Skip to main content

मुहुर्त बघणे ,हे शास्त्र आहे कि थोतांड?

लेखक टॉपगिअर्ड फिलोसॉफर यांनी मंगळवार, 14/01/2014 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
मुहुर्त बघणे हा भारतीय लोकांचे एक आवडता विषय आहे. साडेतीन मुहुर्त ,गोरज मुहुर्त असे मुहुर्ताचे अनेक प्रकार असतात म्हणे, काही दिवसांपुर्वी माझ्या मित्राच्या दुकानाचे उद्घाटन होते, त्याने मुहुर्त वगैरे बघितला नसल्याने अनेकजण आश्चर्य व्यक्त करत होते. यावरुन मला काही प्रश्न पडले आहेत. जाणकारांनी प्रकाश टाकावा. 1.मुहुर्तावर कार्यारंभ करण्याची सुरवात कधी झाली असावी? 2.मुहुर्तावर आरंभलेली कार्ये तडीस जातात म्हणे, याचा काही विदा आहे काय ? 3.भारतीय सोडले तर इतर जग मुहुर्ताच्या फंदात पडत नाही ,तरीही ते भारतापेक्षा प्रगत कसे? 4.पेशवाईचा पराभव मुहुर्त बघण्याच्या नादापायी झाला होता. ३१ डीसेंबर १८१७ रोजी पेशवे भीमा कोरेगाव इथे इंग्रजांवर हल्ला करणार होते ,परंतु पेशव्यांच्या पुरोहितांनी दुसर्या दिवशीचा मुहुर्त शुभ असल्याचे सांगितले व जोशात असलेले सैन्य पेशव्यांनी लढाईपासून रोखले .ही बातमी इंग्रजांचा सेनापती एलफिन्स्टनला समजल्यानंतर त्याने झोपलेल्या गाफील मराठ्यांवर हल्ला करुन मराठा साम्राज्य अस्ताला नेले. मराठेशाहीचा अस्त मुहुर्ताच्या वेडापायी झाला . एकढा अनर्थ मुहुर्त बघण्याने होत असेल तर लोक मुहुर्त का बघतात???

वाचने 24068
प्रतिक्रिया 113

प्रतिक्रिया

मुहुर्त म्हणजे ठराविक गोष्टीसाठी योग्य वेळ जेणेकरुन ती गोष्ट सुरळीत पार पडेल. चातुर्मासात भारतात लग्नाचे मुहुर्त नसतात कारण पावसाळा असल्याने पूर्वी मंडप वगैरे घालणे, पुर आलेल्या नद्या वगैरे ओलांडणे असा प्रवास करणे कठीण होते, तसेच लोक शेतीच्या कामात गुंतलेले असत त्यामुळे दिवाळीनंतर(तुळशीच्या लग्नानंतर) लग्नाचे मुहुर्त ठेवत. हे मुहुर्तपण प्रांताप्रांतात वेगळे असतात. मराठी लोक सहसा दिवसा(फार फार तर गोरज मुहुर्तावर) लग्न करतात, तर उत्तरेत अगदी मध्यरात्री १-२ चे मुहुर्त असतात. सौथवाले बहुतेक पहाटेच लग्ने उरकतात. बाकी लढाई, आक्रमण वगैरेचा अनुभव नसल्याने त्यांच्या मुहुर्ताविषयी काही ठाऊक नै ब्वा!!

इकडे एखादी नवीन गोष्ट सुरू केल्यावर लगेच काय बरेवाईट घडते याकडे लक्ष असते . पेशवाईचे म्हणाल तर तो १८१७चा बराच काळ त्या पेशव्याला वाईट असावा त्यातल्या त्यात जरा कमी नुकसानीचा मुहूर्त काढला असावा . मुहूर्त काढा अथवा नाही बरा वाईट काळ येतच असतो . १.चोर लोकपण चोरीला निघतांना काही शकून(=मुहूर्त ?)बघतात .वाईट शकून झाला तरी जावेच लागते .घर चालायला हवे ना . २मुहुर्तावर केलेली लग्नेदेखील फिसकटतात तरी परंपरा चालूच आहे . ३राज्याभिषेकानँतर लगेच जिजाऊचा मृत्यु ही गोष्ट शिवाजीला खंत देऊन गेली ,पुन्हा विधि करवला . ४मुहूर्त पाहाणे एखाद्याला पटले नाही तरी घरातल्या इतर चार जणांना हवे म्हणून त्याप्रमाणे तो जातो .

In reply to by कंजूस

शिवराज्याभिषेकानंतर जिजाऊ गेल्या, रायगडावर वीज पडून घोडे की पागा काहीतरी जळाला आणि कुठल्यातरी चकमकीत एक चांगला योद्धा कामी आला. इतक्या घटना एकदम घडल्या. ( चु भु दे घे)

In reply to by उद्दाम

शिवराज्याभिषेकानंतर जिजाऊ गेल्या, रायगडावर वीज पडून घोडे की पागा काहीतरी जळाला आणि कुठल्यातरी चकमकीत एक चांगला योद्धा कामी आला. इतक्या घटना एकदम घडल्या. ( चु भु दे घे)
याचा अर्थ गागाभट्ट मुहुर्त काढायला चुकला असा घ्यायचा काय.... कि मुहुर्त वगैरेचा काहिच प्रभाव मनुष्याच्या आयुष्यात दिसत नाही याअर्थी हे थोतांड असावे असा अर्थ यातून ध्वनीत होतो.

मी स्वतः वर्शाचे ३६५ दिवस सारखे ,असे मानणार्या पैकी एक पण वयाच्या २५ व्या वर्शी असे काही अनुभव आले की सगळे विचारच बदलून गेले म्हणजे असे की अमावास्या /पौर्णिमा या दिवशी मनः स्वास्थ्य बिघडणॅ .वाइट स्वप्ने पडणॅ वगैरे प्रकार सुरू झाले माननीय गुगळे बाबा च्या सहाय्याने अधिक आन्तर-जालीय सन्शोधन केले असता असे समजले की या प्रकारास Energy Vampirism असे नाव आहे. अत्रुप्त आत्मे अन दुश्ट पाशवी आसुरी शक्ती अमावास्या /पौर्णिमा या दिवशी अधिक तीव्रतेने कार्यरत असतात ,असे दिसुन येते. यास्तव जर वाइट शक्ती म्हुर्त बघुन हल्ला करत असतील, तर शुभ शक्ती देखील नक्कीच शुभ मुहुर्तावर मदत करत असतील या तर्काने मुहूर्त या सन्कल्पनेचे स्पश्टीकरण सापदते

In reply to by उडन खटोला

माननीय गुगळे बाबा च्या सहाय्याने अधिक आन्तर-जालीय सन्शोधन केले असता असे समजले की या प्रकारास Energy Vampirism असे नाव आहे. अत्रुप्त आत्मे अन दुश्ट पाशवी आसुरी शक्ती अमावास्या /पौर्णिमा या दिवशी अधिक तीव्रतेने कार्यरत असतात ,असे दिसुन येते.
पुन्हा तेच सांगतो, या अमानवी शक्तीचे अस्तित्व सिद्ध करण्याची कुठली पद्धत आहे का जी 'कॉमन सेन्स'वर आधारलेली आहे ?(सायंटीफीक मेथेडेलॉजी वगैरे थोडा काळ लांब ठेवा) एखाद्या दूश्ट शक्तीचे अस्तित्व परीणामांनी सिद्ध करता येईल, असा वाईट परीणामांचे दुश्ट शक्तीशी असलेले causal nature स्पष्ट करणारे संशोधन झाले आहे काय?असल्यास प्रकाश त्यावर टाकावा..

In reply to by उडन खटोला

@अत्रुप्त आत्मे* अन दुश्ट पाशवी # आसुरी शक्ती http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif अमावास्या /पौर्णिमा या दिवशी अधिक तीव्रतेने कार्यरत असतात ,असे दिसुन येते. >>> http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif आंम्हाला* दोनच दिवसांपुरतं सीमीत केल्याबद्दल तीव्र णिषेढ! :-/ आंम्ही* हवे तेंव्हा कार्य रत होऊ शकतो! http://www.sherv.net/cm/emoticons/halloween/vampire-in-casket.gif बाकिच्यांचं # माहीत नै! =))

In reply to by उडन खटोला

नवा आयडी आहे पण "अत्रुप्त आत्मा, "दुश्ट पाशवी शक्ती" आणि "गुगळे" या मिपावरच्या हिट्ट मंडळींची नावे घेतल्यामुळे उडन खटोला हे मिपावर नवीन आहेत असे वाटलेच्च नाही!!

In reply to by पैसा

हम कौन है, खुद हमे भी अब पता नही ... यही तो है खासियत हमारी कि लोग जाने हमे हैसियत से रहते है हम तो पर्दा-नशीन जमाने को हर्ज है हमारे वजूद से

१८१७ साली पेशव्यांचा दारूण पराभव झाला. इंग्रजांचे राज्य १८१८ च्या आसपास पूर्ण भारतावर स्थापित झाले. नि अवघ्या ३५ वर्षात १८५३ साली भारतात पहिली ट्रेन धावली.(हुशारीची परिसीमा)

(हुशारीची परिसीमा) याचा अर्थ काय? पेशव्यांचा पराभव झाला म्हणून भारतात पहिली ट्रेन धावली ??? ???

In reply to by मंदार कात्रे

पेशव्यांचा पराभव झाला म्हणून भारतात पहिली ट्रेन धावली ??? ???
इंग्रजांच्या बुद्धीचातुर्ताने ट्रेन धावली असे सचीनजी सांगत आहेत.

In reply to by मंदार कात्रे

म्हणजे पेशव्यांनी काढलेला मुहुर्त देशासाठी योग्यच होता म्हणायचं... ;)

In reply to by कवितानागेश

>>म्हणजे पेशव्यांनी काढलेला मुहुर्त देशासाठी योग्यच होता म्हणायचं.. छे छे !! असं म्हटलं तर पेशव्यांना मुर्ख कसं ठरवता येईल.

माननीय गुगळे बाबा च्या सहाय्याने अधिक आन्तर-जालीय सन्शोधन केले असता असे समजले की या प्रकारास Energy Vampirism असे नाव आहे. अत्रुप्त आत्मे अन दुश्ट पाशवी आसुरी शक्ती अमावास्या /पौर्णिमा या दिवशी अधिक तीव्रतेने कार्यरत असतात ,असे दिसुन येते. यास्तव जर वाइट शक्ती म्हुर्त बघुन हल्ला करत असतील, तर शुभ शक्ती देखील नक्कीच शुभ मुहुर्तावर मदत करत असतील या तर्काने मुहूर्त या सन्कल्पनेचे स्पश्टीकरण सापदते
अरे बापरे!!!!!
१८१७ साली पेशव्यांचा दारूण पराभव झाला. इंग्रजांचे राज्य १८१८ च्या आसपास पूर्ण भारतावर स्थापित झाले. नि अवघ्या ३५ वर्षात १८५३ साली भारतात पहिली ट्रेन धावली.(हुशारीची परिसीमा)
'मिपाचे कुके' हा किताब योग्यच आहे.
इंग्रजांच्या बुद्धीचातुर्ताने ट्रेन धावली असे सचीनजी सांगत आहेत.
मानलं बुवा गो-यांच्या बुद्धिचातुर्ताला!!

चर्चेत उडी घ्यायला आजचा मुर्हुत चांगला आहे वाट्त
तुम्ही सुद्धा आजचाच मुहूर्त गाठलात की!! :)

ट्रेन धावली कारण व्यापाराला इंग्रजांना दळणवळणाची जलद साधने हवी होती इथे. (सचीनजींना एवढे समजू नये म्हणजे त्यांच्या पिढीजात मतिमंदत्वाची परिसीमा) :P :D

In reply to by प्यारे१

राईट बंधू ह्या दोन अमेरिकन भावांनी इंग्रजांना विमान दिलं, नाहीतर बसले असते रेल्वेने खुरडत खुरडत भटकत. म्हणजे आता, अमेरिकन्स सर्वात जास्त बुद्धीमान म्हणायला लागतील. इंग्रजही त्यांच्या पुढे मट्ठच. पण ह्या सर्व शोधांचा मूलाधार भारताने दिलेल्या 'शून्या'त आहे, असं कुठेतरी वाचल्याचं स्मरतं. म्हणजे पुन्हा भारतियच सर्वश्रेष्ठ असं सिद्ध होतं. च्यायला, बराच गोंधळ आहे राव! नक्की कोण सर्वात जास्त बुद्धीवान? इंग्रज, अमेरिकन्स की भारतिय?

In reply to by प्रभाकर पेठकर

जगातील सर्वात बुद्धिमंत लोक इंग्रज.(अमेरिकन्स हेही मुळचे इंग्रज ).भारताने शून्याचा शोध लावला पण ह्या शून्याचे लाख पाश्चिमात्यानी केले.

In reply to by सचीन

जगातील सर्वात बुद्धिमंत लोक इंग्रज.(अमेरिकन्स हेही मुळचे इंग्रज ).भारताने शून्याचा शोध लावला पण ह्या शून्याचे लाख पाश्चिमात्यानी केले.
गिरीश कुबेर लिखित 'युद्ध जीवांचे' आणि 'अधर्मयुद्ध' वाचल्यानंतर मला अमेरिकन्स आणि इंग्रज हे सगळ्यांत मठ्ठ वाटायला लागले आहेत. असो.

In reply to by सचीन

भारताने शून्याचा शोध लावला पण ह्या शून्याचे लाख पाश्चिमात्यानी केले.
ह्या लाखात त्यांचा 'एक' आणि भारताची पांच 'शून्य' येतात. शून्यच नसते तर 'लाख' कुठून आणि कसे केले असते? तरीपण हे (त्यांनी त्याचे 'लाख' केले) जसे त्यांचे कौतुक आहे तसेच भारताला रेल्वे दिल्यानंतर देशाच्या कानाकोपर्‍यात (की कोनाकोपर्‍यात?) रेल्वेचे जाळे पसरवून भारतिय रेल्वेला जगाच्या सर्व देशांच्या रेल्वेत बर्‍यापैकी वरचे स्थान भारतियांनीच मिळवून दिले आहे. तसेच, गरीबात गरीबाला परवडेल अशी रेल्वे भारतातच आहे. किफायतशीर मालवाहतूकही भारतिय रेल्वेतूनच होते. हे सर्व भारतियांनी केले आहे इंग्रजांनी येऊन नाही. त्यामुळे त्यांनी 'लाख' केले म्हणून ते हुशार ठरतात तर रेल्वे क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीने भारतियही तितकेच हुशार ठरतात. फाळणी नंतर भारताने केलेली लक्षणीय प्रगती आणि पाकिस्तानची नगण्य प्रगती लक्षात घेतली तरी भारतियांची हुशारी अधोरेखित होईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकरांशी सहमत. देशाला स्वातंत्र्य मिळाले. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ठ अशी राज्यघटना मिळाली.आणि मुख्य म्हणजे विकासाची दृष्टी असणारे राज्यकर्ते मिळाले देश स्वातंत्र्य झाल्यापासून जवळपास ५५ वर्षे कॉंग्रेसचे राज्य आहे.कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली भारताने अफाट प्रगती केलीय हे खरे आहे.आज देश मंगळावर जावून पोहोचलाय.

In reply to by प्रभाकर पेठकर

+११११ पेठकर काका झक्कासच उत्तर आवडले.

In reply to by अनिरुद्ध प

खरच पेठकर ह्यांच्या झकास उत्तराबद्दल आभार. देशाचा विकास असाच कायम राहायचा असेल तर कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही.

In reply to by सचीन

सचिनसाहेब, नविन वादाला तोंड फोडण्याचा तुमचा प्रयत्न समजतो आहे. तरीपण, उत्तरादाखल एवढेच म्हणेन, काँग्रस पक्ष काय आकाशातून पडला नाही भारतियांचा उद्धार करायला. इथल्या मातीतच जन्मला आणि रुजला. तदवत इतर पक्षही इथल्या मातीतच जन्मले आणि रुजले आहेत. काँग्रेस जसे चुका करत करत शिकला (तुम्ही म्हणता म्हणून) तसेच दुसरा एखादा किंवा पक्षसमुदायही शिकेलच. आता अपेक्षा काय आहे. इतरांनी काँग्रेसला शिव्या घालाव्यात आणि वादावादी चालू राहावी?

In reply to by सचीन

सचीन कवाधर्न तुमची रेकाट बिगाडलीय. त्ये जून्या गोल्गोल फिरनार्‍या रेकाटिसार्क त्येच त्येच परत परत कानग्रिस कान्ग्रिस गातीया. दिल्लिचि माय्बी वाचत अस्ती तर लईच बोर झाली अस्ती. त्या रेकाटीला जर्रा भंगारात टाका नायतर भंगार माल दुरुस्त करनारा एकादा लाला गाटा आनी विकून चार पयश्ये गाटिला बांदा बर्का.

In reply to by मंदार दिलीप जोशी

मंदार भाऊ जर पेशवे हरले नसते तर ईंग्रज आले नसते आणि ट्रेन धावली नसती म्हणजे ट्रेन येण्यासाठी किति मोठा त्याग पेशव्यांनी केला हेच मिपा कुकेंना सूचीत करायचे आहे (आता या त्यागाकरिता कोण किरकोळ लोग मेले असतील तर तिकडे अज्जिबात लक्ष देऊ नका) वेब दुनियाला सशक्त पर्याय देणार्या कुकेनां धन्यवाद.

In reply to by मंदार दिलीप जोशी

पेशव्यांना व्यापार उदीम करायचाच नव्हता असा याचा अर्थ घ्यायचा का? शिवाजीराजेंनी आरमार ऊभे करुन इंग्रजांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले व दळणवळणाचे नवे क्षेत्र जनतेला दिले .आजच्या नेव्ही वगैरेची सुरवात राजेंनी केली होती ..काळाच्या पुढचे विचार...

१८१८ ला पुरा भारत इंग्रजांच्या ताब्यात आला आणि इंग्रजांच्या राज्यात लॉर्ड विल्यम बेंटिंकने ४ डिसेंबर १८२९ रोजी सती-बंदीचा कायदा केला आणि सती जाणे, हा फौजदारी गुन्हा म्हणून घोषित करण्यात आला.

In reply to by सचीन

तुम्ही काय इंग्रजांना भारतीय जनतेचे तारणहार वगैरे मानता की काय? असेल असेल ...तसेही असेल ... इटालीकरीण मॅडम आणी पप्पू बाबा पण भारतीय जनतेचे तारणहारच नाही का? विसरलोच तुमच्या मागच्या जिलब्या...............!

इंग्रजांनी जे काही चांगले काम केले त्याला चांगले म्हणण्यात कसला आलाय संकोच. सतीची प्रथा बंद पाडली हे काम चांगले नव्हते का?

In reply to by सचीन

सहमत आहे. फक्त प्रश्न इतकाच आहे की खरोखर सतीबंदी इंग्रजांमूळे झाली? खरोखर ती समस्या इत्की गंभीर होती? जाऊ द्या इअत्का विचार करण्यापेक्षा इंग्रज हुस्शार हेच मानावे अन डोक्यावर पांघरुण घेऊन झोपावे

In reply to by सचीन

इंग्रजांनी नक्कीच कित्येक चांगली कामे भारतात केली. पण म्हणून ते 'हुशार' आणि आपण 'मठ्ठ' ठरत नाही. भारतियांची सत्ता इंग्लंडावर प्रस्थापित झाली असती तर भारतियांनीही तिथे चार चांगली कामे केली असती.

जगातील सर्वात बुद्धिमंत लोक इंग्रज.(अमेरिकन्स हेही मुळचे इंग्रज ).भारताने शून्याचा शोध लावला पण ह्या शून्याचे लाख पाश्चिमात्यानी केले.>>> हुशार नक्कीच आहे पण हुशारी पेक्षा स्वार्थी जास्त आहेत. अमेरिका ही इंज्राचीच आहे. त्यांनी मूळ रेड इंडिअन १.२ कोटी लोकांना मारले. संदर्भ आशिष नंदी, हा बाबा स्वतः बंगाली ख्रिश्चन आहे -- हे आपल्या माहिती साठी. ह्यांच्या हुशारीमुळे मानवाचे जीवनमान भरपूर वाढले पण जगात सगळीकडे युद्धे आणि दुसऱ्याची प्रचंड प्रमाणात पिळवणूक करणे ह्याच्वर हे अजूनही जगात आहेत. इराक आणि इराण काय आणि आता पाकिस्तान-अफगाणिस्तान सगळीकडे ह्यांनीच युद्धे केली फक्त तेलासाठी आणि नैसर्गिक साधन सामुग्रुसाठी. जगात गेले तिथे आधीच्या धर्माला नावे ठेवून स्वतःचाच धर्म कसा चांगला म्हणजे जे सगळे जेते करतात तेच त्यांनी केले. तेंव्हा नक्की काय पाहायचे ते तुमचे तुम्ही ठरवा. बाकी जाता जाता सध्या पर्यावरणाचा सगळ्यात जास्त ऱ्हास ह्याच लोकांनी केला आहे आणि आपण पुन्हा त्यांनाच आंधळेपणाने फॉलो करतो आहोत. एवढे तुमच्या सारख्या हुशार लोकांच्या कच्छपी आणि येत जात ब्राह्मण लोकांना जातीयवादी म्हणवणाऱ्या खऱ्या जातीयवाद्यांच्या लक्षात आले म्हणजे झाले.

In reply to by चैतन्य ईन्या

अमेरिका आणि इंग्लंड दुष्ट आहेत हे पटले. मग का आपण आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतो? पोरगा किंवा सगा सोयरा अमेरिकेला गेला कि का आपल्याया कृतकृत्य वाटते?

In reply to by सचीन

गम्मत वाटली तुमचे वरचे प्रश्न वाचून इतका वेळ तुम्हीच तर त्यांचे कौतुक करत होतात? आणि तसेही तुमचा सगळा रोख फक्त ब्राह्मण समाजावरच आहे. तेंव्हा नक्की काय ते ठरवा बुवा जातीयवादी कोणाला म्हणावे. नक्की कोण कसा काय हुशार आणि नक्की कोण कसा मुर्ख ते.

ना शास्त्र ना थोतांड. हा एक व्यवसाय आहे. ज्याला जमतो तो कलाकार !