गेले एक-दोन कस्टममधील २२ अधिकार्यांना खंडाळ्याला पार्टीला गेलेले असताना पकडल्याची बातमी (म.टा. मधील मूळ बातमी) येत आहे. त्यातील प्रमुख भाग खाली चिकटवत आहे:
विदेशी मद्य... ब्ल्यू फिल्म... लॅपटॉप... कोऱ्या करकरीत नोटा, अशी सारी तजवीज करून मुंबईतील बारबालांसोबत थंड हवेच्या खंडाळ्यातील खासगी बंगल्यात रंग उधळणाऱ्या कस्टम विभागातील बड्या अधिकाऱ्यांना ११ बारबालांसह मंगळवारी रात्री अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हे सारे अधिकारी सहार आंतरराष्ट्रीय विमानतळावरील असून त्यात १२ कस्टम सुप्रिंटेंडंट व १० इन्स्पेक्टरांचा समावेश असून सर्वांना जामिनावर सोडण्यात आले....कस्टम अधिकाऱ्यांच्या या 'पराक्रमा'ची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली. सुप्रिंटेंडंट रवींद कदम यांनी दिलेल्या सूचनेनुसार लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे इन्स्पेक्टर सुदार दरेकर, सहायक इन्स्पेक्टर ए. डी. फडतरे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २५ पोलिसांचे पथक मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास 'ताज कॉटेज' वर धडकले तेव्हा बेधुंद होऊन, अर्धनग्न अवस्थेत नाचणारे अधिकारी त्यांना पाहायला मिळाले. त्यातील एका कस्टम अधिकाऱ्याकडे ५५ हजार रुपये, तर दुसऱ्या अधिकाऱ्याकडे २५ हजाराची रोकड होती. त्यापैकी ५२ हजार रुपयांची रोकड त्यांनी बारबालांवर उधळल्याचे फडतरे यांनी सांगितले....आता ही बातमी पाहीली तर ठिक वाटेल... पण त्या पुढे जाऊन यातील सर्व अधिकार्यांची नावे नंतरच्या बातमीत जाहीर केली आहेत. त्यामुळे विशेष करून प्रश्न पडले:
- सर्व प्रथम वर वर्णन केलेली पार्टी आणि त्यातील अधिकार्यांचे वर्तन हे नैतिकतेच्या दृष्टीने कदाचीत चुकीचे असेल. त्यांनी नक्की काय केले हे अजून सिद्ध न झाल्याने "कदाचीत" म्हणत आहे. पण म्हणून पोलीसांना तसे अटक करण्याचा हक्क आहे का?
- हे कस्टम अधिकारी इतर सर्व सरकारी अधिकार्यांप्रमाणे स्वतःच्या "पॉवरच्या" रेशो मध्ये भ्रष्ट असतीलही... पण हे वरील वर्तनातून सिद्ध होते का?
- इतर अशा किती ठिकाणी धाडी घातल्या जातात?
- त्याहूनही महत्वाचे जो पर्यंत असले आरोप हे "कथीत" असतात, तो पर्यंत त्यांचे नाव, गाव, वय आणि काही बाबतीत रहातात ती सोसायटी जाहीर करणे योग्य आणि त्याहूनही महत्वाचे कायदेशीर आहे का?
- अशी नावे सिंहगडला पकडलेल्या मुलांची तरी जाहीर केली गेली होती का?
वाचने
11219
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
योग्य असो वा अयोग्य...
अगदी
In reply to योग्य असो वा अयोग्य... by कोलबेर
सुप्त आनंद झाला - मलाही
सुप्त आनंद +१
जो पकडला
सुधार-सल्ला
In reply to जो पकडला by सुचेल तसं
माझी उत्तरे
+१ आम्हाला
In reply to माझी उत्तरे by प्रकाश घाटपांडे
पोलिसी घाटपांडे
In reply to माझी उत्तरे by प्रकाश घाटपांडे
अंतर्गत हेवेदावे
सहमत
In reply to अंतर्गत हेवेदावे by सुनील
मद्यपान
In reply to सहमत by विकास
असे कोणीच म्हणत नाही...
In reply to मद्यपान by मराठी_माणूस
पटते आहे
In reply to असे कोणीच म्हणत नाही... by विकास
अत्यंत योग्य
हा गुन्हा होउच शकत नाही.
भ्रष्टाचार आणि नैतिकता
पोलीसांना
तुम्ही काय
अक्षम्य निर्लज्यता
बदनामीचा हेतू कळला नाही.
श्रमपरिहाराची पार्टी
आरोप सिद्ध होईपर्यंत....
In reply to श्रमपरिहाराची पार्टी by आनंद
आरोप सिद्ध
In reply to आरोप सिद्ध होईपर्यंत.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीबद्दल धन्यवाद !!!
In reply to आरोप सिद्ध by आनंद
केवळ नावे
In reply to माहितीबद्दल धन्यवाद !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आनंद!
संशयिताचे नाव प्रसिद्ध करणे - तोटे
चांगले मुद्दे आणि उदाहरण
In reply to संशयिताचे नाव प्रसिद्ध करणे - तोटे by धनंजय
अवांतर पण सांगितलेच पाहिजे.
बारबाला विरुद्ध कस्टम अधीकारी...
लॅपटॉप
लॅपटॉप
In reply to लॅपटॉप by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गूड पॉइंट!
त्या मुली
पोलिसानि