Skip to main content

आता माझी सटकली रे.........!

लेखक आयुर्हित यांनी मंगळवार, 18/03/2014 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
नंदन निलकेणी एक सुशिक्षीत मान्यवर, चांगल्या खाजगी संस्थेत प्रत्यक्ष कामाचा भरपूर अनुभव, Managing Director, President, CEO या पदावरचा अनुभव, देशासाठी चांगले काहीतरी करून दाखवायची तयारी, Imagining India: The Idea of a Renewed Nation या पुस्तकाचे लेखक, एक कॉंग्रेस नेता, पद्मभूषण पुरस्कार विजेते, आधारपत्र अध्यक्ष कदाचित भावी पंतप्रधान(जर कॉंग्रेस बहुमतात आली तर), निवडणूक तोंडावर आली असतांना सांगतात "आरक्षण खाजगी संस्थेतही हवे" याला काय म्हणावे? आरक्षणाचे गाजर दलितांच्या मतावर डोळा लोकांच्या भावनांशी खेळ जातीयवादाची विष पेरणी फोडा आणि राज्य करा नीती एक घाणेरडे राजकारण खाजगी संस्थेच्या प्रगतीची वाट लावणे देशाची अधोगतीकडे वाटचाल Brain drain ला खुले आम प्रोत्साहन cheap publicity stunt इतर चांगल्या मुद्द्यांचा अभाव हलवायाच्या घरावर तुळशीपत्र Productivity गेली चुलीत नैपुण्याची ऐशी तैशी शिक्षणाचा आईचा घो राजकारणी लोकांचा एक समज भारतीय समाज: एक मेंढरांचा कळप

वाचने 31603
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया

तुमच्या लाडक्या गुजरात मधली आजची परिस्थीती पहा: Gujarat tops the list of states in terms of economic freedom, improving its position from fifth place in 2005. Refer: The report on Economic Freedom of the States of India (EFSI) by Cato Institute

हा चोर माणुस आहे. स्वताची कंपनी आहे, तिथे का नाही आरक्षण चालू करत आधी. तसे ही मुर्तींकडे फक्त ५ टक्के शेयर्स असुन ( ५०% असते तर बरोबर होते ) स्वताच्या मुलाला आरक्षण देउन कंपनीत आणले च की.