हा विषय बऱ्याच दिवसांपासून मनात घोळतोय याचे कारण म्हणजे ह्या दोन्ही गोष्टींचा संदर्भ गेले बरेच दिवस कोणा ना कोणाबरोबर तरी बोलण्यात येतोच आहे आणि योग्य अशी कारणमीमांसा सापडत नाहीये. याच विषयाला अनुसरून मी एका व्याख्यानाला देखील हजेरी लावली होती परंतु त्या वक्त्यालाही या दोघातला फरक तितकासा उलगडून सांगता नाही आला.कदाचित ह्या एका नाण्याच्या दोन बाजू देखील असतील.
आपल्याला आपल्या स्वतःविषयी वाटतो तो अभिमान, दुराभिमान की आत्मसन्मान हे नक्की कसे ठरवावे? याला काही निकष आहेत का? या सगळ्यांची सीमारेषा खूप धुसर आहे आणि ती काही केल्या शब्दात पकडता येत नाहीये. आपल्याला वाटणारा अभिमान दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला आपला दुराभिमान वाटू शकणार नाही कशावरून ? तो तसा नाही हे आपण कसे पटवून देऊ शकतो ?
एखादा वाद विकोपाला जाण्याचे प्रमुख कारण म्हणजे समोरची व्यक्ती आपल्याला हवे तसे न वागता तिला जे पटेल तेच वागते त्यामुळे मग स्वाभाविकच ती आततायी, आढ्यतेखोर किंवा मनमानी आहे असा शिक्का मारला जातो. परंतु त्या समोरच्या व्यक्तीला मात्र तसे वाटत नसते कारण तिच्या जागी तीच बरोबर असते. ह्यातून मग मूळ मुद्दा बाजूला पडून दोघांचेही एकमेकांशी भावनिक पातळीवर युद्ध सुरु होते आणि ह्यात होणाऱ्या आघातांनी होणाऱ्या जखमा कायमस्वरूपी राहतात.
उदाहरणस्वरूपी एक नमुना पाहूया: अ ह्या व्यक्तीचे ब ह्या व्यक्तीशी लग्न झाले आहे. अ ला वाटतंय की ब ने त्याच्या मनासारखं वागावं पण अ हे मान्यच करायला तयार नाही की आपल्यातही काही गुण दोष असू शकतात ज्याचा त्रास ब ला होतोय.त्याच्या मते तो कायमच बरोबर आहे आणि तो स्वताचा आत्मसन्मान जपतोय. जो काही कमीपणा आहे तो ब मधेच आहे किवा ब ने तो मान्य करावा असा अ चा आग्रह आहे. ह्या ठिकाणी अ चा दुराभिमान आहे ही गोष्ट स्पष्ट आहे परंतु कालांतराने सततच्या टीकेमुळे ब ही एक तर पेटून उठू शकते किंवा सगळंच सोडून देऊ शकते. ह्या ठिकाणी पुन्हा अ सगळं ब मुळेच झालंय असा शिक्का मारून मोकळा होतो. अशा परिस्थितीत नक्की ब ने अ बरोबर कसं वागावं जेणेकरून त्याला त्याच्या गैरवागणुकीची जाणीव होऊ शकेल ?
वाचने
8164
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
अ ब ब !
क आल्यावर सगळे ठीक होते हो.
"वो" ?
In reply to क आल्यावर सगळे ठीक होते हो. by आनन्दा
त्यांना क 'झाल्यावर' म्हणायचे
In reply to "वो" ? by चित्रगुप्त
इथे क चा संबंध नाहीये.....
In reply to त्यांना क 'झाल्यावर' म्हणायचे by सतीश कुडतरकर
प्रतिसाद प्रचंड आवडेश
In reply to क आल्यावर सगळे ठीक होते हो. by आनन्दा
जागा पकडुन ठेवली आहे..
थोडा तिक्कडे सरक जेप्या...,मी
In reply to जागा पकडुन ठेवली आहे.. by जेपी
जेप्या? जेSssप्या? बाबुभाई से
In reply to थोडा तिक्कडे सरक जेप्या...,मी by अत्रुप्त आत्मा
जेप्या ?जेSssप्या?>>>
In reply to जेप्या? जेSssप्या? बाबुभाई से by कॅप्टन जॅक स्पॅरो
ये रामलाल कौन है?
In reply to जेप्या ?जेSssप्या?>>> by जेपी
गली का कुत्ता!
In reply to ये रामलाल कौन है? by प्यारे१
शांत बसा रे जरा
In reply to जेप्या ?जेSssप्या?>>> by जेपी
धन्स नाखुकाका.
In reply to शांत बसा रे जरा by नाखु
लग्नातच नाही, तर मैत्रीतही हे
+१
In reply to लग्नातच नाही, तर मैत्रीतही हे by स्वप्नांची राणी
प्रथमदर्शनी माझ्या मनात असा विचार येतोय .....
सूसन्वाद
नाही हो.
In reply to सूसन्वाद by gogglya
नक्की काय घडलंय ?
म्हाळसा आणि भानू मुले
त्याच्या मते तो कायमच बरोबर
साधं उत्तर आहे....
जसे की …
In reply to साधं उत्तर आहे.... by वेल्लाभट
एक वर्षापूर्वी लग्न
धक्का तन्त्र वापरावे
शब्दच्छल का बोच?
माप, उत्तर तूच दिलं आहेस.
दुराभिमान विरुद्ध अभिमान होइल
आणि अ ला ब नकोच असेल तर?
चूक की बरोबर
स्वाभिमान, दुराभिमान वगैरे …