'मिसळपाव डॉट कॉम' नावाच्या सोशल साइटचा दिवाळी अंक गेली अनेक वर्षं निघतो आहे. तरुण-हौशी मंडळींनी केलेलं संपादन आणि लेखन ही या अंकाची जमेची बाजू. धीरगंभीर चर्चात्मक विषयांचा वाराही या दिवाळी अंकाला लागलेला दिसणार नाही. पण उत्साही, अनौपचारिक भाषा वापरणारं, दिलखुलास दाद देणारं, स्वागतशील वातावरण हा या अंकाचा विशेष. त्या मानानं तो तसा फार प्रोफेशनल वा प्रमाणलेखनाचे निकष काटेकोरपणे पाळणारा असेलच असं नव्हे. त्याच्या वाचकाचं वय मात्र निश्चितपणे कमी आहे, आणि ते प्रतिक्रियांमधून लगेच लक्षात येतं.
--------------------------
आजच्या मटामध्ये मेघनाताईंचा 'दिवाळी अंकांची ऑनलाईन आतषबाजी' हा लेख आलाय, त्यातील ही मिपा दिवाळी अंकाची दखल. हा पॅरा वाचून काही प्रश्न पडले म्हणून हा लेखन प्रपंच.
ढिस्क्लेमर :-
१) मेघनातै आणि आमचे काय वैर नाय. (गतसाली त्यांच्याकडून वट्ट रकमेचा लेखनाबद्दलचा चेक आपल्याला मिळालेला आहे.)
२) प्रा. डॉ. मिपा दिवाळी अंकाचे मुख्य संपादक असताना देखील 'तरुण-हौशी मंडळींनी केलेलं संपादन' असा उल्लेख केल्याने मला जळजळ झालेली नाहीये.
तर आता सुरुवात करतो.
तरुण-हौशी मंडळींनी केलेलं संपादन आणि लेखन ही या अंकाची जमेची बाजू.ह्या अंकाचे संपादन तरुण आणि हौशी लोकांनी केल्याने नक्की जमेची बाजू काय घडली हे कुठेही सांगण्यात आलेले नाही.
धीरगंभीर चर्चात्मक विषयांचा वाराही या दिवाळी अंकाला लागलेला दिसणार नाही. पण उत्साही, अनौपचारिक भाषा वापरणारं, दिलखुलास दाद देणारं, स्वागतशील वातावरण हा या अंकाचा विशेष.संपादन तरुण आणि हौशी लोकांनी केल्याने हे असे घडले आहे असे म्हणायचे असावे काय? धीरगंभीर विषय अंकात आले तर त्याला दखलपात्र म्हणता येईल काय? किंवा 'उत्तम' दिवाळी अंकाची व्याख्या नक्की काय असते? ६०+ वर्षाचे संपादक आणि उगाच जागतिक चर्चा, संस्कृतीचा उपापोह इ. विषय अंकात आले की त्याला दर्जा मिळतो? ताईंनी म्हणल्याप्रमाणेच 'उत्साही, अनौपचारिक भाषा वापरणारं, दिलखुलास दाद देणारं, स्वागतशील वातावरण' हे पुरेसे नाही काय? 'धीरगंभीर चर्चात्मक विषयांचा वारा' जिथे वाहतो त्या संस्थळांची गेली काही वर्षे जी अवस्था आहे, ती योग्य संदेश देणारी नाही काय?
त्या मानानं तो तसा फार प्रोफेशनल वा प्रमाणलेखनाचे निकष काटेकोरपणे पाळणारा असेलच असं नव्हे. त्याच्या वाचकाचं वय मात्र निश्चितपणे कमी आहे, आणि ते प्रतिक्रियांमधून लगेच लक्षात येतं.प्रोफेशनल वा प्रमाणलेखनाचे निकष काटेकोरपणे पाळणारे अनेक छापील दिवाळी अंक काही कालावधीत 'राम' म्हणायला लागले. अनेक उदाहरणे तर आपण जाणतोच. मुळात ई-दिवाळी अंकांना निकष कशाला हवेत? उत्स्फूर्त लेखन आणि मायमराठीची सेवा ही निकषांमध्ये बसवायचीच कशाला? मनमोकळे लेखन आणि नवलेखकांचा हुरूप हीच खरेतर अशा अंकांची देणगी असते. नावाजलेल्या लेखकांना आणि त्यांच्या 'दवणीय किंवा मला पहा फुले वाहा' प्रकारच्या लेखनाला कंटाळूनच गेली काही वर्षे वाचक सातत्याने नवलेखकांना आवर्जून वाचत आहेत. एखाद्या अंकात असे नावाजलेले लेखक नसतील तर त्याची पात्रता खालावते का? आणि सगळ्यात खटकला तो वाचकांच्या वयाचा उल्लेख. फक्त प्रतिक्रिया देतात तेवढेच त्या अंकाचे वाचक असतात का? किती तरी लोक निव्वळ वाचनमात्र असतात. त्यात सर्व वयोगट आणि प्रोफेशनमधील वाचक असतात. त्यांना फक्त प्रतिक्रिया दिली नाही म्हणून गणतीत घ्यायचेच नाही का? मुख्य म्हणजे वाचकांचे वय आणि प्रतिक्रिया ह्यांचा संबंधच काय येतो? आणि वाचकांच्या वयाचा आणि अंकाच्या दर्जाचा संबंध काय? 'चांदोबा' आज सर्व वयोगटातील लोकं वाचतातच ना? का तिथे इयत्ता ५वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिल्याने तुम्ही त्याला 'फक्त बालगोपाळांचे' असे मानणार आहात? तर महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की मिपाकरांनो तुमचे वय काय? लेखात बौद्धिक का शारीरिक ते स्पष्ट केलेले नसल्याने, कृपया दोन्ही वयं सांगा.
वाचन संख्या
15064
प्रतिक्रिया
94
मिसळपाव
प्रतिक्रिया
अय्या!
एक कुठले तरी सांगा की पण. ;)
In reply to अय्या! by पैसा
घाबरत विचारते
In reply to अय्या! by पैसा
मग आपला परा काय चंद्रावरचा
In reply to घाबरत विचारते by पैसा
वय घेउन त्या माहितीचा काय
व.पु
In reply to वय घेउन त्या माहितीचा काय by टवाळ कार्टा
आयला...तुम्हीसुध्धा?? तुम्ची
In reply to व.पु by गॅरी ट्रुमन
वाह!
In reply to व.पु by गॅरी ट्रुमन
ह्या मेघनाताई कोण? कुणी पोक्त
??
हम्म
In reply to ?? by सोत्रि
हा प्रश्न विचारायचा तुम्हाला
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
हा प्रश्न विचारायचा तुम्हाला अधिकार आहे कासोत्रिंच्या आगामी पुस्तकाला (चावडीवरचे कॉकटेल) मिळू घातलेला पुरस्कार परत करण्याच्या निर्णय सोत्रिनी घेतलेला आहे. त्यामुळे त्याना कुठल्याही मुद्द्यावर काहीही प्रश्न विचारण्याचा हक्क आपोआपच प्राप्त झालेला आहे परागुर्जी , उगाच शंका घेवू नये.विशल्या, तुमाखमि!!
In reply to हा प्रश्न विचारायचा तुम्हाला by विशाल कुलकर्णी
तुम्ही जेष्ठ आहात का?
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
मुद्दे छान मांडलेत. त्याबद्दल
अर्र. या लिंकवरचे चांदोबाचे
In reply to मुद्दे छान मांडलेत. त्याबद्दल by मांत्रिक
मिपाचा या वर्षीचा दिवाळी अंक
इतके दिवस खुबीने गुप्त
In reply to मिपाचा या वर्षीचा दिवाळी अंक by डॉ सुहास म्हात्रे
+१..
In reply to मिपाचा या वर्षीचा दिवाळी अंक by डॉ सुहास म्हात्रे
+१११११
In reply to +१.. by गवि
चंग्या अन् आम्ही सोबतच झेड
म्हणजे तू माझ्या नंतरच्या
In reply to चंग्या अन् आम्ही सोबतच झेड by उगा काहितरीच
उगा चा षटकार!! _/\_
In reply to चंग्या अन् आम्ही सोबतच झेड by उगा काहितरीच
मेघना काकू किती वर्षाच्या
मेघनाताई / काकूंचे..
उत्साही, अनौपचारिक भाषा
हायला. लोच्या आहे.
In reply to उत्साही, अनौपचारिक भाषा by ३_१४ विक्षिप्त अदिती
दिलखुलासपणा ही मनाने तरुण असणाऱ्यांची लक्षणं असतात.एक सांगाल का वरचे वाक्य लिहीता आणि " बुढ्ढे उत्साही, अनौपचारिक आणि दिलखुलास असत नाहीत." असे सुद्धा म्हणता. म्हणजे "जे उत्साही, अनौपचारिक आणि दिलखुलास नसतात ते बुढढे असतात" असा निष्कर्श काढायला हरकत नसावी. बरोबर?बरोबर.
In reply to हायला. लोच्या आहे. by चिंतामणी
माझ वय सांग्गू??
मिपाचा दिवाळी अंक ही मिपाकरांची खाजगी मालमत्ता आहे.....
पैसे दिले
टक्या म्हणुन गेलाय,
च्यायला, वय कमी आहे असं
मटा संवादमधला तो लेख इथे
मटामधला लेख वाचला.
ऐसीअक्षरे आणि रेषेवरची अक्षरे
In reply to मटामधला लेख वाचला. by चतुरंग
+१११११११११११११११
In reply to मटामधला लेख वाचला. by चतुरंग
येरकुंडकरांचं भाषण नव्हे रे
In reply to +१११११११११११११११ by बॅटमॅन
हाहाहाहा रैट्ट.....गुरुवर्य
In reply to येरकुंडकरांचं भाषण नव्हे रे by गवि
चक्क वाल्गुदस्वामी चूकले????
In reply to हाहाहाहा रैट्ट.....गुरुवर्य by बॅटमॅन
गप्राव्रे =))
In reply to चक्क वाल्गुदस्वामी चूकले???? by टवाळ कार्टा
ख्या ख्या ख्या
In reply to गप्राव्रे =)) by बॅटमॅन
टक्याने
In reply to ख्या ख्या ख्या by टवाळ कार्टा
"मिपा च्या उलट "उपक्रम डॉट
Back with bang.
पर्या लेका.... शांत बसवत नै का ?
मिपाच्या अंकातली मिसळ कशी का
तिकडे 'वेशीवरची लक्तरे'
In reply to मिपाच्या अंकातली मिसळ कशी का by सायकलस्वार
'वेशीवरची लक्तरे'
In reply to तिकडे 'वेशीवरची लक्तरे' by जव्हेरगंज
आधीचे अंक वाचले नसावेत
मूळ लेख वाचला.....
वरील प्रतिक्रिया दिलेले सर्व मेंबर
आपण....
In reply to वरील प्रतिक्रिया दिलेले सर्व मेंबर by याॅर्कर
नै हो... अजून यौवनात मी ;) =)
In reply to वरील प्रतिक्रिया दिलेले सर्व मेंबर by याॅर्कर
नै हो... अजून यौवनात मी...
In reply to नै हो... अजून यौवनात मी ;) =) by डॉ सुहास म्हात्रे
यॉर्कर दादा मी लहान आहे हो;=)
In reply to वरील प्रतिक्रिया दिलेले सर्व मेंबर by याॅर्कर
यॉर्कर दादा मी लहान आहे हो....
In reply to यॉर्कर दादा मी लहान आहे हो;=) by पियुशा
हे तू सांगित्ले नैस तरी
In reply to यॉर्कर दादा मी लहान आहे हो;=) by पियुशा
हम्म, दादा
In reply to यॉर्कर दादा मी लहान आहे हो;=) by पियुशा
+२८ वय आहे. आधी खांडेकर मग
छान!
मिपाचा दिवाळी अंक किमान
20 वर्षे
चाळीस कमी ( शंभराला ).
माजी संपादिका (औट घटकेच्या)
मिपाला कायम यौवनात ठेवणार्या
नेमकी
आता पहिली गोष्टः आमचे वयाबाबत बरीच मतमतांतरे आहेत्,जालावर काही जण काका,काही जण आजोबा,घरचे घोड्या तर शालेय मित्र भुस्नळ्या ,बैला वगैरे संबोधतात यावर आम्ही नक्की काय वयाचे याचा अंदाज येत असेल तर पहा.
भारी आहे
In reply to नेमकी by नाखु
इक्त मारु नै कुणाला ;) =)
In reply to नेमकी by नाखु
विषय निघालाच आहे तर ...
वय हा सगळ्यांचाच अतिशय
म टा सारख्या अर्धमराठी
काहीही या ताईंचं. म्हणजे बाळ
तुम्ही कोणत्या लेखाबद्दल हा
सॉरी दुवा मिल्ळाला.
In reply to तुम्ही कोणत्या लेखाबद्दल हा by ऋषिकेश
प्रतिसाद देणार्यांपैकी किती
In reply to सॉरी दुवा मिल्ळाला. by ऋषिकेश
असेल बॉ! चालायचेच!
In reply to प्रतिसाद देणार्यांपैकी किती by बॅटमॅन
आमचे वय.... कुणाला फाट्यावर
मिपा वय- सहा वर्षे.खरे वय
कोण हया मेघनाबै? आणि कोणी का
काय रे बाबा! धड कौतुकही घेता
एक क्षुल्लक चूक असेल झालं.
In reply to काय रे बाबा! धड कौतुकही घेता by मेघना भुस्कुटे
रुची आणि रूची वरुन तुम्ही
In reply to काय रे बाबा! धड कौतुकही घेता by मेघना भुस्कुटे
हा वयाचा विदा गोळा करून
करंज्या चकल्या करून
In reply to हा वयाचा विदा गोळा करून by कवितानागेश
मग ठिकेय!
In reply to करंज्या चकल्या करून by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निम्मे मिपाकर आपले खरे वय
गेले एनेक वर्हे १६
वय?
ते वयबीय जाऊदे गाढवाच्या..
In reply to वय? by निराकार गाढव
मटा च्या लेखाबद्दल चर्चा कशाला ?
ह्याच साठी केला होता
आयला...
In reply to ह्याच साठी केला होता by नाखु
धन्यवाद. छान लेख आहे!
In reply to ह्याच साठी केला होता by नाखु