माझा एक चरीत्रहीन मित्र आहे. त्याचा स्त्री विषयक अनुभव अतिशय सखोल असा आहे. परवाच्या आमच्या चर्चेतुन त्याने स्त्री स्वभावाचा एक वेगळाच पैलु उलगडुन दाखविला. तर झाले असे की त्याने नेहमीप्रमाणे एका स्त्री शी रीतसर सुत जुळवले......सर्व टप्पे ओलांडत तो आत्मविश्वासाने पुढे सरकु लागला. स्पर्श पायरीही गाठली.... आणि अचानक त्या स्त्री ने पुर्णपणे माघार घेतली आणि दहा मिनीटांचा सुचक स्पर्श सहन केल्यावर म्हणाली की तुम्ही जो स्पर्श केला ना खर तर तो मला अजिबात आवडला नाही. चरीत्रहीन मित्र अनुभवी असल्याने त्याने तात्काळ विषय संपवला. तर हे मला फ़ारच आश्चर्यजनक वाटले मी सात्विक संतापाने मित्राला विचारले की अरे जर तीला नव्हताच इंटरेस्ट तर विषय मुळात इतका वाढवलाच का आणि इतक्या वेळ स्पर्श तरी का चालवुन घेतला ? तर चरीत्रहीन मित्राने सांगितले ते असे की काही स्त्रीयांचा हा छंद असतो. अशा स्त्रीया अगोदर स्वत:हुन पुढाकार घेतात, समोरच्याला पुर्ण पागल करतात काही पाउले ही त्याला पुढे टाकु देतात. आणि मग अचानक त्याला नकार देतात माघार घेतात, व स्वत:च्या वैवाहीक नैतिकतेची समोरच्या पुरुषाला जाणीव करुन देतात. आणि तो कस चुकीच करत आहे इ. इ. त्याला पटवुन देण्याचा प्रयत्न करतात. पुरुष नवखा असेल तर तो गोंधळुन जातो त्याला काहीच कळत नाही की अरे आता तर मला छान प्रतिसाद मिळत होता अचानक असे कसे झाले ? तर या मागे एक फ़ार विशीष्ट अशी मानसिकता असते. तर या विषयी आमच्या चर्चेतुन जे काही मला उमगले ते मांडण्याचा प्रयत्न करतो.
एक सुंदर इंग्रजी शब्द आहे प्लॆटॉनिक लव्ह हा शब्द थोर तत्वज्ञ प्लेटो याच्या नावावरुन बनलेला आहे. याचा अर्थ होतो अशरीरी कृतिहीन प्रेम उदात्त प्रेम अथवा देवदासी निस्सीम वासनाहीन प्रेम. आणखी एक शब्द आहे प्लेटॉनिक टॉक म्हणजे कृतिहीन बोलणे याचा अर्थ नकारात्मक आहे जस कृतिहीन चर्चा (क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे) यावरील दोन शब्दावरुन मी एक नविन शब्द बनवला प्लेटॉनिक व्याभिचार तर याचा अर्थ असा की व्याभिचार हा नेहमीच कृती त व्यक्त होत नाही निव्वळ मानसिक पातळीवर ही अनेकदा व्याभिचार केला जात असतो. तर अशा स्त्रीया मानसिक पातळी वर च केवळ व्याभिचार करत असतात. मात्र कृती करणं त्या कटाक्षाने टाळतात म्हणजे कल्पनेच्या घोड्याला त्या बेलगाम उधळु देतात मात्र कृतीचा लगाम घट्ट हाती धरुनच. या स्त्रीयांना आपल्या मागे पुरुष पागल होतात ( वा आपण केव्हाही कुठल्याही वयात कुणालाही पागल करु शकतो) ही कल्पनाच प्रचंड एक्सायटींग असते. मात्र अर्थातच पुढची पायरी गाठण्याची त्यांची अजिबात तयारी नसते. असे का होते ? त्या अस का करतात ?
यामागे अनेक घटक कार्यरत आहेत, सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नेणीवेवरील नैतिकतेचा प्रचंड दबाव. धर्म समाज कायदा सर्व बाजुंनी व्याभिचार हा कीती वाइट आहे पाप आहे याच सतत केल जाणार हॆमरींग ! त्यामुळे आज फ़िर जीने की तम्मना है आज फ़िर मरनेका इरादा है किंवा मी कात टाकली पर्यंतचा बेभान हिंमतीचा टप्पा त्यांना व्याभिचारात गाठता येत नाही. म्हणजे अनेकदा मनाचा कोंडमारा असह्य होतो, सर्व काही तोडुन मोकळं व्हावस ही वाटतं पण मग तो आवेग ओसरल्यानंतर मन स्वत:च्या नैसर्गीक उर्मींना कुरतडु लागत. मग नेणीवेवरील दबाव कार्यरत होतो. आता या घुसमटीतुनच एक विलक्षण दांभिकता जन्म घेते एक आत्मवंचनेचा नविन प्रवास सुरु होतो.
तो असा की या स्त्रीया एक नविन मार्ग चोखाळतात. त्या अगोदर आवडलेल्या पुरुषाला आव्हान देतात त्याला इनव्हाइट करतात एक्साइट करतात. यामध्ये तो पुरुष जसजसा पागल होत जातो जसा त्या स्त्रीला प्रेज करु लागतो तशा त्या याच गोष्टीचा आनंद घेतात. एक मानसिक पातळीवर सर्व काही अनुभवुन घेतात आणि द मोमेंट तो पुरुष पुढे सरकला की त्याला ब्रेक मारतात. कारण त्यांना मुळात पुढे जायचच नसत. त्यांना तोच तितकाच चरीत्र वाचवुन आनंद ही देणारा मर्यादीत व्याभिचार च हवा असतो. त्यात काय नाहि मिळत ?
अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता. वय वाढल्यानंतर हव्याहव्याश्या वाटणारय़ा रीअशुअर करणारया स्तुतीची गरज ही तहाने इतकी मुलभुत असते. त्याहुन मोठी गरज असते श्रोत्याची ( अथर्वशीर्षातील एक सुंदर ओळ म्हणते अव श्रोतारम ) ही गरज अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत. नंतर जो एक रोमॆंटीसीझम जो स्त्रीयांमध्ये अंगभुत असतो त्याला जुनाट नवरा अजिबात उपयोगी पडत नाही. या शिवाय जी एक मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही. शिवाय स्त्रीयांच्या पाचवीला पुजलेला सनातन एकटेपणा इ.इ. तर वरील सर्व गरजांची पुर्ती ही विवाहपश्चात व्याभिचारात होत असते.म्हणुन स्त्रीया मुळ वासनेपेक्षा ही अधिक फ़ोर्स असलेल्या वरील गरजांसाठी हा मार्ग चोखाळतात.
यामध्ये मग गरजु पुरुष मात्र एकमेव हेतुने वरील सर्व गरजांची प्रामाणिक पुर्तता करुन वसुली साठी पुढे जसा सरकतो तशा मग मात्र पुर्ण सावध असलेल्या चरीत्राची काच जपणारया स्त्रीया मग माघार घेतात. प्रियकर लहान असेल तर मग अशा स्त्रीया लगेच पेरेंटल मोड मध्ये जातात, व पालकाच्या भुमिकेतुन शिकवणी घेउ लागतात. यात मजा अशी असते की स्त्रीयांचे चरीत्र ही अबाधित राहते व स्खलनातला आनंद ही पुर्ण उपभोगता येतो. शिवाय अशा अनुभवाच्या रीफ़्रेशमेंट नंतर मुळ विवाहातही परतल्यावर दिर्घ बदलीच्या सुटीनंतर रहाटगाडग्याला जोडुन घेतानाचा आनंद उपभोगता येतो. या खेळा तला पुरुष मात्र मुर्ख च असतो त्याला तोंडी आलेला घास गमावण्यातला चडफ़डाट केवळ भोगावा लागतो.
पण मग यातुन स्त्री ला एक अमर वेदना ही प्रत्ययास कधी कधी येत असावी की आपण झोकुन देउ शकत नाही प्रेम प्रवाहात आपण वाहु शकलो नाही याची देखील बोच तर असेल ? माहीत नाही स्त्री हा तसा गहन विषय आहे. तुम्ही त्याची उकल पुर्णपणे कधी कधी करु शकत नाही.
सध्या चरीत्रहीन मित्रा शी चर्चे च्या माध्यमातुन अजुन बरेच काही समजुन घ्यायचे आहे..
याद्या
63911
प्रतिक्रिया
176
मिसळपाव
प्रतिक्रिया
विश्वनाथ रागावु नकोस विचार कर
In reply to Charity begins at home by विश्वनाथ मेहेंदळे
हॅ हॅ हॅ!
In reply to विश्वनाथ रागावु नकोस विचार कर by मारवा
विश्वनाथा ! एक गोष्ट सांगतो
In reply to हॅ हॅ हॅ! by पैसा
कामवासनेचा तरंगच का उठायला
In reply to विश्वनाथा ! एक गोष्ट सांगतो by मारवा
माझी आठवण काढलीत का ओ?
In reply to कामवासनेचा तरंगच का उठायला by स्वप्नांची राणी
???
In reply to माझी आठवण काढलीत का ओ? by बॅटमॅन
अय्या!
In reply to विश्वनाथा ! एक गोष्ट सांगतो by मारवा
म्हणजे तुम्ही विवाहीत नाहि
In reply to विश्वनाथ रागावु नकोस विचार कर by मारवा
@ मारवा,
In reply to म्हणजे तुम्ही विवाहीत नाहि by स्वप्नांची राणी
लीमाउजेट मला आश्चर्य वाटत
In reply to @ मारवा, by कवितानागेश
ओके
अनेक कारणांनी या धाग्यावर
In reply to ओके by पैसा
+१
In reply to अनेक कारणांनी या धाग्यावर by अजया
पुढे जाऊन "तो एक प्रिन्सिपल्ड
In reply to +१ by पिलीयन रायडर
ह्या संदर्भात भारतीय
ते ' पोकुन ' वाचायला जाम
In reply to ह्या संदर्भात भारतीय by निनाद मुक्काम …
ही ष्टुरी पण वाचा
चला या निमित्ताने समजले की
दहा मिंटाच्या तर्कातील उणीवा (भाग २)
आप की अदालत फेम माहितगार यांना सविनय कायदेभंग करुन समर्पित !
In reply to दहा मिंटाच्या तर्कातील उणीवा (भाग २) by माहितगार
मारवासाहेबां शिवाय इतर कुणी
In reply to आप की अदालत फेम माहितगार यांना सविनय कायदेभंग करुन समर्पित ! by मारवा
अस हो काय नाराज झालात वकील साहेब
In reply to मारवासाहेबां शिवाय इतर कुणी by माहितगार
अनुवादकाचा अनुवादावर
In reply to अस हो काय नाराज झालात वकील साहेब by मारवा
एक नंबरचा फडतूस आणि भंकस
प्लेटाॅनिक प्रेमाची किंवा
लेख चांगला असून वेगळ्या विषयाला स्पर्श करतो. हे लक्षात घ्या की..