गेल्या काही लेखांमध्ये काही महत्वाचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न मी केला.माझी भाषा ,मांडणी आणि त्यातून मांडत असलेल्या विचारांचा कुठेतरी गोंधळ होतो आहे हे पाहिल्यानंतर समारोपाच्या ह्या लेखात काही मुद्दे परत तुमच्यासमोर ठेवत आहे.
१:दहावीचे मार्क आणि पुढची करीयरची वाटचाल याचा एकमेकांशी फारसा संबंध जोडू नये.दहावीचे मार्क एक इंडीकेटीव्ह मेझर आहे असे समजावे.पालक या मार्कांवर अनाठायी विश्वास ठेवून मुलांच्या मनावर आपल्या महत्वाकांक्षा लादण्याचा हट्ट करतात.
२:काही मुलांच्या मनात ९०% म्हणजे हुशार आणि म्हणून सायन्स हा गैरसमज भरवला जातो.
३:सरकारी कॉलेज वगळता इतर खाजगी संस्थांमध्ये व्यावसायीक शिक्षणाचा खर्च किती असतो याची पालकांना काडीमात्र कल्पना नसते.इंजीनीयरींग सुमारे आठ लाख आणि वैद्यकीय शिक्षणासाठी सुमारे विस लाख.हा खर्च येत्या तीन वर्षात दुप्पट होण्याची शक्यता आहे.तीन वर्षापूर्वी हाच खर्च निम्मा होता.
४: ९०%टक्के मार्क मिळवलेल्या मुलांना आणि पालकांना सरकारी जनरल कॅटेगरीतल्या जागा आणि त्यासाठी स्पर्धकांचं प्रमाण काय आहे याची कल्पना नसते.
५: सरकारी कॉलेज मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्या मुलांना आणि पालकांना अकरावीचे वर्षं विश्रांतीचे नाही.कायम सजग राहून मुलांनी अभ्यासाकडे आणि पालकांनी त्यांच्या वागणूकीकडे लक्ष ठेवून ती नवीन वातावरणात वाहवत जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
अकरावीत जर गुणवत्ता घसरली तर बारावीनंतर डोनेशन ची तयारी ठेवावी.सुमारे तीन ते तीस लाख.
वरील पाच मुद्दे आजूला बाजूला, नातेवाईकांमध्ये,पोहचवण्यासाठी तुम्ही काउंसीलर असण्याची गरज नाही.केवळ पोटतिडीकेपोटी हा कार्यक्रम मी बरीच वर्षे राबवीत आहे.माझा पोटापाण्याचा व्यवसाय सांभाळून.
माझे आधीचे आणि हा लेख वाचून आपल्यापैकी कुणिही हा कार्यक्रम करायचे ठरवले तर मी एका पायावर तयार आहे.आपण हे कार्य स्वताच केले तर फारच उत्तम.माझ्यासारखे शंभर प्रभू दिवसरात्र राबले तरीही ह्या समस्येचा फारच थोडा भाग काबूत येईल.शंभर कशाला दहा प्रभू या निवेदनातून तयार झाले तर ही लेखमालीका सफल झाली असे मी समजेन.एकदा का ही साखळीची क्रिया सुरु झाली की मग प्रभूंच्या लेखमालेची आवश्यकता संपेल पण तोपर्यंत आपलं भेटणं अनिवार्य आहे.
You can not reach people who do not want to be reached and people will reach you when the issue hits them hard.so raise the issue and forget about success rate.
Amen.
वाचन संख्या
3554
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली माहिती
सहज कळण्याजोगी
प्रभू साहेब... धन्यवाद!
प्रभूसाहेब,
माझ्या मते
inversly praportional... मराठी मधे "व्यस्त प्रमाण"
In reply to माझ्या मते by विदुषक
यावेळेस