अजून या विषयावर धागा दिसला नाही म्हणून नाइलाजास्तव धागा काढतो आहे.
अगोदर ही बातमी वाचा:
Offices of Lokmat Newspaper Attacked Over Piggy Bank Cartoon
http://epaper.esakal.com/Sakal/30Nov2015/Normal/PuneCity/page3.htm
मला हिंदू-मुस्लीम वादाची आणि नेहमीची तीच ती चर्चा करण्यात काही रस नाही.
याच सुमारास शनिशिंगणापूरला एका महिलेने पूजा केल्यामुळे गावकरी संतप्त झाल्याचीही बातमी आली. त्यावर रीतसर पुरोगामी प्रतिक्रियाही आल्या.
पण गेल्या दोन दिवसात मला वृत्तवाहिन्यांवरील चर्चा(?) पाहण्याचा योग न आल्याने मिडीयात या दोन्ही बातम्यांना किती फूटेज मिळाले याची कल्पना नाही.
पहिल्या बातमीबाबत मला जास्त उत्सुकता आहे कारण ही बातमी थेट माध्यमांशी संबंधित आहे.
याआधी शिवसेना व तत्सम संघटनांनी माध्यमांवर हल्ले केले तेव्हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा किती संकोच झाला होता हे जाणकार जाणतातच. त्यामुळे आता हे प्रकरण खरंच अनावधानाने घडले असा बचाव होणार की दै.लोकमतमधील गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांपैकी एक व्यक्ती 'देशपांडे' आडनावाची असल्यामुळे ही आगळीक संघी लोकांनी मुद्दामच केली आहे,माध्यमांत बघा उच्चवर्णीयांचा कसा प्रभाव आहे वगैरे ठराविक पुरोगामी वळणाची चर्चा होणार,कुणास ठाऊक?
की दर्डांची भाजपाशी जवळीक वाढली हे याप्रकारामागील कारण आहे ?
पण प्रस्थापित माध्यमांतून यावर चर्चा तरी होणार का?
उत्तर शोधणे जास्त कठीण नाही...त्याबाबत काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेबाबत माझीच एक फेस्बुक पोस्ट पुन्हा इथे टाकण्याचा मोह आवरत नाही...
जान है तो जहान है ! असा योगायोग फार दुर्मिळ असतो. जवळपास एकाच वेळी माध्यमात या दोन बातम्या आल्या. १. 'रजनीकांत यांनी टिपू सुलतानची भूमिका करु नये'-http://www.lokmat.com/storypage.php?catid=247&newsid=7852642 २. Fatwa against A.R. Rahman for film on Prophet -http://www.thehindu.com/news/national/fatwa-against-ar-rahman-for-film-on-prophet/article7642275.ece आता एखाद्या चित्रपटात एखादी भूमिका करावी किंवा करू नये हा वास्तविक पाहता त्या अभिनेत्याच्या ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्या’चा प्रश्न. त्याचप्रमाणे एखाद्या चित्रपटाला संगीत द्यावे किंवा देऊ नये हा संगीतकाराचा. इतरांना त्यात पडायचे काहीच कारण नाही. त्यामुळे या विषयावर चर्चा करणे हा अभिव्यक्तिस्वातंत्र्यवाल्यांचे कर्तव्य ठरते. पण दोन्ही बातम्या एकसाथ आल्यामुळे काही लोकांची गोची झाली आहे. तेव्हा या चर्चेबद्दल दोन शक्यता आहेत- १. दोन्ही विषयांवर अजिबात चर्चा होणार नाही. किंवा २. समजा चर्चा झालीच तर सिनेमावाल्यांच्या (वाचा: सेलिब्रेटींच्या) हा..मु...च्या बातम्या करणारे सर्वज्ञानी पत्रकार आणि संपादक या दोन बातम्यांमधील कुठल्या बातमीचा कीस पाडून कोणाला ‘कटघरे’मे ‘खडा’ करतील हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. कारण हे विरोध कोण करतय यात दडलेलं आहे ? पत्रकार, कलाकार, अभिव्यक्ती स्वात्रंत्र्याचे स्वतंत्रतासेनानी असले म्हणून काय झालं , भैया आखिर जान है तो जहान है ! आता ‘मुहम्मद: द मेसेंजर ऑफ गॉड’ भारतात बघण्यासाठी उपोषण करावं लागू नये म्हणजे मिळवलं. समजा तशी वेळ आलीच तर ‘एफटीआयआय’ च्या आवारात एखादे पाल रिकामे आहे का याची चौकशी करावी म्हणतो.
वाचन संख्या
4801
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
लोकमत प्रकरणाबद्दल एक
आपले दोन्ही प्रतिसाद आवडले.
In reply to लोकमत प्रकरणाबद्दल एक by संदीप डांगे
अधिक माहितीसाठी चार्ली
In reply to आपले दोन्ही प्रतिसाद आवडले. by ए ए वाघमारे
शार्ले हेब्दो अन ह्या
In reply to अधिक माहितीसाठी चार्ली by संदीप डांगे
धन्यवाद अभ्या...!
In reply to शार्ले हेब्दो अन ह्या by अभ्या..
लोकमतच्या प्रकरणाशी तुलना
In reply to अधिक माहितीसाठी चार्ली by संदीप डांगे
लोकमतच्या बाबतीत कोणा
In reply to लोकमत प्रकरणाबद्दल एक by संदीप डांगे
लोकमतचे संपादक.
In reply to लोकमतच्या बाबतीत कोणा by आदूबाळ
आता चांगलीच जाग आली असेल....
In reply to लोकमतच्या बाबतीत कोणा by आदूबाळ
त्यामागे फार अभ्यास,
याचीच दुसरी बाजू ती हल्ला
दोन्ही प्रतिसाद अप्रतिम. हेच
In reply to याचीच दुसरी बाजू ती हल्ला by संदीप डांगे
धन्यवाद! ;-)
In reply to दोन्ही प्रतिसाद अप्रतिम. हेच by अभ्या..
+ 111111111111
In reply to दोन्ही प्रतिसाद अप्रतिम. हेच by अभ्या..
उत्तम प्रतिसाद डांगे साहेब
जबहर्या
@ संदीप डांगे : उत्तम समतोल
दुटप्पी लोकमत
मूर्खपणाला उत्तेजन
थोडेसे विषयांतर होतेय - दिवाळी मध्ये अनेक वर्षांपुर्वी लक्ष्मी
In reply to मूर्खपणाला उत्तेजन by हुप्प्या
लक्ष्मी तोटा मिळतय की अजून.
In reply to थोडेसे विषयांतर होतेय - दिवाळी मध्ये अनेक वर्षांपुर्वी लक्ष्मी by gogglya
यावर्षीपासून त्यावर बंदी
In reply to थोडेसे विषयांतर होतेय - दिवाळी मध्ये अनेक वर्षांपुर्वी लक्ष्मी by gogglya
पत्रकार
तसा तो
In reply to पत्रकार by सुमीत भातखंडे