल्या नविन मैत्रिणीला "तुमचे मिस्टर काय करतात"? ह्या प्रष्नाला "गटारे साफ करतात" हे दबक्या आवाजात दिलेले उत्तर मला दहा फूटावरुन ऐकु आले होते. असो.
हस्ताक्षरावरुन माणसाचा स्वभाव ओळखता येतो. तसेच लिखाणावरुन पण ओळ्खता येतो वा नाही ते माहित नाही. पण लिखाणावरुन माणसाच्या पुर्व आयुष्याच्या पुसट खूणा नक्कीच दिसतात. मला तर अगदी स्पष्ट दिसतात. (सेन्सरस) आणि म्हणुनच आपणा सर्वांमध्ये मी मलाच भेट्तो. आणि माझी मैत्री माझ्याबरोबर होते. किति जणाना भेटायचा योग येइल ते माहित नाही. पण न भेट्ता सुद्धा ही मैत्री मि. पा मुळे कायम राहील. माझ्या भुतकाळातील अत्यंत आदरणीय विभुती आणि मि.पा. वरचे मित्र ह्याची कायम सांगड झाली आहे. त्यातील
काही उदाहरणे
१. विसोबा खेचर = लवाटे मास्तर.
२. नाना, गटणे= लक्षमण कुळ्कर्णी ( ह्या पट्ठ्याने लवाटे सरांना कुठे रहातोस ह्या प्रष्नाचे उत्तर घरी असे दिले होते.) स्पष्ट बोलणारा. काहीही खोट नाही. हा मित्र कुठे आहेमाहित नाही.
३. रामदास= टॉम हेगन( गॉड फादर)
४. भड्कमकर मास्तर= स्टिवन स्पिलबर्ग
५.प्रा.दि.बा आणि बि.का=चांगले मुख्याध्यापक
६.सर्कीट= २० वर्षापुर्वीचा विनायक प्रभु (अत्यंत प्रभावी सॉफ्टवेअर हार्डवेअर स्पेशालिस्ट)
७. टारझन्,सहज, लिखाळ, = खोड्कर पण तरिसुद्धा आवड्णारे विद्यार्थी ८.चतुरंग्=चाणक्य (हे कनेक्शन मला सुद्धा कळलेले नाही)
ह्याची कारणमिमांसा करता॑ येणार नाही. पण सगळ्या गोष्टीना उत्तर नसते. माझ्याकडे नाही. घरी गणेशोत्सव जोरदार साजरा होतो. सर्व खानदान येते. कोणालाही आमंत्रणाची गरज नसते. सोयीनुसार सगळे पोचतात. अमेरिकन नातलग सुट्ट्या अड्जेस्ट करुन येतात. हे इथे सांगण्याचे कारण असे की मी बराच मवाळलेला आहे असे सर्व नातेवाइकांचे मत झाले आहे. त्याला वय (५०)कारण असावे असा त्यांचा समज आहे. पण खरे कारण मि.पा. आहे हे सांगुन पटले नसते. वयाच्या २१ वर्षापासुन कायम ड्रीम जॉब्(का वर्क) कायम मोठी खुर्ची. त्यामुळे हम बोलेसो कायदा ची सवय. ही सवय मि.पा. ने मोडली. काही वाचनाने काही लिखाणाने. ""मी लय मोठा " माझे सगळे बरोबर" ह्या खांबापासुन सुटका मि.पा. नेच दिली. कधी कधी वाट्ते कि ही सर्व जबर मेंदू एकत्र आले तर ? जबरदस्त परिवर्तन नक्की.
मि.पा. वर विहार तर नक्की चालु राहील .
कोण जाणे आण्खी कोण कोण महान इथे भेट्तील.
इथे थाबतो. (समोर पालक दिसत आहेत. रुमाल पण तयार आहेत.)
आपला नम्र
विनायक प्रभु(सर्व खांबापासुन मुक्त)
वाचने
7069
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
प्रभूसाहे
लिखाळ
In reply to लिखाळ by सहज
असहमत
In reply to असहमत by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हा हा हा
आता पर्यंत
लिखाणावरु
ब्रेक
In reply to ब्रेक by विनायक प्रभू
..
उघडे मन
विनायकराव, मिसळपाव आपली मानसिक भूक भागवते, अनेक नवनवीन गोष्टी कळतात, मित्र मिळतात. तेव्हा इथे येत चला आणि लिहीत चला. -प्रा.दि.बि. (मुख्याध्यापक ) मिपावरील दोस्त मंडळी अजून कोणकोणत्या नावांनी आणि पदांनी आम्हाला सन्मानीत करणार आहेत कोणास ठाऊक. :)उघड्या पत्रातून मन उघड करण्यासाठी...च्यायला हल्ली शब्दही नीट एका वाक्यात येत नाहीत. राज ठाकरेंनी मराठी अस्मितेचे आंदोलन मागे घेतल्यापासून सारखं असेच होत आहे.खोड्कर
विनायक भौ
प्रभुजी तुम चन्दन हम पानी |
विनायकराव,
In reply to विनायकराव, by चतुरंग
>>स्वतःला
In reply to विनायकराव, by चतुरंग
गाठ
टॉम हेगन.
जय हो प्रभु'देवा
किति जणाना
प्रकटन आवडलं
गटारे
ओळख आणि स्नेह
प्रभु अजी गमला
मनापासून मनाकडे
मनापासून
In reply to मनापासून by भडकमकर मास्तर
स्टिव्हन स्पिलबर्गला तिथे..
महोदय, मी