जुगाड
जुगाड ह्या शब्दाने आणि जुगाडू वृत्तीने सध्या थैमान घातले आहे ... बर्फाच्या लादीवरून अवजड मशीन खड्ड्यात उतरवणारा माथाडी कामगार वगैरे उदाहरणे ठीक आहेत ..
अपवादात्मक परिस्थितीत एखादी युक्ती वापरून मार्ग काढणे ह्या अर्थी जुगाड इतपत ठीक आहे पण ...
- रहदारीत वेडेवाकडे घुसणे
- खाद्य पदार्थांमधील भेसळ
- परीक्षेतील उघडकीस येणारे कॉपीचे नवनवीन प्रकार
- दैनंदिन कामातील कुणी पकडू नं शकणारी कामचोरी
- शक्य तितके कायदे / संकेत / नियम ह्यांचे आपल्याला सोयीस्कर अर्थ लाऊन वाटेल तसे वागणे
- हे आणि अजून बरेच
शब्दाखाली येणारे अनिष्ट / बेशिस्त वर्तनहे आपल्या समाजातील अनेक समस्यांचे मूळ आहे ... ह्या जुगाड शब्दाला अनावश्यक मिळणारी प्रतिष्ठा तर सोडाच त्याचे साधे कौतुकही नको अशी परिस्थिती आहे ... आधी जे नियम कायदे संकेत आहेत ते कटाक्षाने पाळायला शिकून तसे ते आचरणात आणून दाखवणाऱ्या व्यक्तीलाच मग त्यातील कच्च्या दुव्यांवरील बदल करण्याचा अधिकार असावा .... काय वाटते आपल्याला ?
वाचन
7424
प्रतिक्रिया
0