Skip to main content

भावबली

Published on शनीवार, 21/11/2015
कटप्पाने बाहुबलीला कां मारले? एक न सोडवला गेलेला यक्षप्रश्न. .................................... गेल्या दोन महिन्यात झालेले तमाशे पाहून ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले! कटप्पाने बाहुबलीला मारले, कारण बाहुबली (कटप्पाच्या नजरेत) intolerant होता! .............................. कटप्पा जर फक्त एक दोन वर्ष थांबला असता, तर असला हिंसक उपाय न करता देखील तो बाहुबलीला मारू शकला असता! .................................. कटप्पाने फक्त त्याला मिळालेले पुरस्कार वापस करायला हवे होते. लगेच चेनेल्सनी कावकाव केली असती. इतर शंभर एक लोकांनी आपापले वापस करून कोल्हेकुई केली असती. चेनेल्सनी बाहुबलीला intolerant ठरविले असते. मग लोकांनी पुढच्या इलेक्शनमधे बाहुबलीला धुळीस मिळविले असते! अगदी अहिंसक आणि वैधानिक उपायांनी कटप्पा राजा बनला असता! ....................... बिच्चारा कटप्पा ! एक दोन वर्षे थांबला असता तर केवढा रामबाण उपाय त्याला मिळाला असता!

वाचन संख्या 3021
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

ळोल !

हा....हा.... हा... :-) भारी लिवलय ! अमोन्ची नजरचह भारी !

:D

कटप्पाने बाहुबलीला कां मारले?
कारण बाहुबलीने पाहुनी विज्ञानाच्या बला भ्रमीत झाला दारु-अ-वाला दारु-अ-वाला असे म्हटले असावे.