Skip to main content

साउंड सिस्टीम शो ऑफ करण्यासाठी उत्तम गाणी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 28/01/2015 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
मला कल्पना नाही इथे किती ऑडियोफाइल मंडळी आहेत. किंवा कितींना मोठ्ठ्या आवाजात गाणी ऐकायला/ऐकवायला आवडतात. पण कॅजॅस्पँचा धागा वाचताना व त्यावर प्रतिसाद देताना कल्पना आली की या विषयी एक वेगळा धागा काढू. अर्थातच मला गाणी मोठ्याने ऐकायला आवडतात. मुझिक सिस्टिम आवडीचा विषय. असो. तर फुल टू दणदणाट करून तुमचे गाडितले किंवा घरातले स्पीकर/वूफर शो ऑफ करण्यासाठी माझ्या पसंतीची गाणी खालीलप्रमाणे. सॅडनेस - एनिग्मा आजा वे माहिया - इमरान खान मरहबा - जानशीन मधलं बार्बी गर्ल - अ‍ॅक्वा आय वॉन लव यू - अ‍ॅकॉन टेम्परेचर - शॉन पॉल मिस्टिरियस गर्ल - पीटर अँड्रे डायमंड्स - रिहाना मिस्टर सॅक्सोबीट - अलेक्झांड्रा स्टॅन बिकमिंङ इनसेन - इन्फेक्टेड मशरूम बारटेंडर - अ‍ॅकॉन (अ‍ॅकॉनची बरीचशी मस्त आहेत. अगदी छम्मक छल्लो सुद्धा) व्हेअर'ड यू गो - फोर्ट मायनर इन स्टिरियो - फोर्ट मायनर हिमेश गुरुजींना वगळलंच मुद्दाम. मी काय लिहिणार त्यांच्या गाण्यांबद्दल. अनेक गाणी आहेत, पण आत्ता आठवली ही इतकी लिहिली. बाकी धागा वाजत; आय मीन वाढत राहील अशी अपेक्षा. म्हणजे कसं कलेक्शन वाढवायला बरं.

वाचने 78742
प्रतिक्रिया 176

प्रतिक्रिया

कदाचित विश्वास बसणार नाही पण.. तम्मा तम्मा लोगे - बप्पीदा. धिधा धिधा धिधा असा जो दणक्यात तीनदा ड्रम वाजतो आणि मग जे काही साउंड इफेक्ट्स येतात ते बंद हार्टलाही चालू करतील. शिवाय बॉन जोव्ही - "इन दीज आर्म्स" हे गाणं अत्युत्कृष्ट साउंड सिस्टीमवर आवर्जून मोठ्या आवाजात ऐकण्यासारखं आहे. किती किती वेगवेगळे पॅटर्न्स आहेत त्याच्या बॅकग्राउंडला. बेस गिटारचा ट्रॅक पकडायचा आणि तोच फोलो करत एकदा ऐकायचं.. मग दुसरी कोणतीतरी लय पकडून.. धाग्याचा विषय आवडला. ही गाणी तथाकथित उच्च दर्जाची, सुरेल , गोड किंवा समाजमान्य असतीलच असं नाही, पण दणदणाटी साउंड सिस्टीमला न्याय देणारी असतात. तो बसक्या आवाजाचा लांब केसवाला मायकेल बोल्टनच ना? "कॅन आय टच यू देअर" वाला ?!! खूप वर्षं झाली. हवा भरुन फुल्ल व्हॉल्यूममधे ते गाणं ऐकल्याला. एकदम बसका आवाज बेकार. पण मस्त वाटतं ऐकताना.

In reply to by गवि

तम्मा तम्मा गवी क्या बात कही हे घ्या तम्मा चे लाइव रेकोर्डिग त्यावर एक आख्खा लेख येऊ शकतो. विविध वयोगटातील स्त्री पुरुषांचा कोरस रंगात आलेले बप्पीदा गोड गळ्याची अनुराधा

In reply to by निनाद मुक्काम …

गाने मणातले ऊपट्सुम्भ - Tue, 23/09/2008 - 21:15 तू प्रेमि ..... आ .......हा .... मै प्रेमि ....... आ ~~ह्हा... फिर कया डॅडी क्या अम्मा ............... ईक बस तू ही ..... प्यार के काबील ... सारा जहा है निकाम्मा ........ ... ... तम्मा तम्मा लो गे ....... ..... तम्मा तम्मा लो गे ...तम्मा :))))

In reply to by निनाद मुक्काम …

तम्मा तम्मा माझ्या फेवरेट गाण्यांपैकी एक. लाईव रेकॉर्डिंग पहाताना फारच मजा वाटली. भलतेच वेंजॉय केले. पैजारबुवा,

"ब्रिगेडियर सबारी", "लिक इट", "बॉन जोव्ही- डेड ऑर अलाईव", "यंग गन्स - ब्लेझ ऑफ ग्लोरी", "ब्लाईंड मेलन- नो रेन" हेदेखील सुचवून पाहतो.

माझी आवडती गाणी १) वु आर द वर्ल्ड वु आर द नेशन - मायकल जॅक्सन २) वेलकम टु दि हॉटेल कॅलिफोर्नीया- माहित नाही ३) वन मोअर टाईम - ब्रिटनी स्पीअर ४) ब्राझील - वेंगा बॉईज ५) सुझेना आय एम क्रेझी लव्ह इन यु- माहित नाही ६) मरिहा कॅरीची सगळी यॉडलींग असलेली ७) ला इसला बोनिटा - मडाना ८) हील द वर्ल्ड - मायकल जॅक्सन ९) बॅड / डेंजरस - मायकल जॅक्सन अजुनही बरीच आहेत आठवली की अ‍ॅडवतो रे अपुर्व.

In reply to by प्रमोद देर्देकर

हील द वर्ल्ड.. आहा. माजॅची आठवण काढलीत म्हणून.. विल यू बी देअर. दे डोंट रियली केअर अबौट अस गिव्ह इन टु मी. .... तुमच्या गाळलेल्या जागा: हॉटेल कॅलिफोर्निया हे ईगल्स या ग्रुपचं गाणं आहे. सुझॅना हे "आर्ट कंपनी" नावाच्या बँडचं गाणं आहे. तुमची प्लेलिस्ट झकास आहे.

ए आर रहमानचे "दिल है छोटासा " वाजवून पहा लो फ्रेक्वेन्सी च्या कित्येक नोट्स ची नजाकत समजून येईल तेही बास चा तोरा न मिरवता. ए आर रहमानची काही गाणी उदा: आवारा भवरे जो होले होले गाये, इश्क बीना क्या जीना यारो आणि विशेषतः मधुबन मे जो कन्हैया किसी गोपीसे मिले, या गाण्यातील मिक्सींगची मजा अनुभवण्यासाठी जरूर ऐका. जुन्या गाण्यापैकी "प्यार मे मे दिलपे मार दे गोली" हे गाणे ( चित्रपट :महान ) हे गाणे त्यातील गोळीचा आवाज ऐकण्यासाठी ऐका. अक्षरशः गोळी या कानातून त्या कानात आरपार जाताना अनुभवायला मिळते. नव्यापैकी "मनाली ट्रान्स " ऐकायचे धाडस होत नाही. पण लो वॉल्यूम वर ऐकायला मजा येईल.

In reply to by विजुभाऊ

ए आर रेहमान च्या गाण्यामध्ये एखादा स्पेशल मुसिक पीस अस्तोच. जोधा अकबर मधला "मनमोहना " गाणं ऐकलय?? त्यातली शेवटची बासरीची धून केवळ अप्रतिम .

धन्यवाद गवि साहेब. मला कॉलेजला जाण्याच्या दिवसांत वेळातच जी काही गाणी तेव्हा एम टीव्ही वर लागायची तीच काय ती करमणुक. यात पहिले हिंदी गाणं प्रसिध्द झाले ते बाबा सैगलचं "दिल धडके". मग अक्षय खन्ना व्हीजे असताना आणखीन इंग्लीश गाण्याची आवड निर्माण झाली. त्यात मायकल जॅ. सर्वात प्रथम क्रमांकावर. त्याच्या बरोबर गाणी गायला यावीत म्हणुन मी त्या गाण्याचं पुस्तकही आणलं होतं त्यात निवडक २५ गाणी होती. सगळी तोंडपाठ झाली. आणि मग जॉर्ज मायकल, ब्रिटनी स्पियर, मरिहा कॅरी, वेंगा बोईज, त्यानंतर जेनिफर लोपेझचं "Ain't It Funny" ने वेड लावले. शेवटचे एकले ते रिकी मार्टिनचे "Livin' La Vida Loca" तेव्हा पासुन कोणतीच इंग्लीश गाणी ऐकाविशी वाटत नाहीत. इन्स्ट्रुमेंटलमध्ये एक केनीजीची (Kenny G)फ्लुट रात्रीच्या शांत वातावरणात लावावी काय मस्त फिल येतो.

In reply to by प्रमोद देर्देकर

रिकी मार्टिनचे "Livin' La Vida Loca" बद्दल तीव्र सहमती.माझी पण प्ले लिस्ट टाकतेच.या गाण्याबाबत वाचुन न राहावुन कामात असताना लिहुन जातेय!

अरे हो मराठीत " अप्सरा आली " ऐका स्टीरीओची मजा काय असेल ते अनुभवायला मिळेल. आणि र्‍हदयनाथ मंगेशकरांची " चला वाही देस" अख्खी रेकॉर्ड ऐकण्यासारखी आहे.

In reply to by विजुभाऊ

फर्नांडो... नॉस्टाल्जियाचे मोहोळ फोडलेत विजुभौ.. वैट्ट आहात. कॅन यू हियर द ड्रम्स फर्नांडो..म्हणताना मागे जे ड्रम वाजतात ते.. अ‍ॅबाच्या "आय डू आय डू आय डू" ने कायतरी वेगळ्या जमान्यात पोचल्याचा भास होतो.. "निना प्रेटी बॅलेरिना"ही तसंच.

एम्पईथ्री किती केबीपीएसची आहे त्यावर आवाजाची स्पष्टता आणि बारकावे असतात ना? हा त्या एमपीथ्रीचा फ्लो रेट किंवा इमेजच्या रिझोल्यूशनसारखा भाग असतो का? म्हणजे तितके बाईट डेटा प्रत्येक सेकंदासाठी दिलेला असतो ?

In reply to by गवि

320 बिटरेट वाली एमपी३ पुरेशी क्लरिटी देते. १२८ वाली तितकी नाही. साभ्यस्ती हा फरक कळणारही नाही पण हाय फ्रिक्वेन्सी साउंड जसं की सिम्बल, किंवा झांज इत्यादी याकडे लक्ष दिलं तर कळू शकेल

"शान"मधील दोस्तोंसे हे गाणे आवडले होते ऐकले म्यु.सि. वर (अर्थात मित्राच्या)

१. The Shruti Box मधल Nadia २. I'm Shipping Up To Boston - Dropkick Murphy (गिटार नाद्या बाद आहे) ३. Ian Ritchie - Lonely Planet Theme (बरीच variety आहे)

Poets of the fall Lincin park nickelback यांच कुठलंही गाणं . आणि मग रेहमान . . आणि किंवा मग सरळ "माझे माहेर पंढरी " लावा . तेवढेच खुश करून गेले . तर साउंड सिस्टीम साउंड आहे

In reply to by अद्द्या

पोएट्स ऑफ द फॉल आणि लिंकीन पार्क बद्दल सहमत. ह्यामधे सिस्टीम ऑफ अ डाऊन, फोर्ट मायनर आणि ग्रीनडे पण अ‍ॅड करा माझ्या बाजुनी :)

कोक स्टुडियोतील काही निवडक गाणी पाकिस्तानमधल्या को.स्टु मधील आबिदा - निगाह-ए-दरवाईशां बुल्लेया जुगनी या तीन गाण्यांनी तुम्हाला ट्रान्स मधे 'नाय' नेलं तर सांगा. आपल्या कोक स्टुडियोतील ज़रिया - ए आर रेहमान (एकच कल्ला गाणं) सुंबरान - नंदेश उमप

In reply to by आदूबाळ

@ आदुबाळः- अहो मग cooltoad1.com ला जावुन बघा नक्की चालेल ती साईट. सगळ्या भाषेतील गाणी आहेत त्या साईटवर.

In reply to by आनन्दिता

या बाबतीत अगदी बाडिस हो.. मी तर ऐकल्यावर येता जाता सगळ्यांना ऐकवत होतो. (बायको वैतागली होती ऐकून ऐकून ;) )

मोठ्ठ्या आवाजातच ऐकायला मस्त असं सूफी गाणं. सूफी म्हणा, उपशास्त्रीय म्हणा.... माहीत नाही. पण आबिदाचा आवाज आणि गायकी वेड लावते. गाण्याचं नाव - रांझण (मेंडा दिल रांझण रावल मंगे) रांझा रांझा करदी ..नव्हे. झांज कसली वाजते समेवर..... आहाहा !

१. वी विल रॉक यु ---क्वीन्स २. हॉटेल कालीफोर्निया - इगल्स ३. इट्स बिन हार्ड डेज् नाईट - बीटल्स ४. बोहेमियन ऱ्हांप्सोडी, डा हस्त ५. पापा डोंट प्रीच, अमेरिकन लाइफ - मडोना ६. स्वे विथ मी - डीन मार्टिन ७. स्ट्रेंजर्स इन द नाईट - फ्रांक सिनात्रा ८. आय कान्ट गेट यु औट ऑफ माय हेड - कायली मिनोग ९. व्हेनेव्हर व्हेरेवर, धिस टाईम फोर आफ्रिका -- शकिरा १०. उप्प्स आय डीड इट अगेन - ब्रिटनी स्पिअर्स ११. आय म कमिंग उप, सो बेटर गेट दिस पार्टी स्टार्तेड -- पिंक १२. बेबी टोक टू मी - जेनिफर लोपेझ . . … क्रमश:

गवि, आबाचं " द विनर टेक्स इट्स ऑल" ऐकले असेलच. आणखी "मामा मिया ,पीपल नीड होप.." वगैरे वर लिहुया का एकदा

In reply to by विजुभाऊ

गवि, आबाचं " द विनर टेक्स इट्स ऑल" ऐकले असेलच.
माझ्या मते, गविंचा (की वल्लींचा?) एक अख्खा लेख या गाण्यावर वाचल्याचं स्मरतंय.. :)

In reply to by हाडक्या

वल्ली? तो औरंगजेब कसला लिहितोय गाण्याविषयी!? हां वल्लीनं लिहिलंन तर एकाच गाण्याविषयी लिहील "गीत गाया पत्थरोंने" (हे गाणं नसेल तर चुभूदेघे) प्रासचा असेल तो लेख.

In reply to by गवि

औरंगजेब
अस्सं नका हो बोलू. बर्‍याच जणांचा फेवरिट आगोबा आहे तो. ;)
हां वल्लीनं लिहिलंन तर एकाच गाण्याविषयी लिहील "गीत गाया पत्थरोंने" (हे गाणं नसेल तर चुभूदेघे)
हा याबद्दल सहमत.

१३. व्हेन आय गेट ओल्डर …. वेव्हीन द फ्लाग ---के नान १४. उन दोस त्रेस … मारिया -- रिकी मार्टिन . . … क्रमश:

१५. ऑल नाईट ऑल राईट ---पीटर आंद्रे . … क्रमश:

१६. मस्ती की पाठशाला, चित्रलेखा (चोर चोर - ठीरुडा ठीरुडा (तमिळ)), तुमको टाडा --- ऐ आर रेहमान … क्रमश:

In reply to by पगला गजोधर

चित्रलेखा नाही हो. चन्द्रलेखा. (गाण्याचे नाव कोंजम कोंजम) पिक्चर तमिळ मध्ये थिरुडा थिरुडा. तेलुगु मध्ये दोंगा दोंगा.

१७. हाय रामा ये क्या हुआ, जान में दम --- ऐ आर रेहमान … क्रमश:

In reply to by पगला गजोधर

हाय रामा ये क्या हुआ गाण्यात मधे एक म्युझिक पीस आहे. वीणा, सतार, सरोद काय आहे ते सम्जत नाही, पण ए. आर रेहमान टच आहे.. निव्वळ अप्रतिम!!!

तोबा तेरा जलवा, तेरा इमोसनल अत्याचार --(चित्रपट: देव डी ) … क्रमश:

In reply to by पगला गजोधर

१९. धिस इज द एंड- स्कायफॉल - ऐडल २०. टायटल सॉंग - लॉ अन्ड ओर्डर (ओरीजनल ) , लॉ अन्ड ओर्डर (क्रिमिनल इंटेन्षण ) २१. टायटल सॉंग - शेरलॉक होल्म्स (ग्रेनाडा १९८७-९२) क्रमशः …

In reply to by पगला गजोधर

तोबा तेरा जलवा, तोबा तेरा प्यार …। तेरा इमोसनल अत्याचार --(चित्रपट: देव डी ) आर कोनतरी बोल्ला राव या गाण्यावर …. माझ्या अमेरिकन मित्रांना हे गान आईकावतो म्या…म्यारेज सॉंग म्हनून .

मलाही घरी मस्त निवांत असलो की जरा म्हणजेच मोठ्या आवाजात गाणी ऐकायला आवडतात. वर उल्लेख झालाय तसा सुफी गाणी आवडतात, (नुसरत फतेह अली तर लै म्हणजे लै भारी) ढोलकी आणि आवाज. कव्वाल्याही वाजवायला आवडतात. वादा करके न आना बहुत बुरी बात है, मैने मासुम बहारोमे तुम्हे देखा है. कैलाश खेर... असं बरेच काही. आवडीने लिहूच... छान धागा. धन्स. -दिलीप बिरुटे

कितने अरमाण माण माण माण.. जाने तेरे वास्ते सोणिये होले होले, मुझको याद सताये तेरी झांझरीया उसकी छनक गयी

अवोलनेशन चं सेल थ्रिफ्ट शॉप चं मॅकलमोअर डेव्हिड टवारे चं कॉल मी बेबी आर.आय.ओ चं शाईन ऑन अ‍ॅड्रियन सिना चं एन्जल अ‍ॅक्सेन्ट चं लव्हर्स क्राय शॉन पॉल - शी डजन्ट माईंड ही अप्रतिम अहेत.....

बेर्लिनचं 'टेक माय ब्रेथ अवे' किंबहुना ते गाणं असलेल्या टॉप गन चित्रपटातलं सगळंच संगीत आणि पार्श्वसंगीत. मी होम थिएटर बनवतेवेळी साउंड सिस्टम खरेदी करतांना त्या ऑडिओ स्पेशालिस्टने वेगवेगळ्या साउंड सिस्टममधील फरक दाखवतेवेळी हे म्युझिक वाजवून दाखवलं होतं आणि फरक कसा जाणायचा ते शिकवलं होतं...

In reply to by वेल्लाभट

एकाच आल्बममधे सर्वच्या सर्व साउंडट्रॅक्स उत्कृष्ट असल्याची दुर्मिळ उदाहरणं असतात. टॉप गन त्यापैकी. थ्रू द फायर.. माइटी विंग्ज .. ही तर जबरदस्त फायरी गाणी आहेतच.. टेक माय ब्रीथ अवे हे सॉफ्ट पण ताकदीचं गाणंही आहे, आणि प्लेइंग विथ द बॉईज हे वेगळ्याच मूडचं गाण.. तेही फेवरिट.

In reply to by गवि

लिंकिन पार्क- मेटीओरा लिंकिन पार्क- मिनिट्स टु मिडनाईट लिंकिन पार्क- हायब्रिड थिअरी ---

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

लिन्किन पार्क सोबत मेटालिकाचं द डे दॅट नेव्हर कम्स.. कोल्डप्ले - मेसेज, अ रश ऑफ ब्लड टू द हेड, अ व्हिस्पर, क्लॉक्स , द साईंटिस्ट एमिनेम - मॉकिंग बर्ड ब्लॅक आईड पीज - डोंट स्टॉप द पार्टि ग्रीन डे - बोलिवर्ड ऑफ ब्रोकन ड्रीम्स, वेक मी अप व्हेन सप्टेंबर एन्ड्स कॉर्न - कमिंग अनडन, समबडि समवन, फ्रीक ऑन लिश मेटालिका - फ्रँटिक, शूट मि अगेन, आई डिसअ‍ॅपिअर आयर्न मेडन - ब्लड ब्रदर्स रॅमस्टेन - फ्युअर फ्रै (नीट वाचताच येत नै यान्चि नावं) .. नुकतीच आइबॉल तरंग २.१ घेतली.. (कालच खरंतर).. निस्ता दणदणाट..

भारतीय गाणं जर हवं असेल तर "आया तेरे दरपे दीवाना". सिनेमाचं नांव आता आठवत नाही पण त्यात शहारूख खान आणि प्रीटी झिंटा होते. त्या गाण्यातल्या लो आनि हाय दोन्ही फ्रीक्वेन्सीज मस्त वाजतात!!!

In reply to by पिवळा डांबिस

हे आया तेरे दर पे बरं का, जरी चित्रपटात घेतलेलं असलं तरीही अहमद हुसेन मोहम्मद हुसेन यांची ही कव्वाली ऐकून बघाच. केवळ कमाल !

In reply to by वेल्लाभट

अ‍ॅक्च्युअली हे गाणं मी पहिल्यांदा माझ्याकडे एक सूफी गाण्यांचा सहा सीडीजचा अल्बम आहे त्यात प्रथम ऐकलं. मग ते हिन्दी चित्रपटातही पाहिलं. पण मला त्या सूफी आल्बमचं नांव पटकन न आठवल्यामुळे मी चित्रपटाचा रेफरन्स दिला.

ए र रहमान - रंगीला रे , मंगता है क्या ,उर्वसी उर्वसी , मुक्काला मुकाबला , चंद्रलेखा , दिलसे रे , जिया जले , छय्या छय्या , हम्मा हम्मा , तुहीरे , कहनाही क्या ,वंदे मातरम , ओ हमदम सुनियो रे . मराठी - झटकून टाक ती राख , अष्टविनायका तुझा महिमा कसा , प्रथम तूला वंदितो .

In reply to by अदि

ओ भँवरे देखो इन दीवानो को- दौड़, जय हो, रिंग रिंग रिंगा - स्लमडॉग मिलेनियर ही गाणी सुद्धा साउंड सिस्टम वार भन्नाट वाटतात. हा धागा काढल्याबद्दल धन्स. खूप आवडीचा विषय.

https://soundcloud.com/au5 ब्रेकिंग बॅड ह्या टीव्ही सिरीजचे रिमीक्स https://www.youtube.com/watch?v=nsYg1uXgdug त्याने केलेली बाकीचीही काही रिमिक्सेस ऐकण्याजोगी आहेत. deadMau5 ची गाणी.

१. जवानी जानेमन ===> नमक हलाल २. दम मारो दम्मा ====> हरे क्रुष्ण हरे राम ३. सुरु रु सुरु रु ===> तेरे बिन ४. थोडा दारू विच प्यार मिला दे ===> तेरे बिन ५. मेहबूबा ===> शोले ६. मैं चली मई चली ====> पडो़सन ७. दिलबर ==> कारवा (मला जरी हे गाणे आवडत असले तरी त्यावर्षीचे फिल्म फेयर अवार्ड मात्र "पिया तू अब तो आजा" हे कारवातीलच ह्या गाण्याला मिळाले. ८. सजना है मुझे ====> सौदागर (तद्दम फालतू सिनेमातील एक उत्तम गाणे) ९. आप जैसा कोई ===> कुर्बानी आणि हे सर्वोत्तम १०. दुनिया में ====> अपना देश

१. कभी तनहाइयों में युं हमारी याद आयेगी - या गाण्याची सुरुवातच जबरद्स्त आहे २. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है - एका कडव्यात १२ वेळा एकच आवाज रिपिट आहे बेकार लागते थेट काळजात ३. नाट्यगीतं विशेषतः ज्यात फक्त तबला आणि ऑर्गन / पेटी किंवा सारंगी आहे, - ४. निवडुंगची सगळी गाणी - वा-यानं हलते रान, तुझे सुनसान आणि (ती हिरॉईन कॉलिंग गवि). ५. रझिया सुलतान मधलं ऐ दिल ए नादान - स्रुरुवातीचा सायलेन्स, ऐकण्यासारखा सायलेंस. अजुन बरीच आहेत..

In reply to by ५० फक्त

होय रे पन्नासराव. काढलीस खपली..?! .. ..पुन्हा पुन्हा मनात खळबळ का माजवायची..? नकोतच त्या आठवणी :)

अरे वा वेल्ला तु पण अबिदाच्या गाण्याचा दिवाना आहेस तर? थोडी फार उपशास्त्रीय असलेली गाणी ऐकायला खुप बरी वाटतात. मागे एकदा गुलजार यांचे सुत्रधार (Anchor) असलेला कार्यक्रम मुंबईत झालेला त्यातली अबिदा परवीनची गाणी मला मिळाली फक्त पहिली दोन गाणी तर लाजवाब काय आवाज लागलाय १) सोऊ तो सपने सुनु - यामध्ये संतुर जबरद्स्त याला गुलजार यांच्या प्रस्तावनेतील काही ओळी अशा आहेत कबीर को पढते जाओ- परत खुलती जाती है. आबिदा को सुनते रहो- सूरत खुलती जाती है. ध्यान लग जाता है, इबादत शुरू हो जाती है, आँखें अपने आप बंद हो जाती है. कभी इन्हे सामने बठ के सुनें. आँखें खोलो तो बाहर मे नजर आती है, आँखे मुन्दो तो अंदर मे..' २) मन लागो यार फकिरी मे - या मध्ये ढोलकी/तबला मस्त याला प्रस्तावना करताना ते म्हाणाले की सूफियों का कलाम गाते गाते आबिदा परवीन खुद सूफी हो गयी. उनकी आवाज़्‍ा अब इबादत की आवाज़्‍ा लगती है. मौला को पुकारती है तो लगता है की हां, इनकी आवाज जरूर उस तक पहुचती होगी. वो सुनता होगा- सिदक सदाकत की आवाज़्‍ा. आबिदा कबीर के मार्फत पुकारती है उसे, हम आबिदा के मार्फत उसे बुला लेते है' आणि अजुन तिची " या अलि अलि" , "दमा दम मस्त कलंदर" ही तबला / ढोलकी साठि ऐकावीत. दुसरी अशीच गाणी धुम मचाले मध्ये रिचा शर्मा हिने गायली होती , तर मराठीतील सारेगमप मध्ये लहान मुलांच्यात प्रथमेशा लघाटे तर मोठ्यांच्यात मुरबाडचा कोणीतरी होता त्याने " देव विठ्ठाल तिर्थ विठ्ठल" मस्त गायलं होतं.