ढोबळ मानाने आपण दहशतवादाची व्याख्या कशी करतो ? म्हणजे कुठे अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट केला किंवा हल्ला केला. साधारणत: आपण त्यास दहशतवाद म्हणतो. परंतु एक लक्षात घेत नाही कि ती दहशतवादाची १० वी स्टेप असते. १ ते ९ मध्ये जे काही घडते त्यास आपण दहशतवाद म्हणत नाही. उदाहरणार्थ भाषिक बहुसंख्य भाषिक अल्प संख्याकास धमकावतात ते काय असते ? व्होट बँकेच्या जोरावर धार्मिक अल्पसंख्य मोर्चा काढतात आणि एका शहीद स्मारकाची विटंबना करतात तेव्हा तो बहुसंख्य आणि अल्पसंख्य लोकांचा दहशतवाद असतो. आपण हे मान्य करतो का ? उदाहरणार्थ जेव्हा काही शाकाहारी लोक म्हणतात कि आम्ही मांसाहार करत नाही म्हणून आमच्या शेजारी मांसाहारी लोक नकोत तो हि एक प्रकारचा दहशतवादच असतो हे आपणास मान्य आहे का ? इथेही दहशत पसरवली जातेच भले तिचे स्वरूप सौम्य असेल पण मुद्दा उरतोच कि दहशत आहेच.
काही मुलतत्ववादी आपली मते रुजविण्यासाठी दहशतवादाचा सहारा घेतात. जे चूक आहे. लोकशाही मार्गाने ते त्यांच्या मागण्या लोकांपुढे /सत्तेपुढे / जगापुढे मांडू शकतात. परंतु ते तसे न करता दहशतीचा मार्ग अवलंबतात. पाकिस्तानातील लोक / क्रिकेट पटू इथे येवू नयेत हा माझा मुद्दा आहे पण तो मान्य करावयास लावण्यासाठी काळे फासणे हे कशात बसते ? आम्ही खळ खट्याक करू हे काय आहे ? हैदराबादमध्ये एक माथेफिरू म्हणतो १५ मिनिटे पोलीसांना रजा द्या मग बघा आम्ही काय करतो ? हे सगळे दहशतीचे प्रकार आहेत पण ह्यांची उतरंड १ ते ९ आकड्यात बसते संभवत: आम्ही त्यास दहशतवाद मानत नाही . एका विशिष्ठ धर्मियांनी किंवा आपण मुलतत्ववाद्यांनी केलेल्या हिंसाचारास दहशत माणू लागलो आहोत कि नाही ?
शेवटी दशतवाद दहशत पसरविण्यासाठी केला जातो. मग आम्ही गटाने मोठे आहोत म्हणून तुम्हास ह्या ट्रेन मध्ये चढू देणार नाही. आम्ही हे विशिष्ठ मांस खात नाही म्हणून तुम्ही खावू नका. किंवा तुम्हास खावू देणार नाही. तुम्ही आम्हास कोण सांगणारे हेल्मेट घालू नका. ह्यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय झुगारून लोक बेदरकार वाहने चालवतात तेही हेल्मेट न घालता. आम्ही शाकाहारी आहोत म्हणून तुम्ही मासाहार सोडा. आम्ही विशिष्ठ भाषा बोलतो मग तुम्ही हि ती बोललीच पाहिजेल. आमचे सणवार / संस्कृती (प्राचीन ? ) पाळण्यासाठी आम्ही रस्ते अडवू. ढोले ताशे D J चा घणघणाट करत मिरवणूक काढू . तुम्ही आम्हास आडवणारे कोण ? असे म्हणणे . आम्ही रस्त्यावर बसून नमाज पढू . कर्णे लावून लोकांची झोपमोड करु. . हे सगळे प्रकार दहशतीत बसतात.
मग जे बोंब स्फोट करतात . हल्ले होतात त्यासच फक्त दहशतवाद किंवा हल्ले कसे म्हणायचे ? भारतीय संविधानाने केलेले कायदे पायदळीस मिळवुन आपलाच हेका सुरु ठेवणे हाही दहशतवादच झाला .
वाचने
31664
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
१००...२००...३००...कितीही !
वाचने तरी २०० झाली आहेत,
In reply to १००...२००...३००...कितीही ! by उगा काहितरीच
दहशतवादावर आधारित मिपाकरनी
ही घ्या लिंक
In reply to दहशतवादावर आधारित मिपाकरनी by जेपी
लिंक बद्दल धन्यवाद.
In reply to ही घ्या लिंक by सस्नेह
असंवेदनशीलता वाढलेली नि मने
खंडुबा राया ,म्या काय मंतो,आज
In reply to असंवेदनशीलता वाढलेली नि मने by पालीचा खंडोबा १
असले लेख टाकणं हा सुद्धा एक
इस्लाम म्हणजे दहशतवाद...
एक काडी, २०० प्रतिसाद.. ;)
In reply to इस्लाम म्हणजे दहशतवाद... by कट्टापा
भल्या पहाटे?
In reply to एक काडी, २०० प्रतिसाद.. ;) by अत्रुप्त आत्मा
व्याख्या