लेखनामागची प्रेरणा: समाप्त...
"मिरर मिरर ऑन द वॉल, हू इज द फेअरेस्ट ऑफ देम ऑल !!"
'हिमगौरी आणि सात बुटके ' या कथेतील दुष्ट राणीचे हे वाक्य आपल्याला आठवत असेलच.
प्रत्येकाला वाटत असते की असं विचारल्यावर आरशाने उत्तर द्यावे तूच सगळ्यात सुंदर म्हणून...
पण आपण जर स्वत:लाच हा प्रश्न विचारला तर काय उत्तर येईल,
आपण असू सगळ्यात छान..चांगले...फेअर ??
आपल्या रोजच्या जगण्यात माणूस अनेक मुखवटे सोबत वागवत फिरत असतो.
जशी समोरची व्यक्ती किंवा परिस्थिती त्यानुरूप मुखवटे बदलण्यात तो तरबेज असतो.
मात्र या मुखवट्याआडचा खरा चेहरा वेगळाच असतो, त्याचे अनेक पैलू असतात,
जे तो इतरांसमोर आणू इच्छित नाही,जे फक्त त्यालाच माहीत असतात.
थोडक्यात आपण इतरांसाठी वेगळे असतो आणि प्रत्यक्षात वेगळे.
अर्थात यावर कोणी म्हणू शकेल की असं काही नसतं, मी जसा आत आहे तसाच बाहेरही,
पण ते तितकसं खरं नाही हे त्यालाही माहीत असतं.
इथे व्हॉटसएप वर फिरणाऱ्या एका विनोदाचे उदाहरण देता येईल, 'सोशल मिडिया वरील प्रोफाईल फोटो
हे बऱ्याचदा आपले मुखवटे असतात आणि आधार कार्डवरील फोटो हे प्रत्यक्षातले आपण असतो '
इतरांसमोर आपली स्वच्छ सुंदर प्रतिमा यावी असा सगळयांचा अट्टाहास असतो, पण मनाच्या आत, खोलवर
आपली एक काळी बाजू आपण लपवून ठेवलेली असते, जी कधी कोणासमोर येऊ नये यासाठी सतत आपली धडपड सुरू असते. (इथे काळा रंग नकारात्मक या अर्थाने वापरला आहे, कोणताही वर्णद्वेष इ.त्यात अभिप्रेत नाही)
मात्र इतरांपासून कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी स्वत:पासून कोणी लपू शकत नाही, किंवा काही लपवूही शकत नाही..
मग आपण द्वेष करत राहतो आपल्यातीलच या काळया बाजूचा, जी सावलीसारखी सतत आपल्या अवती-भोवती, टोचत, छळत, फिरत राहते. अर्थात इथे पर्याय असतो झाले गेले विसरून नव्याने सुरुवात करण्याचा,
पण कितीही घासून पुसून लख्ख केलं तरी पाटीवरील खडूचा पांढरा थर जसा पूर्णपणे कधीच जात नाही,
तसंच काही गोष्टी अशा असतात ज्या मनातून कधीच बाहेर पडत नाहीत, कायम घर करून तिथेच राहतात....
आपण आरशासमोर उभे राहतो तेव्हा त्यात दिसणारी प्रतिमा आपल्याला पूर्णपणे आवडली की आपण खूश होतो,
तसे जर मनाच्या आरशात डोकावून पाहिले तर आपल्याच आतील काही नकोशा छटा आपल्याला अस्वस्थ करतात का ??
अशी आपल्यातील एखादी नकारात्मक बाजू मग ती कुठल्याही रूपात असेल जसे की एखादा न्यूनगंड, केलेल्या चुका, वाईट गोष्टी, स्वभावातील एखादा वाईट भाग, आपल्यामधील न आवडणारे काही इ. ते सर्व व्यक्त करून थोडं मोकळं होण्याचा हा एक प्रयत्न..सगळेच करून पाहू.
वाचने
15954
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरुवात स्वत:पासून,
@नीलमोहोर
In reply to सुरुवात स्वत:पासून, by नीलमोहर
@ मांत्रिक
In reply to @नीलमोहोर by मांत्रिक
मि. डार्सी.
In reply to सुरुवात स्वत:पासून, by नीलमोहर
हा हा !!
In reply to मि. डार्सी. by असंका
मी एक तर अकौंटंट तरी असतो
In reply to हा हा !! by नीलमोहर
:)
In reply to मी एक तर अकौंटंट तरी असतो by असंका
एक सांगायचं राहिलं,
In reply to सुरुवात स्वत:पासून, by नीलमोहर
थोडा फरक आहे
In reply to एक सांगायचं राहिलं, by नीलमोहर
हिरीरीने याला उत्तर देणार
In reply to थोडा फरक आहे by पैसा
मान्य आहे ,
In reply to थोडा फरक आहे by पैसा
टू ओपन अप
In reply to थोडा फरक आहे by पैसा
सहमत आहे
In reply to टू ओपन अप by सूड
दुसऱ्यानं तिसऱ्या व्यक्तीवर
In reply to सहमत आहे by पैसा
@ पैसाताई
In reply to सहमत आहे by पैसा
:)
In reply to @ पैसाताई by नीलमोहर
:)
In reply to :) by पैसा
...
In reply to सहमत आहे by पैसा
@ सूड
In reply to टू ओपन अप by सूड
'आपण चांगले तर जग चांगले' असा
In reply to @ सूड by नीलमोहर
@ सूड
In reply to 'आपण चांगले तर जग चांगले' असा by सूड
आणि हे सर्वांसाठीच,
In reply to @ सूड by नीलमोहर
(मिसळ्पावच्या 'लिहीते व्हा'
In reply to आणि हे सर्वांसाठीच, by नीलमोहर
लिहीते व्हा सांगितलंय; लिहीते
In reply to (मिसळ्पावच्या 'लिहीते व्हा' by सूड
कोणालाही, कसलाही, आग्रह कशासाठीही नाही.
In reply to लिहीते व्हा सांगितलंय; लिहीते by मनीषा
आणि कोणी पुष्कळ आग्रह करेल
In reply to कोणालाही, कसलाही, आग्रह कशासाठीही नाही. by नीलमोहर
धन्यवाद :)
In reply to आणि कोणी पुष्कळ आग्रह करेल by सूड
खफवरच्या सार्वजनिक विनंतीला
In reply to धन्यवाद :) by नीलमोहर
:)
In reply to खफवरच्या सार्वजनिक विनंतीला by सूड
हे आवडलं,
In reply to आणि हे सर्वांसाठीच, by नीलमोहर
मिपावरील सच का सामना
In reply to एक सांगायचं राहिलं, by नीलमोहर
धन्यवाद..
In reply to मिपावरील सच का सामना by मारवा
नीलमोहर जी तुमची सौम्य शैली सहजता खुप भावली !
In reply to धन्यवाद.. by नीलमोहर
मनापासून केलेल्या आवाहनाला
In reply to नीलमोहर जी तुमची सौम्य शैली सहजता खुप भावली ! by मारवा
@ मारवा,
In reply to मनापासून केलेल्या आवाहनाला by नीलमोहर
मारवा...
In reply to नीलमोहर जी तुमची सौम्य शैली सहजता खुप भावली ! by मारवा
खूप सुरेख लेख/ विचार. मनाच्या
" मिरर मिरर ऑन द वॉल, हूज द
धन्यवाद !!
In reply to " मिरर मिरर ऑन द वॉल, हूज द by मनीषा
ही कथा जरी बालकथा असली तरी
In reply to धन्यवाद !! by नीलमोहर
सुंदर लेख.
१००% सह्मत,
In reply to सुंदर लेख. by एस
छान लेख
+1. चुका झाकण्यापेक्षा वेळेत मान्य करणं म्हणजे जगणं सोपं करणं
हाहा!
In reply to +1. चुका झाकण्यापेक्षा वेळेत मान्य करणं म्हणजे जगणं सोपं करणं by बहुगुणी
नेहमी खरं बोललं की कधी कुठे
In reply to हाहा! by पैसा
@ बहुगुणी,
In reply to नेहमी खरं बोललं की कधी कुठे by सुबोध खरे
मुक्तक आवडले
स्तुत्य प्रयत्न.(एक पौराणिक
माझी खंत
आपण कुणाला मारलं वगैरे असणं
In reply to माझी खंत by श्रीरंग_जोशी
नक्कीच नाही
In reply to आपण कुणाला मारलं वगैरे असणं by असंका
@ श्रीरंगजी,
In reply to नक्कीच नाही by श्रीरंग_जोशी
काही नाही बरेच
In reply to @ श्रीरंगजी, by नीलमोहर
मुक्त आणि स्वच्छ चिंतन +
@ स्नेहांकिता ताई,
In reply to मुक्त आणि स्वच्छ चिंतन + by सस्नेह
भावले
आपण जे
लेख स्तुत्य आहे पण...
लेख वाचला.आरसा हातात घेऊन
सार्वजनिक संस्थळ अशा
In reply to लेख वाचला.आरसा हातात घेऊन by अजया
+१
In reply to लेख वाचला.आरसा हातात घेऊन by अजया
धन्यवाद,
In reply to +१ by बोका-ए-आझम
नमस्कार ताई! तुम्ही सूड आणि
@ मांत्रिक
In reply to नमस्कार ताई! तुम्ही सूड आणि by मांत्रिक
धन्यवाद!
In reply to नमस्कार ताई! तुम्ही सूड आणि by मांत्रिक
खरे आहे.
In reply to नमस्कार ताई! तुम्ही सूड आणि by मांत्रिक
मस्त
हा धागा मुक्तपिठीय वळन घेइल
:)
In reply to हा धागा मुक्तपिठीय वळन घेइल by द-बाहुबली
म्हन्जे बाकी काहीच फरक नाही?
In reply to :) by नीलमोहर
अवांतर - या नितांतसुंदर
:)
In reply to अवांतर - या नितांतसुंदर by आनन्दा
रोचक विषय...