Skip to main content

एकत्र कुटुंब - काळाची गरज?

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी बुधवार, 26/03/2014 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
सद्ध्याच्या ढासळलेल्या नीतीमूल्ये व संस्कारांच्या काळात तसेच वाढत्या किंमती लक्षात घेतल्या तर एकत्र कुटुंब ही काळाची गरज आहे असे वाटते का? मिपाकरांकडून भरपूर चर्चेची अपेक्षा. तीन गोष्टींवर चर्चा व्हावी (१) नीतीमूल्ये व संस्कार. (२) शेतजमीन व एकत्र कुटुंबपद्धतीने आपसूक होणारी गटशेती. (३) वाढत्या किंमती (आवाक्याबाहेर गेलेले वस्तूंचे भाव) व एकत्र कुटुंब असण्याने होणारे फायदे.

वाचने 54254
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

एकत्र कुटुंबपद्धती हा एकंदर मानवी समाजव्यवस्थेचा एक कालखंड (टप्पा)आहे.सध्या तो लयास जाताना दिसतो त्याची अनेक कारणे असतील.विभक्त कुटुंबपद्धतीची ३०-४० वर्षापूर्वी झालेली सुरुवात आणि तिची आजची आणि येणाऱ्या भविष्यात होणारी अवस्था या बदलांचे निरीक्षण करण गरजेच आहे.भावनिक बांधिलकीवर एकत्र कुटुंब टिकू शकली नाही त्यामुळे ती लयास गेली.परंतु सोशल नेटवर्किंगचा वाढता प्रभाव लक्षात घेता विभक्त कुटुंब सुद्धा भावनिक दृष्ट्या बांधलेली आहेत असे म्हणता येणार नाही .किंवा गेल्या काही वर्षात मजबूत असलेली विभक्त कुटुंबपद्धती भावनिक निकषांवर डळमळीत झालेली दिसून येते.भावनिक बांधिलकी आणि कुटुंब व्यवस्था आणि आर्थिक /सामाजिक बांधिलकी आणि कुटुंबव्यवस्था या दोहोंचा विचार करता येणाऱ्या काळात या दोन्ही कुटुंबव्यवस्था मोडीत निघण्याची दाट शक्यता आहे.एकंदर मानवी समाजव्यवस्थेच एक वर्तुळ पूर्ण होणार आहे.

अवांतर : ज्या ज्या स्त्रीयांना आई-वडीलांना सोडून सासरी जाण्याची क्रूर प्रथा नकोय, त्यांनी पुढचा जन्म गारो किंवा खासी जमातीत जन्म होण्यासाठी देवाला वशिला लावावा.. ;-)

In reply to by चिगो

+१ ..!! आमच्या एका खासी मित्राला त्याच्या वडिलांनी सांगितलेय आधीच, 'बाबा आपल्या जमातीतली सोडून बघ रे' :D