Skip to main content

जगावं की मरावं हा एकच सवाल... कराव्या या वैद्यकीय चाचण्या, की फेकुन द्यावं हे........

लेखक प्रसाद भागवत यांनी शनिवार, 09/01/2016 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
माझा थोडेफार आकलन आणि अनुभवाचा विषय सोडुन येथे लिहिण्याची ही पहिलीच वेळ, सहाजिकच येथे भर माहिती 'शेअर' करण्याऐवजी माहिती गोळा करणे, शंका निरसन करुन घेणे यावर आहे ( कोण रे ते तिकडे हुश्श्श...म्हणाले??) समजायला लागल्यापासुन मी दरवर्षी सर्वसामन्य स्वरुपाच्या वैद्यकीय चाचण्या करुन घेत आलो आहे. याशिवाय कुटुंबातील अनेक सद्स्याच्या आवश्यक चाचण्यांही वेळप्रसंगी होतच असतात. चाचण्याचे बाकीचे स्वरुप काहीसे तेच असले तरीही गेले काही वर्षे व्हीटॅमिन B12 वा D3 या चाचण्या करुन घेण्यावर भर आहे असे दिसते...संशयास जागा महणजे नेमक्या याच चाचण्या अन्य नियमित चाचण्यांच्या तुलनेने महागही आहेत. गेले अनेक वर्षांत आमच्या कोणातही न आढळ्लेल्या ही B12 वा D3 ची कमतरता हल्ली वारंवार अधोरेखित होते. एवढेच काय मी केलेल्या चर्चे अंती अनेक लोकांना हाच अनुभव आला आहे असे समजते. माझ्या परिचित एक डॉक्टरांच्या मते ह्या तपासणीऐवजी सरळ B12 वा D3 कमतरतेव्र्रेल गोळ्या घेतलेल्या उत्तम, तसेही ही व्हिटॅमिन्स अतिरिक्त स्वरुपांत शरिरात साठुन रहात नाहीत मग एकदा ही 'टेंडन्सी' माहित झाल्यावर या टेस्ट्वारी अनावश्य्क पैसे का घालवावे?? असा त्यांचा दृष्टिकोण आहे. एकीकेदे सर्वसामान्य तपासण्यांच्या यादीत ही 'घुसखोरी' म्हणावी तो दुसरीकडे अनेक डायग्नोस्टीक सेंटर्सनी प्रचंड जाहिरातबाजी करुन व अगदी MLM सारख्या पद्धती वापरुन 'Preventive Checkup' ची अनेक पॅकेजेस विकण्याचा तडाखा लावला आहे. टोमोग्राफी, ॲजिओग्राफी, M.R.I, कॅरोटिड आर्ट्रीलरी सारखी नावे ( काही चुकले असल्यास माफी असावी) तोंडावर फेकुन हे मार्केटिग एजंटस (जे बहुतेकदा नॉन मेडीको असतात) समोरच्याला आधी गांगरवतात, नंतर घाबरवतात आनि मग आम्ही हे सारे ईतरांपेक्षा कसे स्वस्त देतो असे सागुंन 30/35 हजाराचे 'Preventive Checkup' पॅकेज त्याच्या गळ्यात मारतात.. ठराविक काळाने आपले मेडिकल चेक-अप करायलाच हवे यात अजिबात दुमत नाही मात्र एखाद्या विषयातील कोणतीही प्राथमिक तपासणी (उदा ECG) न करता थेट डॉप्लर वा ॲजियोग्राफी करणे कितपत आवश्यक आहे?? मागे एकदा मी या वैद्यकिय चाचण्यांसंदर्भात एक लेख ( बहुधा पुण्यातील डॉ. अनंत फडके यांचा, पण खात्री नाही) वाचला होता ज्यांत यतील कोणतीच चाचणी 100% अचुक नसते व अगदी ठणठणीत, निरोगी अशा 100 लोकांच्या ह्या चाचण्या केल्यास त्यातील काही निरोगी लोकांच्या reports मध्येही अनियमितता दिसुन येतील.... असा काहीसा युक्तीवाद होता. असो. येथील डॉ खरे आणि वैद्यकिय विषयांतील अन्य तज्ज्ञ् (हा शब्द असाच का लिहितात??) माझे गैरसमज दुर करतील आशी आशा बाळगतो.

वाचने 25886
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

असो. सांगण्याचा मुद्दा असा कि जसे काही वर्षांपूर्वी Fat म्हणजे काहीतरी भयंकर, नंतर काही वर्षांनी Fat नाही तर Cholesterol घातक असते आणि आता ते मागे पडून साखर घातक असते असा प्रचार हेल्थ इंडस्ट्री मध्ये होताना दिसतो. थोडक्यात दर काही वर्षांनी नवीन संशोधानांच्या आधारे हेल्थ इंडस्ट्रीला एक नवीन सुपर बग सापडतो, तसेच विटामिन, calcium, खनिज इत्यादी बाबतीतही एखादी नवीन कमतरता आढळते. ती अगदी सर्रास असते. म्हणजेच एखाद्या software engineer ला हि असते, एखाद्या field work करणार्या कामगाराला ही असते आणि एखाद्या गृहिणीलाही असते. काही वर्षांपूर्वी सर्रास calcium च्या गोळ्या घ्यायचा सल्ला दिला जायचा. आता तो विटामिन ब करिता दिला जातो इतकच. विशेष म्हणजे एक नटीला साईझ झीरो बनवणार्या तिच्या dietitian चे असे मत आहे कि "सर्व जीवन्सात्वी मिळवण्यासाठी कृत्रिम स्त्रोत आवश्यकच आहेत. नैसर्गिक स्त्रोतांमधून सर्व जीवनसत्त्व मिळवणे अशक्यच आहे!" त्यामुळे तिने तिच्या पुस्तकात सर्रास विटामिन आणि मिनरल्सच्या गोळ्या घायला सांगितले आहे (चिकन शिवाय प्रोटीन मिळताच नाही हा आणखी एक जावैशोध त्याच पुस्तकातला आहे). खरच अशी कंडीशन असेल तर आपण सगळेच आजारी आहोत. थोडक्यात चौरस आहार असेल तर कुठल्याही जीवनसत्वाची कमतरता असायचे कारण नाही आणि कुठल्याही औषधाची गरज भासू नये. आहार बरोबर नसेल आणि व्यायाम नसेल तर घेऊ तितकी औषधं कमीच आहेत.